Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahabaleshwar News: महाबळेश्वर येथे अत्याधुनिक एक्स-बँड रडार कार्यान्वित, हवामान अंदाजात नवे पर्व

महाबळेश्वर येथे अत्याधुनिक डॉप्लर वेदर रडार कार्यान्वित झाले आहे. यामुळे पुणे, सातारा आणि मुंबईसाठी अतिवृष्टीचा अंदाज ६ तास आधी मिळणार असून 'मिशन मौसम' अंतर्गत ही मोठी झेप मानली जात आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 28, 2026 | 08:54 PM
Mahabaleshwar News: महाबळेश्वर येथे अत्याधुनिक एक्स-बँड रडार कार्यान्वित, हवामान अंदाजात नवे पर्व
Follow Us
Follow Us:

 

  • महाबळेश्वर येथे अत्याधुनिक एक्स-बँड रडार कार्यान्वित
  • हवामान अंदाजात नवे पर्व
महाबळेश्वर : महाबळेश्वर येथे भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम) यांच्या ‘मिशन मौसम’ अंतर्गत उभारण्यात आलेले अत्याधुनिक ‘एक्स-बँड ड्युअल पोलरायझेशन डॉप्लर वेदर रडार’ २४ एप्रिल २०२६ रोजी कार्यान्वित करण्यात आले. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रवीचंद्रन यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले.

महाबळेश्वरमधील ‘हाय अल्टिट्यूड क्लाउड फिजिक्स लॅबोरेटरी’ (HACPL) येथे सुमारे १४०० मीटर उंचीवर स्थापित करण्यात आलेले हे रडार पुणे, सातारा तसेच मुंबईच्या काही भागांसाठी हवामान अंदाज क्षमतेत मोठी भर घालणार आहे. विशेषतः ‘नाऊकास्टिंग’ (तात्काळ हवामान अंदाज) क्षमता आता ६ तासांपर्यंत वाढणार असून मेघगर्जना, अतिवृष्टी आणि वादळी प्रणालींचा अचूक मागोवा घेणे शक्य होणार आहे.

या अत्याधुनिक प्रणालीमुळे ढगांची सूक्ष्म रचना (क्लाउड मायक्रोफिजिक्स), पर्जन्याचे स्वरूप, थेंबांचे आकार व वितरण तसेच वादळांची अंतर्गत संरचना याबाबत उच्च विभेदनातील (हाय-रेझोल्यूशन) माहिती मिळणार आहे. परिणामी, अतिवृष्टी, ढगफुटी, धुके आणि वेगवान वाऱ्यांच्या घटनांचे अधिक अचूक वर्गीकरण व अंदाज शक्य होणार आहेत.

ही रडार प्रणाली सॉलिड-स्टेट पॉवर ॲम्प्लिफायर तंत्रज्ञानावर आधारित असून ऊर्जा कार्यक्षम आणि कमी देखभाल खर्चाची आहे. पश्चिम घाटातील भौगोलिकदृष्ट्या जटिल व पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागात हवामान बदलांचे बारकाईने निरीक्षण करण्यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

हुमगाव-बावधन रस्त्याला बांधकाम मंत्र्यांकडून हिरवा कंदील; जावळीकरांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने ठोस पाऊल

तसेच, या रडारमधून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग हवामान व हवामानबदल मॉडेल्स अधिक सक्षम करण्यासाठी होणार असून अत्यंत तीव्र हवामान घटनांच्या (एक्स्ट्रीम वेदर) अचूक अंदाजात लक्षणीय सुधारणा अपेक्षित आहे. पूरस्थितीची पूर्वसूचना, विमान वाहतूक सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, कृषी सल्ला सेवा आणि जलसंपदा नियोजनासाठीही ही प्रणाली महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

दरम्यान, आयआयटीएम आणि इस्रोच्या स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर यांच्यात हवामान उत्पादने विकसित करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. उपग्रह आणि भूमीवरील निरीक्षणांचे एकत्रीकरण, अंदाज अचूकता वाढविणे आणि हवामान संशोधन क्षमतेचा विकास या करारातून साध्य होणार आहे. एकूणच, महाबळेश्वर येथील अत्याधुनिक रडार प्रकल्पामुळे देशातील हवामान विज्ञानाला नवे बळ मिळणार असून अचूक अंदाज आणि वेळीच इशारा देण्याच्या क्षमतेत मोठी झेप घेतली जाणार आहे.

राजवाडा चौपाटीवर ‘स्वच्छता-शिस्त संहिता’ लागू; व्यावसायिकांची एकजूट, कठोर निर्णयांची अंमलबजावणी

Web Title: Mahabaleshwar doppler weather radar mission mausam pune satara rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 08:54 PM

Topics:  

  • Mahabaleshwar News
  • Satara News

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
1

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
2

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा;  शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी
3

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा; शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी

सातारा शहरातील ५८ मंडळांच्या गणरायांचे विसर्जन; जिल्ह्यात ५३३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला निरोप
4

सातारा शहरातील ५८ मंडळांच्या गणरायांचे विसर्जन; जिल्ह्यात ५३३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला निरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.