Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘महाराष्ट्र फक्त मराठा समाजासाठीच आहे का?’ मराठा समाजासाठी आठ योजनांच्या घोषणेवर लक्ष्मण हाकेचा सरकारला सवाल

मराठा समाजासाठी ८ विशेष योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या निर्णायावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिल्या असून "महाराष्ट्र म्हणजे फक्त मराठा समाजासाठीच आहे का?" असा सवाल उपस्थित केला आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 05, 2026 | 09:39 PM
Laxman Hake, OBC Leader Laxman Hake, Maharashtra government, eight schemes for Maratha community, Maratha Reservation,

Laxman Hake, OBC Leader Laxman Hake, Maharashtra government, eight schemes for Maratha community, Maratha Reservation,

Follow Us
Follow Us:

राज्य सरकारतर्फे आज (शुक्रवार, ५ जून) सकाळीच मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय मंजूर करण्यात आला होता. अश्यातच, आता मराठा समाजासाठी ८ विशेष योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या या निर्णयानुसार, मराठा समाजातील हजारो विद्यार्थ्यांना उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. अश्यातच आता या निर्णायावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिल्या असून “महाराष्ट्र म्हणजे फक्त मराठा समाजासाठीच आहे का?” असा सवाल उपस्थित केला आहे.

राज्यातील मराठा समाजबांधवांसाठी आनंदाची बातमी असून राज्य सरकारने मराठा समाजच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. आता इतर मागासवर्गीय समजाप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक सवलती आणि इतर सोयी-सुविधा लागू करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याच अनुषंगाने मराठा समाजासाठी ८ विशेष योजना सुरु करण्यात आल्या आहेत.

काय म्हणाले लक्ष्मण हाके?

राज्य सरकारच्या या निर्णयानंतर लक्ष्मण हाके म्हणाले, “ओबीसी समाजातील योजनांना निधी नाही, ओबीसी महामंडळाला अध्यक्ष नाही. समाज कल्याण विभागाचा हजारो कोटी रुपयांचा निधी इतरत्र वळवला जातो. ओबीसी समुदायातील १८ महामंडळांची घोषणा निवडणुकीला सामोरे जाताना सरकारने केली होती. पण त्या १८ महामंडळाला साधा अध्यक्षही नाही आणि निधी सुद्धा नाही, कार्यालय नाही आणि शिपाई पण नाही. महाराष्ट्र फक्त मराठा समाजासाठीच आहे का?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, “मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी काही सवलती देणार असाल तर त्याच स्वागत लक्ष्मण हाके करणार आहे. पण महाज्योतीला जो निधी मिळतो तो सारथीच्या तुलनेत किती मिळतो? आठ लाख कोटी रुपयांच्या बजेटमध्ये ५०% हुन अधिक जास्त लोकसंख्येला म्हणजे ओबीसीला अर्ध्या टक्क्याची बजेटची तरतूद असावी. फडणवीस साहेब तुम्ही १२-१३ कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहात, परंतु ओबीसींच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता मिळाल्यात. मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांना तुम्ही रेड कार्पेट आजही घालता. आम्हाला आजही तुम्ही सापत्न वागणूक देत आहेत. आजही तुम्ही एससी एसटी आणि ओबीसी बांधवांवर अन्याय करत आहात, तुमच्या धोरणाचा आम्ही जाहीर निषेध करतो,” अश्या शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली.

NEET Exam: ‘नीट’ परीक्षा पारदर्शक आणि तणावरहित वातावरणात पार पाडा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडक निर्देश

मराठा समाजाला मिळणार या आठ नव्या सवलती

  • शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती
दहावीनंतरच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचा लाभ
शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती मराठा विद्यार्थ्यांनाही लागू
  • उच्च शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळणार
वाहन चालक व वाहक प्रशिक्षक
रोजगाराभिमुख प्रशिक्षणाला प्रोत्साहन
वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना सुरू होणार
  • कौशल्य विकासाद्वारे रोजगाराच्या नवीन संधी
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती
9 वी ते 12 वी विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती
माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना मदत
  • शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत
शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती
व्यावसायिक शिक्षणाचा खर्च कमी होणार
विविध अभ्यासक्रमांच्या शुल्काची प्रतिपूर्ती
  • विद्यार्थ्यांवरील आणि पालकांवरील आर्थिक भार कमी
परराज्यातील शिक्षणासाठी सवलत
परराज्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लाभ
महाराष्ट्रातील मराठा विद्यार्थ्यांना बाहेरील राज्यांतील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मदत
  • अनुदानित व विनाअनुदानित संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्यांनाही फायदा
सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मराठा विद्यार्थी पात्र
सर्व मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी पात्रता
मराठा विद्यार्थ्यांना व्यापक शैक्षणिक संधी
  • विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये प्रवेशाचा मार्ग मोकळा
रिक्त जागांवर प्रवेश घेणाऱ्यांनाही लाभ
संस्थास्तरावरील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सवलती
CAP नंतरच्या रिक्त जागांवर प्रवेश घेतलेल्यांना लाभ
  • शैक्षणिक मदतीत समानतेचा दृष्टिकोन
भविष्यातील नवीन सवलतीही आपोआप लागू
ओबीसींसाठी जाहीर होणाऱ्या नव्या शैक्षणिक सुविधा मराठा समाजालाही मिळणार
स्वतंत्र आदेशाची प्रतीक्षा करण्याची गरज नाही

राज्य सरकारचा मोठा निर्णय! मराठा समाजासाठी आठ नव्या योजना, ओबीसींप्रमाणे शैक्षणिक सवलती मिळणार

Web Title: Laxman hake questions maharashtra government over announcement of eight schemes for the maratha community

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 09:37 PM

Topics:  

  • Laxman hake
  • Maharashtra Governement
  • Maratha Arakshan

संबंधित बातम्या

ओबीसींच्या न्याय हक्कासाठी ओबीसी जनता पार्टी काढणार; प्रा. लक्ष्मण हाके यांची महत्त्वपूर्ण घोषणा
1

ओबीसींच्या न्याय हक्कासाठी ओबीसी जनता पार्टी काढणार; प्रा. लक्ष्मण हाके यांची महत्त्वपूर्ण घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.