Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aditya Thackeray News: महाविकास आघाडीच्या नेत्यांचा शपथविधीवर बहिष्कार; आदित्य ठाकरे स्पष्टचं बोलले

आज शिवसेना-यूबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या सभेसाठी नाना पटोले मातोश्रीवर पोहोचले आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Dec 07, 2024 | 02:58 PM
Aditya Thackeray News: महाविकास आघाडीच्या नेत्यांचा शपथविधीवर बहिष्कार; आदित्य ठाकरे स्पष्टचं बोलले
Follow Us
Follow Us:

मुंबई:  “ईव्हीएममुळे लोकशाहीची हत्या होत असल्याने आजच्या आमदारांच्या शपथविधीवर आम्ही बहिष्कार टाकला. आम्हाला ईव्हीएमबाबत शंका आहेत. हा महाराष्ट्रातील जनतेचा जनादेश नाही. हा ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाचा आदेश आहे, त्यामुळे उद्धव गटाचे आमदार आज शपथ घेणार नाहीत. जनादेश असता तर लोकांनी आनंद साजरा केला असता, पण जनतेने कोणताही जल्लोषही केला नाही, लोकांच्या मनात शंका असल्याने आम्ही शपथ घेणार नाही, ” अशी प्रतिक्रीया ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ते मुंबईत बोलत होते.

विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीला सर्वाधिक 230 जागांवर विजय मिळाला. पण निकालाच्या दिवसापासून विरोधीपक्षनेत्यासह देशभरातील राजकीय विश्लेषकांनीही या निकालावर संशय घेण्यास सुरूवात केली.  विरोधी पक्ष  आणि सत्ताधाऱ्यांकडून इव्हीएममध्येच घोळ असल्याचा  आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडताना दिसत आहेत. अशातच आजपासून महाराष्ट्र विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे.

Karad Accident News: ट्रकची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार ठार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह एनडीएच्या अनेक सदस्यांनी विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. मात्र महाविकास आघाडीच्या सदस्यांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीत ईव्हीएमचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत  महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत असल्याचे सांगितले.  23 नोव्हेंबरला महाराष्ट्रात निकाल जाहीर झाल्यापासून विरोधी महाविकास आघाडी ईव्हीएममध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत आहे. अनेक जागांवर मतमोजणी मतदानापेक्षा जास्त झाली असून अनेक जागांवर मतदानापेक्षा कमी मतमोजणी झाल्याचा त्यांचा दावा आहे. अनेक उमेदवार फेरमतमोजणी करण्याची मागणीही करत आहेत.

 मातोश्रीवर एमव्हीएची बैठक

दुसरीकडे आज शिवसेना-यूबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या सभेसाठी नाना पटोले मातोश्रीवर पोहोचले आहेत. या बैठकीत ईव्हीएमद्वारे मतदानाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. विशेषत: मारकडवाडी गावातील वातावरणावर विरोधक आपली भूमिका घेणार आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, निकालाने प्रश्न निर्माण केले आहेत. संपूर्ण प्रक्रियाच भ्रष्ट असल्याचे दिसते. जनता नाखूष आहे आणि काहीतरी चुकले आहे असे दिसते. विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हंगामी सभापती कालिदास कोळंबकर नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक आमदारांनी शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी अधिवेशनापूर्वी भाजप नेते कोळंबकर यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली.

महाविकास आघाडीला मोठा झटका! मविआतून बाहेर पडण्याचा समाजवादी पक्षाचा

अजित पवारांचा टोला?

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “असे आरोप करण्यात काही अर्थ नाही.  विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे जावे आणि तेथेही न्याय न मिळाल्यास न्यायालयात जावे. विरोधक आज सभागृहावर बहिष्कार का घालत आहेत, हेच कळत नाही. लोकांनी मतदान करून निर्णय घेतला आहे. आता बाहेर पडण्यात काही अर्थ नाही.”

Web Title: Maha vikas aghadi leaders boycott the oath taking ceremony aditya thackeray said nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2024 | 02:57 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • Mahavikas Aghadi
  • Mahayuti

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: सचिन अहिर नंतर आता ‘हा’ आमदार फुटण्याची चर्चा, ठाकरेसेनेचं टेन्शन वाढलं, आदित्यंचं काय होणार?
1

Maharashtra Politics: सचिन अहिर नंतर आता ‘हा’ आमदार फुटण्याची चर्चा, ठाकरेसेनेचं टेन्शन वाढलं, आदित्यंचं काय होणार?

Maharashtra Politics: शिंदेंची मोठी खेळी! सचिन अहिर यांनाच उमेदवारी देण्यामागे काय आहे रणनीती?
2

Maharashtra Politics: शिंदेंची मोठी खेळी! सचिन अहिर यांनाच उमेदवारी देण्यामागे काय आहे रणनीती?

Aditya Thackeray on Sachin Ahir: कारवाई तर होणारच! सचिन अहिर यांच्या पक्षांतरानंतर आदित्य ठाकरेंचा इशारा
3

Aditya Thackeray on Sachin Ahir: कारवाई तर होणारच! सचिन अहिर यांच्या पक्षांतरानंतर आदित्य ठाकरेंचा इशारा

‘शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे’; भाजप सरकारवर हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात, कर्जमाफीसाठी एल्गार तीव्र
4

‘शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे’; भाजप सरकारवर हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात, कर्जमाफीसाठी एल्गार तीव्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.