Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM Devendra Fadnavis News: लाडकी बहीण योजनेतील ८० लाख लाभार्थी का वगळले? मुख्यमंत्री फडणवीसांचा खळबळजनक खुलासा

CM Devendra Fadnavis News: मुख्यमंत्र्यांच्या मते, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सध्या सुमारे १ कोटी ७० लाख महिला लाभार्थी आहेत. देशातील अशा प्रकारच्या योजनांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक महिला लाभार्थी असल्याचा दावा त्यांनी केला.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 02, 2026 | 10:10 AM
Devendra Fadnavis, Ladki Bahin Yojana, Maharashtra Govt,

Devendra Fadnavis, Ladki Bahin Yojana, Maharashtra Govt,

Follow Us
Follow Us:
  • लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी करताना मोठ्या प्रमाणात अपात्र लाभार्थी
  • ८० लाख लाभार्थ्यांचा हफ्ता बंद
  • महाराष्ट्रात सध्या सुमारे १ कोटी ७० लाख महिला लाभार्थी
CM Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी करताना मोठ्या प्रमाणात अपात्र लाभार्थी आढळून आल्याने सुमारे ८० लाख लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात आले. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. यासंदर्भात विविध सरकारी डेटाबेसच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पडताळणीत अनेक लाभार्थी योजनेच्या पात्रता निकषांमध्ये बसत नसल्याचे स्पष्ट झाले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना फडणवीस म्हणाले की, लाडकी बहीण योजना सुरू करताना सरकारने काही पात्रता निकष निश्चित करण्यात आले होते. मात्र, अर्ज प्रक्रियेत स्वयं-प्रमाणपत्राला परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या पडताळणीत १४ हजार पुरुष लाभार्थी, सुमारे ५ लाख सरकारी कर्मचारी, १० लाख आयकरदाते आणि ४ लाख वाहनधारक कुटुंबांचा समावेश असल्याचे आढळून आले.

करमाळा तालुक्यातील केतुर येथे वादळी वाऱ्याचा फटका; अंगावर भिंत कोसळून वयोवृद्ध दाम्पत्याचा मृत्यू

नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांनी लाभार्थ्यांच्या कागदपत्र पडताळणीबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज्य सरकारने ई-केवायसी प्रक्रिया राबवली. वारंवार आवाहन करूनही अनेक लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. “जे लाभार्थी केवायसी करत नाहीत, ते पात्रतेच्या निकषांची पूर्तता करत नसावेत, अशी शक्यता आहे,” असे त्यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकारने सुमारे २५ लाख त्रुटीपूर्ण केवायसी नोंदींमध्ये सुधारणा केली आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांनी अद्याप केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

अपात्र लाभार्थ्यांना एकवेळची सूट

अपात्र लाभार्थ्यांकडून रकमेची वसुली करण्याच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “जर अपात्र व्यक्तींना पैसे मिळत राहिले तर भविष्यात कॅगकडून वसुलीचे निर्देश दिले जाऊ शकतात. त्यामुळे सरकारने अपात्र लाभार्थ्यांना एकवेळची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांकडून मिळालेली रक्कम परत घेतली जाईल. सरकारी योजनांवरील खर्च हा जनतेचा पैसा असून तो केवळ नियम आणि पात्रतेनुसारच खर्च केला गेला पाहिजे.

Sanjay Raut PC: ‘मोदींचा विकास कुणी समजावून सांगितला, तर मीही भाजपमध्ये जाईन

राज्यात सर्वाधिक महिला लाभार्थी

मुख्यमंत्र्यांच्या मते, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सध्या सुमारे १ कोटी ७० लाख महिला लाभार्थी आहेत. देशातील अशा प्रकारच्या योजनांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक महिला लाभार्थी असल्याचा दावा त्यांनी केला.

हवामान बदल हे सर्वात मोठे आव्हान

राज्यासमोरील प्रमुख आव्हानांविषयी बोलताना फडणवीस यांनी हवामान बदल आणि त्याचा कृषी अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे सांगितले. दरम्यान, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी राज्यातील सर्व थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती दिली.

 

Web Title: Ladki bahin yoja 14000 men 5 lakh govt employees found devendra fadnavis explains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Ladki Bahin Yojana
  • Maharashtra Govt

संबंधित बातम्या

Chala Shaalet Jauya Campaign: CJPच्या स्कूल ठीक करो मोहिमेचा इम्पॅक्ट; राज्य सरकारकडून ‘चला शाळेत जाऊया’ विशेष अभियान घोषणा
1

Chala Shaalet Jauya Campaign: CJPच्या स्कूल ठीक करो मोहिमेचा इम्पॅक्ट; राज्य सरकारकडून ‘चला शाळेत जाऊया’ विशेष अभियान घोषणा

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Gadchiroli News : गडचिरोलीत उभा राहणार हरित पोलादाचा प्रकल्प; महाराष्ट्र सरकारचा जॉन कॉकरिलसोबत मोठा करार
3

Gadchiroli News : गडचिरोलीत उभा राहणार हरित पोलादाचा प्रकल्प; महाराष्ट्र सरकारचा जॉन कॉकरिलसोबत मोठा करार

Pune News : पुणे ठरतेय GCC चे हब; वर्षभरात 800 पेक्षा अधिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास
4

Pune News : पुणे ठरतेय GCC चे हब; वर्षभरात 800 पेक्षा अधिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.