मयूर पाटील यांनी पारंपरिक शेतीपद्धतींचा अभ्यास करताना स्थानिक, देशी आणि नामशेष होत असलेल्या पिकांच्या जातींचे संकलन सुरू केले आहे. विविध हवामान, माती, पाण्याची उपलब्धता आणि रोगप्रतिकारक क्षमता लक्षात घेऊन त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने बीजसंवर्धन, बीज निवड आणि जतन करण्याचे प्रयोग केले आहेत. त्यापैकी एक म्हणजे ऊस बियाणे, वेळोवेळी वेगवेगळ व कृषी प्र दानास भेटी देऊन माहिती घेऊन शेतीत उपयोग केला आहे. मयुर पाटील यांनी नांगरट करून चार ट्रॉली शेणखत, एक ट्रॉली कोंबडीचे खत, टाकूण मशागत करून घेतली. त्यानंतर चार फुट अंतराने २० सऱ्या सोडल्या. लागण करताना मयूर पाटील यांनी आपल्या १६ गुंठे क्षेत्रात प्रगतशील शेतकरी आप्पासाहेब पाटील यांच्याकडून ९०० किलो उसाचे ८६०३२ नीरा जातीचे बियाणे घेतले. त्यानंतर प्रमाणानुसार खताची मात्रा देत लागण केली.
उसाची लागण उगवण झाल्यानंतर केन बूस्टरचा पंपाच्या सहाय्याने डोस दिला. दोन वेळा शेतात भांगलन करून घेतली. चार महिन्यानंतर ऊस भरणी करताना जैविक घटक असलेला बायोअर्थ, पोटॅश, युरिया असा डोस दिला. वेळोवेळी उसाच्या वाढीची काळजी घेतली. दरम्यान अवकाळी वादळाने ऊस पडला त्यावेळी एका उसाला २० कांड्या होत्या. ऊस वजनालाही चांगला होता. दर्जेदार देखभाल आणि स्वच्छता यामुळे अकराव्या महिन्यात कासारवाडीचे शेतकरी लागणीसाठी बियाणे पहायला आले. त्यांनी लागणीसाठी सर्व क्षेत्रातील ऊस नेला.
मयूर पाटील यांनी उसाचे बियाणे निर्मिती करत असतानाच यातून नवीन प्रयोग म्हणून बाजारपेठेचा अंदाज घेत चार फूट सरीच्या बाजूला शुगर ७५ जातीचे स्वीट कॉर्न (मका) टोकन केली. तीन महिन्यात ऊस पिकास कोणताही वसब न लागता व्यापारी वर्गाला न विकतास्वता बाजारपेठेत विक्री केली. त्यातून भरघोस उत्पादन मिळाले, कारखान्याला ३३०० दर असताना सुद्धा त्यांनी ४४०० रुपये प्रतिटन विक्री केली. शेतीत वडील जगन्नाथपाटील, कृषी सेवा केंद्राचे तानाजी खाडे,प्रगतशील शेतकरी आप्पासाहेब पाटील,कृषी सहाय्यक अमोल कोरे यांचे मार्गदर्शनलाभले, असे मयूर पाटील यांनी सांगितले.
सोळा गुंठे क्षेत्रात ३४ टन ऊस व स्वीट कॉर्न असे १ लाख ८० हजार उत्पन्न झाले. त्यातून ७० हजार उत्पादन खर्च वजा जाता एक लाख दहा हजार निव्वळ उत्पादन झाले. शेतकऱ्यांनी खोडवा व नेहवा यांचा वापर लागणीसाठी करू नये. लागण करताना बियाणाची निवड योग्य असावी. शेती करताना वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून केल्यास फायदेशीर असल्याचे मयूर पाटील यांनी सांगितले.
योग्य बियाणांची निवड चागल्या उत्पन्नाचे स्रोत
बियाण्याचे निवड करत असताना नऊ ते अकरा महिन्यातील लागणीच्या बियाणाची निवड केली. ठसठसशीत असलेला कीड रोग मुक्त कांडीचा डोळा व लागण करताना कीटकनाशक बुरशीनाशक व जेविक खाताची बीजप्रक्रिया करूनच लागण केली.






