Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भरघोस फायदाच फायदा; नैसर्गिक आपत्तीतील तातडीच्या मदतीत तिपटीने वाढ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकरी, कष्टकरी यांच्या हिताचे निर्णय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly Monsoon Session) घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिली आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Aug 25, 2022 | 10:15 PM
भरघोस फायदाच फायदा; नैसर्गिक आपत्तीतील तातडीच्या मदतीत तिपटीने वाढ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : नैसर्गिक आपत्तीत (Natural calamities) तातडीची मदत (Emergency Aid) म्हणून नुकसानग्रस्त कुटुंबांना (affected families) पाच हजार रुपये मदत करण्यात येत होती. त्यामध्ये तिपटीने वाढ (triple increase) करून पंधरा हजार रुपये अर्थसाह्य (15 thousand rupees financial help) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासारखेच शेतकरी, कष्टकरी यांच्या हिताचे निर्णय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly Monsoon Session) घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिली आहे.

कोविडच्या निर्बंधानंतर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन यशस्वीरित्या आणि पूर्णवेळ पार पडले आहे. ९ दिवसांमध्ये ६ दिवसाचे कामकाज झाले. माझ्या दृष्टीनं हे अधिवेशन खूप यशस्वी ठरले असे मुख्यमंत्र्यांनी सांगून या अधिवेशनात सर्वसामान्यांच्या दृष्टीने आम्ही महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.

पुरवणी मागण्यांच्या विधेयकांसह महत्वपूर्ण अशी विधेयके मंजूर करण्यात आली.

या अधिवेशनात एकूण १० विधेयके मंजूर करण्यात आली असेही मुख्यमंत्री म्हणाले

[read_also content=”आम्ही घेऊ काळजी! अंशतः अनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षण देण्याविषयी एका आठवड्यात परिपत्रक काढू – Deepak Kesarkar https://www.navarashtra.com/latest-news/maharashtra-assembly-session-issue-a-circular-within-a-week-regarding-service-protection-for-partially-subsidized-teachers-deepak-kesarkar-nrvb-319434.html”]

• भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबाबत अभिनंदन प्रस्ताव
• नवनियुक्त राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव.
• औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याबाबत, तसेच नवी मुंबई विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ नामकरण करण्याचा केंद्र शासनाला शिफारस करण्याचा विधान मंडळाचा ठराव.
• या अधिवेशनात विविध विभागांच्या २५ हजार ८२६.७२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागणीला मंजूरी देण्यात आली.
• थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक.
• राज्यात “एक दिवस बळीराजा” साठी ही संकल्पना राबवणार.
• सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास नुकसानभरपाई मिळणार.एनडीआरएफ पेक्षा दुप्पट मदत
• पंचनाम्यासाठी मोबाईल ॲपचा वापर.
• शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वकष कृती आराखडा.
• आपत्तीप्रवण क्षेत्राच्या पुनर्वसनाबाबत लवकरच धोरण.
• मुंबई पालिका क्षेत्रातील रस्ते काँक्रीटचे करणार तीन वर्षात काम पूर्ण करणार.
• धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्णत्वास नेणार.
• गिरणी कामगारांना ५० हजार सदनिका देण्यासाठी उपलब्ध होत आहेत. त्या त्यांना देण्यात येतील.
• मुंबईतील कोळीवाड्यांच्या विकासाबाबत विशेष विकास नियंत्रण नियमावली.
• बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी आवश्यकतेनुसार निधी.
• बीडीडी चाळीतील पोलिसांना १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काचे घर.
• मेट्रो मार्ग ५ चा विस्तार करण्यात येणार आहे.
• महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील १०० टक्के व कक्षेबाहेरील ५० टक्के पदभरती करणार.
• राज्यात सात हजार पोलिसांची भरती करणार.
• २९ हजार सफाई कर्मचाऱ्यांची घरे मालकी हक्काने देण्यात येईल.
• शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरणार.
• मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणार.
• हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढविणार.
• हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम युद्धपातळीवर
• आश्रमशाळांसाठी ६०० कोटींची तरतूद.

[read_also content=”Maharashtra Assembly Session : ‘असले गुरू नको रे बाबा’! यांनीच फासलाय शिक्षणाला काळीमा; मग विद्यार्थ्यांनी कोणाचा आदर्श घ्यायचा? https://www.navarashtra.com/maharashtra/bogus-appointment-of-teachers-recognition-case-should-be-investigated-through-ed-nagorao-ganars-demand-nrvb-319422.html”]
• राज्यातील ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ करणार.
• कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा कोर्स फी
• वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यातील मृतांच्या कुटूंबियांना २० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य
• राज्यात साकवांचे रूपांतर पुलांमध्ये करण्याचा निर्णय.
• रेवस-रेड्डी महामार्गाच्या भूसंपादनासाठी सुमारे दीडशे कोटी रुपयांची पूरक मागणी.
• पुणे शहरातील रिंगरोडच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला अडीचशे कोटी रुपये वर्ग.
• स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो मार्गाचा प्रकल्प आराखडा केंद्राला मान्यतेसाठी पाठवला.
• खडकवासला-स्वारगेट पुलगेट हडपसर-लोणी काळभोर या मार्गावर मेट्रो रेल्वे प्रकल्प.
• जलजीवन मिशन अंतर्गत रायगडमध्ये १ हजार ७० पाणी पुरवठा योजना मंजूर.
• बहिर्जी नाईक, उमाजी नाईक यांच्या स्मारक परिसराच्या विकासासाठी निधी दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्य.

Web Title: Maharashtra assembly session triple increase in emergency aid in natural calamities chief minister eknath shinde nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2022 | 10:15 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Assembly Session
  • Natural calamities

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार
1

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
2

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?
3

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?

Ram Sutar यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान! पुरस्कार देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पोहचले निवास्थानी
4

Ram Sutar यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान! पुरस्कार देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पोहचले निवास्थानी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.