Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : कॅन्सर रुग्णांसाठी आशेचा किरण; ‘आरोग्य मित्र’ संकल्पनेतून साकारतंय कॅन्सर हॉस्पिटल

कर्करोगाला कोणीही घाबरुन न जाता त्याच्याशी लढा, असे आवाहन म्हसवड येथील आरोग्य मित्र इंजीनियर नितीन तिवाटणे यांनी केले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 07, 2026 | 07:48 PM
Kolhapur News : कॅन्सर रुग्णांसाठी आशेचा किरण; ‘आरोग्य मित्र’ संकल्पनेतून साकारतंय कॅन्सर हॉस्पिटल
Follow Us
Close
Follow Us:
  • कॅन्सर रुग्णांसाठी आशेचा किरण
  • ‘आरोग्य मित्र’ संकल्पनेतून साकारतेय कॅन्सर हॉस्पिटल
म्हसवड : आजच्या फास्टफुटच्या जमान्यात माणसांचे आरोग्य हे धोक्यात आले असल्याने विविध आजाराने डोके वर काढले आहे. यामध्ये कर्करोगाची मोठी भर पडली आहे. मात्र कर्करोगाला कोणीही घाबरुन न जाता त्याच्याशी लढा, असे आवाहन म्हसवड येथील आरोग्य मित्र इंजीनियर नितीन तिवाटणे यांनी केले आहे. आपल्या आईचा कर्करोगाने बळी घेतल्याने हताश झालेल्या या आरोग्य मित्राने भविष्यात कर्करोगाने कोणाचा बळी जावू नये, यासाठी जिद्दीने उभा रहात कर्करुग्णांसाठी देवदूत बनण्याचे ठरवत या बहाद्दराने खटाव तालुक्यातील सातेवाडी गावच्या हद्दीत साडे १२ हजार स्केअर फुटाचे कॅन्सर रुग्णालय उभारण्याचे काम हाती घेतले आहे.

समुपदेशन व औषधे आणून देण्याने विचार बदलले तिवाटणे यांच्या या स्वभावामुळे त्यांची हळूहळू आरोग्य मित्र अशी नवी ओळख निर्माण झाली, यामुळे ते परिसरातील अशा रुग्णांच्या घरी जावून त्यांना समुपदेशन करु लागले, आपल्या आईला ते गुजरात येथून औषध आणत होते, तेच औषध ते इतरांनाही देवू लागले, याचा चांगला परिणाम अनेक रुग्णांवर झाल्याने अनेकांना यामुळे नवसंजिवनी मिळाली. त्यामुळे जिवदान मिळालेले अनेक रुग्ण तिवाटणे यांना अक्षरशा देवदुत मानू लागले. अनेकाना जीवदान देणाऱ्या या आरोग्यमित्राला एक दिवस त्यांच्या मातोश्रीच सोडून गेल्या. एवढी त्यांची सुशुश्रा करुनही आपल्या आईला त्यांना जिवदान जरी देता नाही आले. तरी मात्र त्यांनी आपल्या आईच्या आयुष्याची दोरी मात्र खुप बळकट केली होती. आजाराचे निदान होवुनही त्यांच्या मातोश्री अनेक वर्ष जगल्या त्या केवळ तिवाटणे यांच्या रुग्णसेवेवरच.

Kolhapur News : चंदगड तालुक्यात काजू उत्पादनात मोठी घटना; अर्थकारण कोलमडल्याने शेतकरी हवालदिल

आईच्या आजारातून कर्करुग्णांसाठी काम करण्याचा बोध घेऊन केला निश्चय नितीन तिवाटणे यांच्या सकलपनेतून साकारण्यात येत असलेल्या सर्वज्ञ सामाजिक संस्थेच्या कार्याचा आढावा पुढील प्रमाणेरुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानुन अखंडीतपणे रुग्णसेवेत कार्यरत राहणारे म्हसवड येथील नितीन गजानन तिवाटणे हे स्वतः उच्च शिक्षित असुन ते इंजिनियर आहेत, अनेक वर्ष विविध नगरपरिषदांमध्ये त्यांनी अभियंता म्हणून सेवा बजावली आहे. मातृ सेवा हीच ईश्वर सेवा मानत या बहाद्दराने आपली नोकरी संभाळीत आईची सेवा करण्यास सुरुवात केली. ही सेवा करतानाच कर्क रोग झालेल्या व्यक्तीला काय त्रास होतो याचा त्यांना चांगलाच अनुभव आल्याने त्यांनी मनोमन कर्करुग्णाबद्दल जादा प्रेम वाढू लागले. आपल्या आईची सेवा करताना त्यांच्या असे लक्षात आले की आपल्या आजूबाजुलाही असे कर्करोगाचे अनेक रुग्ण आहेत, मात्र त्यांना पुरेसा उपचार मिळत नाही, त्यांना नेमकी हीच बाब खटकली आणी त्यांनी परिसरातील अशा रुग्णांचा शोध घेतला, त्या रुग्णांशी ते थेट संवाद साधु लागले त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचाराची ते माहिती घेवुन त्यांना आणखी कोणत्या उपचाराची आवश्यकता आहे याची पुरेपुर माहिती ते त्याच्या कुटुंबियांना देवून त्या रुग्णांशी आपुलकीने वागण्याचा सल्ला ते देवू लागले.

Sangali News : कवठेमहांकाळला अतिक्रमणाचा विळखा; नगरपंचायतीच्या सूचनांनंतरही कारवाई ठप्प, नागरिकांचा तीव्र संताप

Web Title: A ray of hope for cancer patients cancer hospital is realizing the concept of health friend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 07:47 PM

Topics:  

  • health care news
  • kolhapur news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Thane Crime : ठाणे पोलीसांना मोठं यश; बेकायदा ऑइल तस्करी करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या
1

Thane Crime : ठाणे पोलीसांना मोठं यश; बेकायदा ऑइल तस्करी करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

घराची Original Document हरवलीत? मालकी हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी लगेच करा ‘हे’ काम; नाहीतर होईल मोठं नुकसान!
2

घराची Original Document हरवलीत? मालकी हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी लगेच करा ‘हे’ काम; नाहीतर होईल मोठं नुकसान!

Pratap Sarnaik : आरोपांमुळे परिवहन विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह, Sarnaik यांचं प्रत्युत्तर
3

Pratap Sarnaik : आरोपांमुळे परिवहन विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह, Sarnaik यांचं प्रत्युत्तर

तुम्हाला पेट्रोल पंपावर पूर्ण इंधन मिळतंय का? Petrol-Diesel मधील फसवणूक रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय!
4

तुम्हाला पेट्रोल पंपावर पूर्ण इंधन मिळतंय का? Petrol-Diesel मधील फसवणूक रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.