Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahabaleshwar News: पोलीस स्टेशनवर मॅप्रोचा लोगो का? ऑनलाइन तक्रारीनंतर महाबळेश्वर पोलीस ठाण्यावरील खाजगी कंपनीचा फलक हटवला

महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरील अधिकृत फलकावर खाजगी कंपनीचा लोगो दिसत असल्याची तक्रार ‘आपले सरकार’ पोर्टलवर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित फलक हटवण्याची कारवाई केली. या घटनेनंतर परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 27, 2026 | 12:24 PM
पोलीस स्टेशनवर मॅप्रोचा लोगो का? ऑनलाइन तक्रारीनंतर महाबळेश्वर पोलीस ठाण्यावरील खाजगी कंपनीचा फलक हटवला

पोलीस स्टेशनवर मॅप्रोचा लोगो का? ऑनलाइन तक्रारीनंतर महाबळेश्वर पोलीस ठाण्यावरील खाजगी कंपनीचा फलक हटवला

Follow Us
Follow Us:
  • ‘आपले सरकार’ तक्रारीचा परिणाम
  • महाबळेश्वर पोलीस ठाण्यावरील खाजगी बोर्ड काढला
  • महाबळेश्वर पोलीस ठाण्यावरील खाजगी कंपनीचा फलक हटवला
मेढा : थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर येथे एका जागरूक नागरिकाने महाबळेश्वर पोलीस स्टेशनने लावलेल्या फलकावर लेखी तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने महाबळेश्वर पोलीस ठाणे प्रवेशद्वारावर लावण्यात आलेला सदरचा खाजगी कंपनीचा फलक काढण्याची कारवाई करून अर्ज निकाली काढण्यात आला. या बाबत आता उलट सुलट चर्चा सुरू झालेली आहे.

याबाबत आपले सरकार पोर्टलवर सादिक सय्यद यांनी ऑनलाईन तक्रार अर्ज दाखल केला होता.सदर अर्जात महाबळेश्वर पोलीस ठाणे जि. सातारा चे अधिकृत सरकारी फलकाचे उजवे बाजुस मॅप्रो चा लोगो ठळकपणे प्रदर्शीत केलेला दिसुन येत आहे असे म्हटले होते. त्यानुसार सदरचा फलक काढुन टाकण्यात आलेला आहे. व पोलीस स्टेशनचे इमारतीवर खाजगी बोर्ड लागणार नाहीत तसेच अशाप्रकारचे फलक लावण्यात येवु नये. असे सुचना दिलेल्या आहेत. तरी केलेला तक्रारी अर्ज निकाली काढत आहोत. असे समजपत्र संबंधित तक्रारदारास देऊन या प्रकरणावर महाबळेश्वर पोलीस ठाण्याने पडदा टाकण्याचे काम केले आहे.

Matheran News: माथेरानच्या पाणीपुरवठ्यावर संकट? शार्लोट लेक २०१३ पासून गाळमुक्तच नाही, मनसे आक्रमक

वास्तविकरीत्या सरकारी जागेवर विनापरवानगी खाजगी जाहिरात (बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग) लावल्यास महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार कायदेशीर कारवाई केली जाते . अनधिकृत जाहिरात फलक किंवा बॅनर जप्त करून नष्ट केले जातात आणि काढण्याचा संपूर्ण खर्च संबंधित जाहिरातदाराकडून वसूल केला जातो.

अनधिकृत जाहिरात लावणाऱ्या जाहिरातदारावर, संबंधित मालकावर आणि प्रिंटरवर गुन्हे दाखल केले जातात. ‘महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम, १९९५’ (Maharashtra Prevention of Defacement of Property Act, 1995) अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास ३ महिन्यांपर्यंत कारावास किंवा २,००० रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. अशी स्पष्ट तरतूद असताना महाबळेश्वर पोलीस ठाण्याने मॅप्रो अक्षर खोडून फक्त महाबळेश्वर पोलीस ठाणे असा फलक दर्शनी भागात पुन्हा लावला आहे. असे सुकृत दर्शनी दिसत आहे.

कायद्याची अंमलबजावणी तातडीने व्हावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावा यासाठी अनेक जण पोलिस ठाण्यात धाव घेतात. अनाधिकृत कोणतीही परवानगी न काढता महाबळेश्वर पोलीस ठाण्यात फलक लावल्या बाबत मॅप्रो कंपनीवर कोणती कारवाई झाली? याची माहिती तक्रारदार व जनतेला समजली पाहिजे. असा सूर आता महाबळेश्वर शहरात उमटत आहे.तसेच कोणाच्या सांगण्यावरून मॅप्रो कंपनीचा फलक लावला होता. याचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई व्हावी. अशी आता मागणी पुढे येत आहे.

Health Department : शासकीय बदल्यांच्या धोरणावरून आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये उभी फूट; रद्द की नियमित, वाद तीव्र

Web Title: Mahabaleshwar police station private company board removed after complaint

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 12:24 PM

Topics:  

  • Mahabaleshwar
  • Maharashtra Police
  • police

संबंधित बातम्या

Washim News: ‘कोम्बिंग’मध्ये ७ फरार आरोपी जेरबंद; वाशिम पोलिसांनी जिल्ह्यामध्ये राबविली शोधमोहीम
1

Washim News: ‘कोम्बिंग’मध्ये ७ फरार आरोपी जेरबंद; वाशिम पोलिसांनी जिल्ह्यामध्ये राबविली शोधमोहीम

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
2

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’
3

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
4

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.