Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताची सुवर्ण घौडदौड

२१ ऑक्टोबर २०२६ च्या महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी. सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ, जिओ प्लॅटफॉर्म्सचा ३० हजार कोटींचा महा-आयपीओ आजपासून खुला, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ भारत दौऱ्यावर आणि आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताची सुवर्ण घौडदौड; वाचा सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 21, 2026 | 10:25 AM
LIVE
Maharashtra Breaking News Today 21.10.2026

Maharashtra Breaking News Today 21.10.2026

Follow Us
Follow Us:
  • 21 Oct 2026 10:55 AM (IST)

    21 Oct 2026 10:55 AM (IST)

    आता ‘उर्मिला कानेटकर’! आदिनाथ कोठारेपासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्रीने बदललं युजरनेम; पोस्टने वेधलं लक्ष

    मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेत्री उर्मिला कानेटकर आणि अभिनेता आदिनाथ कोठारे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या विभक्त होण्याच्या निर्णयामुळे चर्चेत आहेत. आता उर्मिलाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील नावात बदल केल्याचं दाखवलं आहे. दसऱ्याच्या दिवशी तिने ही पोस्ट शेअर केली असून, तिच्या नव्या नावाने आणि कॅप्शनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

  • 21 Oct 2026 10:45 AM (IST)

    21 Oct 2026 10:45 AM (IST)

    शेअर बाजारात आज काय घडणार? गुंतवणूकदारांना मिळणार का कमाईची संधी? जाणून घ्या

    २१ ऑक्टोबर रोजी आज भारतीय शेअर बाजार सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आज गुंतवणूकदारांना कमाईची संधी मिळण्याची शक्यता आहे. मारुती सुझुकी इंडिया लि., करूर वैश्य बँक लि., एचएमए ॲग्रो इंडस्ट्रीज लि., रत्नवीर प्रिसिजन इंजिनिअरिंग लि., साउथ इंडियन बँक लि. चे शेअर्स आज गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे ठरू शकतात.

  • 21 Oct 2026 10:35 AM (IST)

    21 Oct 2026 10:35 AM (IST)

    अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

    लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही. गृहमंत्री अमित शाह हेच देशातील सर्व माफिया चालवतात. तेच लॉरेन्स बिश्नोई आहेत. शस्त्र आता गुंडांच्या हाती गेली आहेत. त्या गुंडांचे सरदार अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस आहेत. यावर उत्तर एकच आहे ते म्हणजे शिवसेना. जो शिवसेनेचे नाव घेईल त्याचे संरक्षण होईल. पुढच्या दसरा मेळाव्यात इथे आपला धनुष्यबाण असेल, असे भाकितही खासदार संजय राऊतांनी केले.

  • 21 Oct 2026 10:25 AM (IST)

    21 Oct 2026 10:25 AM (IST)

    ३५ वर्षे जुन्या जलकुंभाची जागा घेणार नवा जलकुंभ; कोपरखैरणेतील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी महापालिकेचा पुढाकार

    कोपरखैरणे सेक्टर-२३ येथील सिडकोकालीन आणि सुमारे ३५ वर्षे जुना झालेला जलकुंभ कमकुवत असल्याने तो पाडून त्या ठिकाणी नवीन तळस्तरीय आणि उच्चस्तरीय जलकुंभउभारण्यात येणार आहे. यासाठी सुमारे ११ कोटी ६ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, या कामाच्या निविदेला आर्थिक मंजुरी मिळण्यासाठीचा प्रस्ताव गुरुवारी, २२ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीसमोर मांडण्यात येणार आहे. सेक्टर-२३ येथील जुन्या उच्चस्तरीय जलकुंभाची क्षमता २.५ दशलक्ष लिटर होती.

  • 21 Oct 2026 10:25 AM (IST)

    21 Oct 2026 10:25 AM (IST)

    Sanjay Raut: अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

    लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही. गृहमंत्री अमित शाह हेच देशातील सर्व माफिया चालवतात. तेच लॉरेन्स बिश्नोई आहेत. शस्त्र आता गुंडांच्या हाती गेली आहेत. त्या गुंडांचे सरदार अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस आहेत. यावर उत्तर एकच आहे ते म्हणजे शिवसेना. जो शिवसेनेचे नाव घेईल त्याचे संरक्षण होईल. पुढच्या दसरा मेळाव्यात इथे आपला धनुष्यबाण असेल, असे भाकितही खासदार संजय राऊतांनी केले.

    एकनाथ शिंदे गटाच्या मेळाव्याला ‘बिकाऊ मालाचा मेळावा’ म्हणत खिल्ली उडवली. राज्यात दोन शिवसेनेचे मेळावे होत असल्याच्या प्रश्नावर राऊत भडकले. ते म्हणाले, दोन मेळावे होतायत असे विचारणाऱ्या पत्रकाराला मी शटअप (चूप बसा) सांगितले. शिवसेना एकच आहे, ती बाळासाहेब ठाकरेंची. शिवतीर्थावर समोर बसलेला हा ‘टिकाऊ माल’ आहे आणि तिकडे गेलेला ‘बिकाऊ माल’ आहे. तिकडे कसला मेळावा ? ते दांडिया खेळत बसले असतील. त्यांच्याकडे कोणताही विचार किंवा संघर्ष नाही.

  • 21 Oct 2026 10:15 AM (IST)

    21 Oct 2026 10:15 AM (IST)

    Mumbai Massive Fire 2 Deaths 4 Injured  मुंबईत भीषण आगीत ६० ते ७० गाळे अन् चाळी जळून खाक, दोघांचा होरपळून मृत्यू तर चौघे गंभीर

    मुंबईतून एक अत्यंत मोठी आणि हादरवून टाकणारी दुर्घटना समोर आली आहे. मुंबईत व्यावसायिक गाळे आणि चाळींना लागलेल्या भीषण आगीत दोघांचा जिवंत जळून मृत्यू झाला असून, अन्य चौघे जण गंभीररीत्या भाजले आहेत. या सर्व जखमींना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अंदाजे ४ हजार बाय ४ हजार चौरस फुटांच्या परिसरातील तब्बल ६० ते ७० व्यावसायिक गाळे आणि चाळींमधील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे.यामध्ये कपड्यांचा साठा, प्लास्टिक ग्रॅन्युल्स, भंगार साहित्य, लाकडी फर्निचर, एलपीजी सिलिंडर, मशिनरी आणि इलेक्ट्रिक वायरिंगचा समावेश होता, ज्यामुळे आग वेगाने पसरली.

  • 21 Oct 2026 10:15 AM (IST)

    21 Oct 2026 10:15 AM (IST)

    कराडजवळ भीषण अपघात; दर्शन घेऊन परतले, पण घरी पोहोचलेच नाहीत,चौघांचा दुर्दैवी अंत

    सातारा जिल्ह्यातील कराड शहराजवळ पुणे-बेंगलोर महामार्गावरील नव्या सहापदरी उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिराचे दर्शन घेऊन स्कॉर्पिओ गाडीने गावाकडे परतणाऱ्या सात तरुणांच्या वाहनाची ट्रकला मागून धडक बसली. या अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. काही दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आलेल्या या नव्या उड्डाणपुलावरील हा पहिलाच अत्यंत भीषण अपघात ठरला आहे.

  • 21 Oct 2026 10:05 AM (IST)

    21 Oct 2026 10:05 AM (IST)

    6700mAh बॅटरीसह नवा Poco 5G स्मार्टफोन लाँच! 50MP कॅमेरा अन् 120Hz OLED डिस्प्लेसह मिळणार तगडे फीचर्स, वाचा सविस्तर

    टेक कंपनी पोकोने वियतनाममध्ये Poco X8s हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या Poco X8 सीरीजचा 5वा स्मार्टफोन आहे. यापूर्वी कंपनीने या सिरीजअंतर्गत Poco X8 Pro, X8 Pro Max, X8, आणि X8 Power हे स्मार्टफोन्स लाँच केले होते. त्यानंतर आता कंपनीने या सिरीजअंतर्गत आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. नव्या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

  • 21 Oct 2026 10:05 AM (IST)

    21 Oct 2026 10:05 AM (IST)

    Harmanpreet Kaur  Emotional Interview: कर्णधारपद सोडल्यानंतर हरमनप्रीत कौरची पहिलीच भावनिक प्रतिक्रिया

    भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी आणि धडाकेबाज खेळाडू हरमनप्रीत कौर हिच्यासाठी झिम्बाब्वेविरुद्धचा तिसरा टी-20 सामना अत्यंत संस्मरणीय ठरला. एका बाजूला तिने आपल्या तुफानी फलंदाजीने मैदान गाजवले, तर दुसऱ्या बाजूला सामना संपल्यानंतरच्या मुलाखतीत तिच्या भावना अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. कर्णधारपद सोडल्यानंतरच्या पहिल्याच मुलाखतीत तिच्या डोळ्यात पाणी आल्याने क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

     

  • 21 Oct 2026 09:55 AM (IST)

    21 Oct 2026 09:55 AM (IST)

    Maharashtra And South India Rain Alert: महाराष्ट्रासह दक्षिण भारताला हवामान विभागाचा यलो-ऑरेंज अलर्ट 

    देशातील अनेक भागांमध्ये हवामानाने पुन्हा एकदा मोठे वळण घेतले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज देशातील १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. मान्सूनोत्तर पावसाची शक्यता आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक भागांत ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    हवामान विभागाने जारी केलेल्या अलर्टनुसार दक्षिण भारत, ईशान्य भारत आणि महाराष्ट्रातील काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो.तामिळनाडू, पुडुचेरी, केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये परतीचा पाऊस आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

  • 21 Oct 2026 09:44 AM (IST)

    21 Oct 2026 09:44 AM (IST)

    Bapurao Pandhare Joins BJP:अकलूज बाजार समितीचे उपसभापती बापूराव पांढरे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

    माळशिरस तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (शरद पवार गट) मोठा राजकीय धक्का बसला आहे. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बापूराव पांढरे यांनी आपल्या समर्थकांसह अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाचा (BJP) हात धरला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला असून, या घडामोडीमुळे माळशिरसच्या पश्चिम भागात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे वर्चस्व असलेल्या भागात भाजपची ताकद आणखी मजबूत झाली आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या गटाचे मानले जाणारे बापूराव पांढरे यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला आहे. बापूराव पांढरे यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपचे नेते तथा माजी आमदार राम सातपुते यांची या भागातील राजकीय पकड आणि ताकद आणखी बळकट झाली आहे.

  • 21 Oct 2026 09:34 AM (IST)

    21 Oct 2026 09:34 AM (IST)

    Pune Bangalore Highway Car Accident: सातारा-पुणे बंगळुरू महामार्गावर झालेल्या अपघातात ४ मित्रांचा जागीच मृत्यू, ३ जण गंभीर

    सातारा जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी दुर्घटना समोर आली आहे. कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन आपल्या गावी परतणाऱ्या भाविकांच्या कारला एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. कराड शहराजवळ पुणे-बंगळुरू महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात एकाच गावातील चार जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चुराडा झाला असून कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत झालेले सर्व तरुण एकाच गावातील आणि एकमेकांचे जिवलग मित्र असल्याची माहिती समोर आल्याने गावात शोककळा पसरली आहे.

Maharashtra to World Breaking News :  

टायगर श्रॉफच्या गाडीवरील गोळीबार प्रकरणानंतर बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आल्याची माहिती आहे. दुसरीकडे, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्या घरांचीही रेकी झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा, तब्बल ३०,२१३ कोटी रुपयांचा जिओ प्लॅटफॉर्म्सचा (Jio Platforms) आयपीओ आजपासून (२१ ऑक्टोबर) गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. 

अमेरिका-भारत व्यापार करार आणि रशियन तेलाच्या आयातीबाबत चर्चेसाठी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर दाखल झाले आहेत.  जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताच्या दीप्ती जीवनजी आणि निषाद कुमार यांनी सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. मुंबईत ऑक्टोबर हीटचा तडाखा कायम असून हवामान खात्याने आज ३७ अंश सेल्सिअस तापमानाचा अंदाज वर्तवला आहे.

Web Title: Maharashtra and india breaking news live updates 21 october 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 09:23 AM

Topics:  

  • Maharashtra Breaking News update

संबंधित बातम्या

Maharashtra Live Breaking News in Marathi:  सतेज पाटलांनी गोकुळचं रान हाणलं! विजयाच्या दिशेने घौडदौड सुरू
1

Maharashtra Live Breaking News in Marathi: सतेज पाटलांनी गोकुळचं रान हाणलं! विजयाच्या दिशेने घौडदौड सुरू

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक
2

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक

Maharashtra Live Breaking News in Marathi: आजपासून दर गुरूवारी  पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद  राहणार
3

Maharashtra Live Breaking News in Marathi: आजपासून दर गुरूवारी पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.