
९८८ मतदारांची अंतिम यादी जाहीर; स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात लातूर महापालिका आघाडीवर
जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार लातूर महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक ८८ मतदार आहेत. त्यामध्ये ४६ पुरुष आणि ४२ महिला सदस्यांचा समावेश आहे. तर धाराशिव नगरपरिषद क्षेत्रात ५९, बीड नगरपरिषद क्षेत्रात ५८ आणि उदगीर नगरपरिषद क्षेत्रात ५३ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यसंख्येच्या आधारे मतदारसंख्या निश्चित करण्यात आली आहे.
पुणे विधानपरिषद उमेदवारीवरून मोठा गोंधळ, विक्रम काकडेंना मिळाली उमेदवारी तर सुनील टिंगरेंची बंडखोरी
धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, नळदुर्ग, लोहारा, उमरगा, मुरूम, कळंब, वाशी, भूम आणि परंडा या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून एकूण २९३ मतदारांची नोंद आहे. धाराशिव नगरपरिषदेत ५९ मतदार असून तुळजापूरमध्ये ३६, उमरगा येथे ३९, कळंबमध्ये ३२, भूम आणि परंडा येथे प्रत्येकी २९, तर वाशी येथे २३ मतदार आहेत. नळदुर्ग आणि मुरूम नगरपरिषद क्षेत्रात प्रत्येकी २३ मतदार नोंदविण्यात आले आहेत.
लातूर जिल्ह्यातील लातूर महानगरपालिका, उदगीर, अहमदपूर, औसा, निलंगा, चाकूर, देवणी, जळकोट आणि शिरूर अनंतपाळ या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य मतदार यादीत समाविष्ट आहेत. लातूर महानगरपालिकेनंतर उदगीरमध्ये ५३ मतदार असून अहमदपूरमध्ये ३५, औसा येथे ३६ आणि निलंगा येथे ३७ मतदार आहेत. चाकूर आणि रेणापूर येथे प्रत्येकी २५, देवणी व जळकोटमध्ये २३ तर शिरूर अनंतपाळ येथे २२ मतदार आहेत.
बीड जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव, वडवणी, बीड, शिरूर कासार, आष्टी, पाटोदा, धारूर, परळी, अंबाजोगाई आणि केज या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य मतदार म्हणून पात्र ठरले आहेत. परळी नगरपरिषदेत ४० मतदार असून अंबाजोगाई आणि अहमदपूरमध्ये प्रत्येकी ३५ मतदारांची नोंद आहे. बीड नगरपरिषदेत ५८, माजलगावमध्ये ३०, तर गेवराई आणि धारूर येथे प्रत्येकी २३ मतदार आहेत. वडवणी, शिरूर कासार, आष्टी, पाटोदा आणि केज या नगरपंचायतींमध्ये प्रत्येकी १९ मतदार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील ही मतदार यादी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत सदस्य हेच या निवडणुकीचे मतदार असल्याने राजकीय पक्षांनी संघटनात्मक तयारीला सुरुवात केली आहे. मतदार यादी जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला आणखी गती मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.