
फोटो सौजन्य सोशल मिडिया
Massive Fire Shop in Latur : लातूर शहरातील लोखंड लाईन परिसरात एका वायरच्या दुकानात सोमवारी भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे दुकानात मोठा स्फोट झाला. त्यानंतर आग वेगाने पसरली. आगीची तीव्रता इतकी जास्त होती की, जवळची 04 ते 06 दुकानेही या आगीत भस्मसात झाली आहे .
या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले असून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. या आगीमुळे परिसरात आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगीचे मुख्यकारण काय ? हे अद्याप स्पष्ट झाले नसुन या आगीमुळे दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे.
लातूर शहरातील लोखंड लाईन परिसरात एका दुकानाला भीषण आग लागली. या नंतर परिसरात आगीचे लोटच्या लोट पसरले.आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दुकानात वेलडिंगचे काम सुरू असल्या मुळे आग लागली असावी. तर लोखंड लाईन परिसरात स्टिलची दुकाने जास्त प्रमाणात असल्याने ही आग लागली असावी. असा देखिल अंदाज वर्तवन्यात येत आहे. दुकानात पेट्रोबेस केमिकल असल्यामुळे आग लागण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे.
Mumbai: ठाणे-मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठ्या मागण्या; ४८ प्रवासी संघटनांची रविंद्र चव्हाणांसोबत बैठक
लातूर शहरातील लोखंड लाईन परिसरात एका दुकानाला भीषण आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटना स्थळी मोठी गर्दी जमली होती. पण अग्निशमन दलाने आणि पोलिसांनी परिसर सील करुन जबाबदारी बजावण्याचे काम केले.
लातूर शहरातील लोखंड लाईन परिसरात लागलेल्या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जिवितहानी झालेली नाही. पण आगीमध्ये मोठ्या प्रमाणात दुकानांचे नुकसान झाले आहे. तर दुकानांचे संपूर्ण सामान जळून राख झाले आहे. या घटनेमुळे स्थानिक दुकांनदारांचे आर्थिक नुकसान झाले आहे.