कृष्णा नदीवर२० गावांना फटका; संताप उसळला
या दूषित पाण्याचा फटका बोरगाव, बनेवाडी, गौडवाडी, साटपेवाडी, मसुचीवाडी, ताकारी, दुधारी, रेठरे हरणाक्ष, तुपारी, जुनेखेड, पुनदी यासह सुमारे २० गावांना बसला आहे. शेतकरी, नागरिक वा ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष; दोषींवर कारवाई केव्हा?हा प्रकार घडूनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण व प्रशासनाकडून तातडीची ठोस कारवाई न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच असे प्रकार घडत असूनही कारखानदारांवर कठोर कारवाई होत नसल्याने प्रदूषण माफियांचे फावत आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात असे प्रकार जाणीवपूर्वक घडतात
66 पाणी नदीत सोडत्यामुळेच हा हत्याकाड घडला आहे साखर कारखान्याच्या डिस्टलरीतील ‘स्पेन्ट वॉश’ दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला हे प्रकार जाणीवपूर्वक केले जातात. डिस्टलरीला ‘शून्य पाणी विसर्ग’ अटीवर परवाना दिला असताना त्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोषी कारखान्याचा शोध घेऊन तातडीने कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल. हेच दूषित पाणी नागरिक, जनावरे आणि शेतीसाठी वापरले जात असल्याने परिस्थिती अत्यंत भयावह आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे.
दूषित पाण्यातील मासे खाणे आरोग्यासाठी घातक
कृष्णा नदीत रसायनयुक्त सांडपाणी मिसळल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. या प्रदूषणामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. अशा दूषित पाण्यातील मासे खाणे अत्यंत घोकादायक आहे. त्यामुळे विषबाधा, उलटी, जुलाब, पोटदुखी, त्वचारोग व गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नदीतून पकडलेले है मासे खाऊ नयेत. नागरिकांनीही स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घ्यावी.
वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय, ईश्वरपूर
नागरिकांच्या ठळक मागण्या काय ?
कृष्णा नदीत रसायनयुक्त सांडपाणी सोडणाऱ्यांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी.
नदीपात्रात रात्रीच्या वेळी होत असलेल्या बेकायदेशीर सांडपाणी विसर्जनावर कायमस्वरूपी बंदी घालावी.
पाण्याचे तातडीने प्रयोगशाळा परीक्षण करून अहवाल जाहीर करावा.
नदीकाठच्या गावांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे घेऊन औषधोपचार व जनजागृती करावी.
भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून कायमस्वरूपी देखरेख पथक व सीसीटीव्ह यंत्रणा बसवावी.
नदी प्रदूषणास आळा घालण्यासाठी प्रभावी सांडपाणी प्रक्रिया केंद्रे (STP) कार्यान्विता करावीत.अशा नागरिकांनी मागण्या केल्या आहेत.






