Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

kolhapur : जळालं होतं, पण स्वप्न जळलं नाही ! केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभं राहिले

Kolhapur : कोल्हापुरातील ऐतेहासिक केशवराव भोसले नाट्यगृह ८ ऑगस्ट २०२४ च्या रात्री भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी गेलं होतं या आगीत नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले होते . रंगमंच जाळून खाक झाला आणि इमारतीचा काही भाग आणि छतही कोसळले होते . हे नाट्यगृह १९१५ मध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी उभारले होते .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 09, 2026 | 06:30 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • केशवराव भोसले नाट्यगृहाचा इतिहास
  • २५ कोटींच्या निधीतून पुनर्बांधणी
  • राखेतून पुन्हा सांस्कृतिक वैभव
Kolhapur : एका रात्रीत आगीच्या भक्ष्यस्थानी गेलेलं आणि कोल्हापूरच्या सांस्कृतिक विश्वाला मोठा धक्का देणारं संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह अखेर पुन्हा दिमाखात उभं राहिलं आहे. ८ ऑगस्ट २०२४ रोजी लागलेल्या भीषण आगीत नाट्यगृहाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर या ऐतिहासिक वास्तूची पुनर्बांधणी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले. आता तब्बल दोन वर्षांनी पुनर्बांधणी झालेल्या नाट्यगृहाचे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस जी यांच्या हस्ते या नाट्यगृहाचे उदघाटन करण्यात आले .

आगीच्या घटनेनंतर कोल्हापूरसह राज्यभरातील कलाकार, रंगकर्मी आणि नाट्यरसिकांनी नाट्यगृह पुन्हा उभे करण्याची मागणी केली होती. हे नाट्यगृह केवळ नाटकांचे सादरीकरण होणारे ठिकाण नसून कोल्हापूरच्या सांस्कृतिक इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे पुनर्बांधणी करताना आधुनिक सुविधा देतानाच त्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यावरही भर देण्यात आला.

केशवराव भोसले नाट्यगृहाचा इतिहास

कोल्हापूरच्या सांस्कृतिक इतिहासात संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह खूपच महत्वाचे आहे . शाहू महाराजांनी युरोपच्या दौऱ्यात भव्य नाट्यगृहे आणि अँफी थियेटर पहिल्या नंतर कोल्हापुरात ही कलाविष्कारासाठी असे नाट्यगृह असावे असे त्यांना वाटले आणि या त्यावेळच्या दर्जेदार नाट्यगृहाची निर्मिती झाली . १९१३ मध्ये याच्या बांधकामाला सुरवात झाली १९१५ मध्ये याचे काम पूर्ण झाले . तसेच सुरवातीला हे नाट्यगृह पूर्वी पॅलेस थियेटर या नावाने ओळखले जात होते .

Kolhapur Madhuri Elephant : लाडक्या ‘माधुरी’ हत्तीणीला आणण्यासाठी कोल्हापुरात ग्रामस्थ आक्रमक!
१९५७ मध्ये संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असे या नाट्यगृहाचे नामकरण करण्यात आले . मराठी रंगभूमीवरील महान गायक आणि अभिनेते केशवराव भोसले यांच्या स्मरणार्थ हे नामकरण करण्यात आले .

२५ कोटींच्या निधीतून पुनर्बांधणी

नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी शासनाने २५ कोटी १० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये पुनर्बांधणीच्या कामाचे भूमिपूजन झाले. त्यानंतर विविध टप्प्यांत बांधकाम आणि अंतर्गत कामांना वेग देण्यात आला. नाट्यगृहातील सुविधा अधिक आधुनिक करण्यासोबतच रंगमंच, प्रेक्षक व्यवस्था आणि तांत्रिक सुविधांमध्येही सुधारणा करण्यात आली.

पुनर्बांधणीच्या काळात या प्रकल्पाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. आगीत उद्ध्वस्त झालेली वास्तू पुन्हा उभी राहणार का, तिचे मूळ स्वरूप कितपत जपले जाणार आणि नव्या नाट्यगृहात कोणत्या सुविधा असणार, याबाबत रसिकांमध्ये उत्सुकता होती.

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! कोल्हापुरात लवकरच उभे राहणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम

राखेतून पुन्हा सांस्कृतिक वैभव

केशवराव भोसले नाट्यगृहाचे पुनरुज्जीवन हा केवळ एका इमारतीचा पुनर्बांधणी प्रकल्प नाही, तर कोल्हापूरच्या सांस्कृतिक अस्मितेला पुन्हा उभारी देणारा क्षण मानला जात आहे. आगीत सर्व काही गमावलेल्या या वास्तूने पुन्हा एकदा रंगभूमीसाठी आपले दरवाजे खुले केले आहेत.

आजच्या लोकार्पणानंतर कोल्हापूरच्या नाट्यरसिकांना पुन्हा एकदा या ऐतिहासिक रंगमंचावर नाटक, संगीत आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे ‘आगीत भस्मसात झालं, पण सांस्कृतिक वैभव संपलं नाही’, अशी भावना कोल्हापूरकरांमध्ये पाहायला मिळत आहे

Web Title: Kolhapur it had burned down but the dream did not perish the keshavrao bhosale natyagriha has risen again in all its grandeur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Chief Minister Devendra Fadnavis
  • Kolhapur News update
  • Marathi Theatre

संबंधित बातम्या

Rohit Pawar : …तर समृद्धी महामार्ग जाम करू, रोहित पवारांचा राज्य सरकारला इशारा
1

Rohit Pawar : …तर समृद्धी महामार्ग जाम करू, रोहित पवारांचा राज्य सरकारला इशारा

Maharashtra Drought : दुष्काळावर विशेष अधिवेशन बोलवा, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
2

Maharashtra Drought : दुष्काळावर विशेष अधिवेशन बोलवा, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

CM Devendra Fadnavis  : कोणतीच वोट चोरी नाही, त्यांचा मेंदू चोरीला गेलाय; मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
3

CM Devendra Fadnavis : कोणतीच वोट चोरी नाही, त्यांचा मेंदू चोरीला गेलाय; मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

Maharashtra Drought : ही चक्क शेतकऱ्यांची फसवणूक; दुष्काळाच्या घोषणेतील त्रुटींवर विजय वडेट्टीवार संतापले
4

Maharashtra Drought : ही चक्क शेतकऱ्यांची फसवणूक; दुष्काळाच्या घोषणेतील त्रुटींवर विजय वडेट्टीवार संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.