देशाच्या स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्याबद्दल अभिनेत्री कंगना राणावत व तिचे समर्थन करणार्या अभिनेता विक्रम गोखले या दोघांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Follow Us:
Follow Us:
विस्तार
इचलकरंजी : देशाच्या स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्याबद्दल अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) व तिचे समर्थन करणार्या अभिनेता विक्रम गोखले (Vikram Gokhale) या दोघांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (Communist Party of India (Marxist)) शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागणीचे निवेदन नायब तहसीलदार संजय काटकर यांनी स्वीकारले.
अभिनेत्री कंगना राणावत हिने एका मुलाखतीत देशाला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे भीक होती. खरे स्वातंत्र्य हे २०१४ मध्येच मिळाले होते, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यातून राणावत हिने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्या व रक्त सांडणार्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे. ब्रिटीशांशी तडजोडी करून त्यांना मदत करणार्या देशद्रोही पक्ष व लोकांच्या नादी लागून राणावतने समस्त भारतीय व स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला आहे. त्यामुळे कंगना राणावत हिला दिलेला पद्मश्री पुरस्कार मागे घ्यावा, तिच्या मताला सहमती दर्शविणार्या अभिनेता विक्रम गोखले यांच्यावरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात कॉ. दत्ता माने, भरमा कांबळे, आनंदा चव्हाण, सदा मलाबादे, सुभाष कांबळे, धनाजी जाधव, गोपाळ पोला, पार्वती म्हेत्रे आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश होता.
Web Title: Take action against kangana ranaut and vikram gokhale demand of cpi m nrka