नागपूर : नागपूरच्या सभेत काल उद्धव ठाकरेंनी (uddhav thackeray) देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) जोरदार टीका करीत त्यांना नागपूरचा कलंक म्हटले, यानंतर आता फडणवीस विरुद्ध ठाकरे वाद चांगलाच उफाळून आला आहे. दरम्यान, कलंकावरुन वातावरण तापले असून, नागपुरात याचे पडसाद उमटले आहेत. आज भाजपा युवक मोर्चाकडून आंदोलन करण्यात येत आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब उत्तर देत यावर ट्विटद्वारे आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी कलंकावरुन उद्धव ठाकरेंचे कान टोचले आहेत.
श्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये श्री देवेंद्रजींबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा. आम्ही सरकारमध्ये असताना केलेले विकासकार्य आणि त्यांनी केलेले कार्य यावर त्यांनी जरूर चर्चा करावी, परंतु अशा पद्धतीने अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन व्यक्तिगत आरोप…
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) July 10, 2023
राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा
उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना कलंक म्हटले याचे पडसाद सर्वंत्र उमटत आहेत. भाजपा नेत्यांकडून याचा जोरदार समाचार घेतला जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. “श्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये श्री देवेंद्रजींबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा. आम्ही सरकारमध्ये असताना केलेले विकासकार्य आणि त्यांनी केलेले कार्य यावर त्यांनी जरूर चर्चा करावी, परंतु अशा पद्धतीने अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन व्यक्तिगत आरोप करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही”, असं ट्विट नितीन गडकरी यांनी केलं आहे.