दिल्ली : आज लोकसभा निवडणूक निकाल लागणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली आहे. संपूर्ण देशासहस संपूर्ण जगभरातून भारताच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. भाजप हॅटट्रीक करणार का आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने सुरुवातीपासून 400 पारचा नारा दिला आहे. देशातील एकूण 543 लोकसभा निवडणुकीच्या जागांवर मतदान पार पडत आहे. सर्वांत जास्त लोकसभेच्या जागा उत्तर प्रदेश व महाराष्ट्रामध्ये आहेत. दोन्ही राज्यांमध्ये अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपला धक्का बसला आहे. त्यामुळे भाजप यंदा 400 पारचा दिलेला नारा पूर्ण करु शकेल का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
भाजप 400 पार होणार का ?
नरेंद्र मोदी हे वाराणसीमधून लोकसभेला उभे आहेत. तर अमित शाह हे गांधीनगरमधून निवडणूक लढवत आहेत. नरेंद्र मोदी यांनी आपल्या मतदारसंघामध्ये आघाडी कायम राखली आहे. तसेच अमित शाह यांनी गांधीनगरमध्ये तब्बल 75 हाजर मतांची आघाडी घेतली आहे. भाजप नेते आघाडीवर असले तरी अनेक ठिकाणी भाजपला धक्का बसला आहे. एकूण 543 जागांसाठी निवडणूक झाली असून तब्बल 290 मतदारसंघामध्ये भाजपने आघाडी मिळवली असल्याचे कलांमधून दिसत आहे. तर इंडिया आघाडीने एनडीए आघाडीला ‘काटे की टक्कर’ दिली आहे. इंडिया आघाडीला देशामध्ये 230 जागांचा कल दाखवला जात आहे. त्यामुळे एनडीए आघाडीवर इंडिया आघाडी यांच्यामध्ये जास्त जागांचा फरक सध्या तरी दिसून येत नाही. इतर पक्षांना 19 जागा मिळत असल्याचा कल समोर येत आहे. देशभरामध्ये मतमोजणी अद्याप सुरु असली तरी कलांप्रमाणे इंडिया आघाडी देखील चुरशीची लढत देत आहे. त्यामुळे भाजपने दिलेला 400 पारचा नारा सध्या तरी शक्य होणार नसल्याचे चित्र समोर आहे.
राज्यामध्ये देखील भाजपला धक्का
राज्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी रंगदार लढत झाली. राज्याचे राजकीय गणित बदलल्यानंतर पहिलीच लोकसभा निवडणूक पार पडत आहे. राज्यामध्ये एकूण 48 लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडत असून यामध्ये महायुतीला 22 जागा तर महाविकास आघाडीला तब्बल 25 जागांचा कल मिळत आहे. अनेक भाजपचे स्टार उमेदवार पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. यामध्ये अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा तसेच बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे या पिछाडीवर असल्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. मराठवाड्यामध्ये भाजपची एकाही जागेवर आघाडी नाही. तसेच राज्यातील तीन केंद्रीय मंत्री देखील पिछाडीवर आहे. नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे आणि भारती पवार हे भाजप उमेदवार पिछाडीवर आहे. तसेच कपिल पाटील देखील पिछाडीवर आहे. देशातील सर्वात जास्त लोकसभा मतदारसंघ असलेले दुसरे मोठे राज्य म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रामध्ये भाजपला मोठा धक्का बसत आहे. त्यामुळे भाजप 400 पार करेल का नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.