मुंबई : लता मंगेशकर यांच्या तब्येतीबाबत आणखी काही दिवस काळजी घेण्याचीच गरज आहे. त्यामुळेच त्यांना आणखी काही दिवस आयसीयूमध्ये ठेण्यात येणार आहे. सध्या लता मंगेशकर यांची तब्येत पूर्वीसारखीच आहे. मात्र, त्यांना सध्या कोणालाही भेटण्याची परवानगी नाही. अशी माहिती डॉ. प्रतित समदानी यांनी दिली आहे.
कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना न्युमोनिया झाला आहे. याला कोविड न्युमोनिया असे म्हटले जाते. दरम्यान, लता मंगेशकर यांना रविवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांना कोविड न्युमोनिया झाला आहे. रविवारी पहाटे त्यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत. तसेच, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉ. प्रतित समदानी आणि त्यांची टीम लता दीदींवर उपचार करत आहेत.