लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाला येण्याची शक्यता आहे (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Ladki Bahin Yojana News In Marathi : महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील (Majhi Ladki Bahin Yojana) पात्र असलेल्या महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आता अनेक लाडक्या बहिणींचे अर्ज बाद केले जाणार असून काही दिवसांपूर्वी यवतमाळमधील २७ हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. त्यानंतर अमरावती जिल्हातून तब्बल २१ हजार ९३७ महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत, अशी माहिती मिळत आहे.
अमरावती जिल्ह्यातील ४७ महिलांनी स्वतःहून लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडला आहे. सध्या अमरावतीतील ६ लाख ९५ हजार ३५० महिला लाडकी बहिन योजनेचा लाभ घेत आहेत. विविध कारणांमुळे २१ हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले. त्यामुळे महिलांना या योजनेचा लाभ कधीच मिळणार नाही. आता लाडकी बहिन योजनेसाठी अर्जदारांची नोंदणी बंद झाली आहे. त्यामुळे इथून भविष्यात कोणालाही अर्ज करता येणार नाही.
लाडकी बहिण योजणेच्या ज्या लाभार्थ्यांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांना या योजनेतून बाद करण्याची शक्यता आहे. अमरावतीतील २१ हजार महिलांचे अर्ज देखील या कारणांमुळे बाद करण्यात आले. महिलांचे उत्पन्न २.५ लाखांहून अधिक, चारचाकी वाहने आणि इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचे अर्ज बाद करण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्हीही निकषांबाहेर जाऊन लाभ घेतला असेल तर तुम्हालाही योजनेचा लाभ मिळणार नाही.
लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिला जुलैच्या हप्त्याची वाट पाहत आहे. जुलैचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न पडला असेल तर जुलै हप्ता पुढच्या दोन आठवड्यांमध्ये यायला हवा. या संदर्भात कोणतीही घोषणा झालेली नाही. फक्त, लवकरच माहिती देता येईल.
या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक मदत करणे हा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत या योजनेमुळे सरकारला चांगला पाठिंबा मिळाला. या योजनेसाठी वेगवेगळ्या विभागांकडून पैसे घेतल्याबद्दलही सरकारवर टीका होत आहे.
नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहिणींना देण्यात येणारी रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सात महिने उलटूनही हे आश्वासन पूर्ण झालेले नाही. या योजनेसाठी आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागाचे पैसे वापरल्याबद्दल सरकारवर बरीच टीका होत आहे.
आदिती तटकरे यांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, २०२५-२०२६ मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी महिला आणि बालविकास विभागांतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी २८,२९० कोटी रुपये, आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी प्रवर्गासाठी ३,२४० कोटी रुपये आणि सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गासाठी ३,९६० कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे.