Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Drug Peddler Action: अंमली पदार्थांविरोधात राज्य सरकारचा ‘मास्टर प्लॅन’;मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत इशारा

नागपूर पोलिसांनी ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कारवाया करत गेल्या ११ महिन्यांत ९०७ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवायांमध्ये सुमारे १२५४ किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत अंदाजे १० कोटी रुपये

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 17, 2026 | 04:26 PM
Maharashtra Anti-Drug Policy 2026,Devendra Fadnavis, Operation Thunder Nagpur Police,

Maharashtra Anti-Drug Policy 2026,Devendra Fadnavis, Operation Thunder Nagpur Police,

Follow Us
Close
Follow Us:
  • मोतीबाग येथील ड्रग्स तस्करांच्या घरांवर छापे टाकून गांजा व अग्निशस्त्रांचा साठा जप्त
  • नागपूर पोलिसांनी ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कारवाया
  • ११ महिन्यांत ९०७ गुन्हे उघडकीस, या कारवायांमध्ये सुमारे १२५४ किलो अंमली पदार्थ जप्त
 

Maharashtra Anti-Drug Policy 2026 : ड्रग्ज तस्करांविरोधात राज्य शासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्य शासन अंमली पदार्थां विरोधात ‘झिरो टॉलरन्स धोरण राबवणार आहे. अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींची संपत्ती जप्त करण्यासह कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. नागपुर शहरातील मोतीबाग परिसरात सापडलेल्या ड्रग्ज तस्करांविरोधात झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी यावर भाष्य केले आहे.

विधानसभेत मोतीबाग येथील ड्रग्स तस्करांच्या घरांवर छापे टाकून गांजा व अग्निशस्त्रांचा साठा जप्त करण्यात आल्याबाबत सदस्य प्रवीण दटके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत विकास ठाकरे, विक्रम पाचपुते आणि डॉ. नितीन राऊत यांनी सहभाग घेतला. प्रवीण दटके यांच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, संबंधित प्रकरणात सामाजिक गुन्हेगारी नियंत्रण कायदा, १९९९ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध चार्जशीट दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील टप्प्यात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

MSRTC: लालपरीचा होणार कायापालट! 2037 पर्यंत पूर्णतः इलेक्ट्रिक बसेस, प्रताप सरनाईक यांची माहिती

बेकायदेशीर बांधकाम आढळल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नोटीस देऊन महानगरपालिकेमार्फत योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच संबंधित भागात विशेष मोहीम राबवून अशा गुन्ह्यांना आळा घालण्यात येईल. भविष्यात अशा घटना घडल्यास संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

नागपूर पोलिसांनी ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कारवाया करत गेल्या ११ महिन्यांत ९०७ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवायांमध्ये सुमारे १२५४ किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत अंदाजे १० कोटी रुपये आहे. राज्यात ड्रग्सविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२३ रोजी अँटी नारकोटिक टास्क फोर्स (ANTF) स्थापन करण्यात आली आहे. ही यंत्रणा राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांपर्यंत विस्तारण्यात आली असून नवीन पदनिर्मितीद्वारे ती अधिक बळकट करण्यात आली आहे. केंद्र शासन व इतर राज्यांशी समन्वय वाढवून इंटेलिजन्स शेअरिंग केल्यामुळे आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय ड्रग्स नेटवर्कवर कारवाई शक्य होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस नमूद केले.

Adani ग्रुपच्या ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकचा बोलबाला, 2 दिवसात तब्बल 7.5% रिटर्न, जाणून घ्या कारण…

ड्रग्स प्रकरणांमध्ये केवळ गुन्हा नोंदवून थांबणार नसून ‘फॉरवर्ड’ आणि ‘बॅकवर्ड’ लिंक शोधून संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्यावर भर दिला जात आहे. तसेच अशा गुन्ह्यांमध्ये थेट किंवा अप्रत्यक्ष सहभाग आढळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाऐवजी थेट बडतर्फीची कारवाई केली जाईल. अल्पवयीन मुलांचा ड्रग्स तस्करीत वापर होत असल्याची बाब गंभीर असल्याचे नमूद करत, अशा गुन्ह्यांसाठी कायदेशीर वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षे करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.

 

 

 

Web Title: Maharashtra anti narcotic task force antf strengthened cm vows crackdown on drug networks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Drugs News
  • Nagpur News

संबंधित बातम्या

कौशल्य विकासावर भर; रतन टाटा कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा संपन्न, २५,००० हून अधिक विद्यार्थ्यांना पदव्या
1

कौशल्य विकासावर भर; रतन टाटा कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा संपन्न, २५,००० हून अधिक विद्यार्थ्यांना पदव्या

Devendra Fadnavis : चवदार तळे सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ, परिसराच्या सुशोभीकरणासाठी 55 कोटींचा निधी मंजूर
2

Devendra Fadnavis : चवदार तळे सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ, परिसराच्या सुशोभीकरणासाठी 55 कोटींचा निधी मंजूर

विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा फटका; गारपिटीमुळे रब्बीतील गहू, मका पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान
3

विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा फटका; गारपिटीमुळे रब्बीतील गहू, मका पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान

“ड्रग्ज तस्करी करणाऱ्या विदेशी नागरिकांना…”; विधानसभेत काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
4

“ड्रग्ज तस्करी करणाऱ्या विदेशी नागरिकांना…”; विधानसभेत काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.