Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विरोधी पक्षाच्या खासदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; शिवाजी काळगेंनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

ग्रामीण भागातील विविध विकासकामांमधील अडचणी त्वरित दूर करून विकासाला गती द्यावी, अशी मागणी लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 29, 2026 | 03:22 PM
विरोधी पक्षाच्या खासदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; शिवाजी काळगेंनी केली 'ही' महत्वाची मागणी

विरोधी पक्षाच्या खासदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; शिवाजी काळगेंनी केली 'ही' महत्वाची मागणी

Follow Us
Follow Us:
  • विरोधी पक्षाच्या खासदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
  • शिवाजी काळगेंनी केली महत्वाची मागणी
  • ग्रामीण रस्ते, पाणी, वीज प्रश्नांवर चर्चा
लातूर : ग्रामीण भागातील विविध विकासकामांमधील अडचणी त्वरित दूर करून विकासाला गती द्यावी, अशी मागणी लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या लोकसभा सदस्यांनी राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघांशी संबंधित विकासकामे, निधीवाटप, प्रशासकीय व प्रोटोकॉलच्या प्रश्नांबाबत मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. लोकसभा मतदारसंघांचा व्यापक भौगोलिक व लोकसंख्यात्मक विस्तार लक्षात घेता विकासकामांसाठी अधिक न्याय्य निधी उपलब्ध करून देणे, जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपात खासदारांच्या योग्य विचार करणे, पायाभूत सुविधा निधी, ग्रामसडक योजना, ग्रामीण मार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते विकासकामांच्या नियोजनात संबंधित खासदारांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करावा, अशा मागण्या यावेळी केल्या.

विरोधी खासदारांना निधीबाबत मुख्यमंत्र्यांची ग्वाही

खासदार शाहू छत्रपती यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीस खासदार सुप्रिया सुळे, खासदार अरविंद सावंत, खासदार डॉ. शिवाजी काळगे, खासदार विशाल पाटील, खासदार शोभा बच्छाव, खासदार कल्याण काळे, खासदार बळवंत वानखेडे, खासदार बजरंग सोनवणे आणि खासदार प्रतिभा धानोरकर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिनिधित्व केलेल्या मतदारसंघांनाही स्थानिक विकासकामांसाठी निधीवाटपात समान व न्याय्य वागणूक दिली जाईल, अशी ग्वाही दिली. बैठकीत मांडण्यात आलेल्या विविध प्रश्नांवर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

हे सुद्धा वाचा : जुन्या किरकोळ कारणावरून तरुणाचा खून, आईने आरडाओरड केली पण…; नांदेड जिल्ह्यातील घटनेनं खळबळ

ग्रामीण रस्ते, पाणी, वीज प्रश्नांवर चर्चा

खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील कामे, ग्रामीण भागातील रस्त्यांची आवश्यकता तसेच शेतकऱ्यांना वीज जोडण्या उपलब्ध करून देताना येणाऱ्या अडचणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिल्या. जलजीवन मिशनच्या अंमलबजावणीतील अडचणी आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांवरही चर्चा झाली. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत खासदारांचा सहभाग, जिल्हास्तरीय शासकीय कार्यक्रमांमध्ये लोकसभा सदस्यांना प्रोटोकॉलनुसार योग्य स्थान व सन्मान आणि आवश्यक प्रशासकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेच्या कथित पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्यात आल्याच्या मुद्द्यावरही विरोधी पक्षाच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणात जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

Web Title: Opposition mps from maharashtra held a meeting with chief minister devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Congress
  • Latur news

संबंधित बातम्या

Sunil Tatkare : शेतकऱ्यांच्या ५ हजारांच्या मदतीवर तटकरे नाराज; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, अर्थमंत्री पदावरूनही केलं मोठं वक्तव्य
1

Sunil Tatkare : शेतकऱ्यांच्या ५ हजारांच्या मदतीवर तटकरे नाराज; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, अर्थमंत्री पदावरूनही केलं मोठं वक्तव्य

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ
2

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ

पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात
3

पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Latur News: रुग्णालयातील अस्वच्छतेवर राज्यमंत्री आक्रमक; वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना जाब
4

Latur News: रुग्णालयातील अस्वच्छतेवर राज्यमंत्री आक्रमक; वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना जाब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.