Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Band: ‘भारत बंद’ पाठोपाठ आता ‘महाराष्ट्र बंद’; आहार संघटनेकडून बंद’ची हाक

सोमवारी राज्यातील सर्व परमिट रूम्स, बार, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. हा बंद पूर्णतः शांततेत पार पडणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 12, 2025 | 12:15 PM
Maharashtra Band: ‘भारत बंद’ पाठोपाठ आता ‘महाराष्ट्र बंद’;  आहार संघटनेकडून बंद’ची हाक
Follow Us
Close
Follow Us:

दोन दिवसांपूर्वी देशभरातील १० केंद्रीय कामगार संघटनांनी ९ जुलै २०२५ रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. त्यानंतर आता येत्या १४ जुलैला ‘ महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने १४ जुलैला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राज्य सरकारच्या अन्यायकारक कर धोरणांविरूद्ध असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टरंट म्हणजेच आहार संघटनेने हा एल्गार पुकारला आहे. त्यामुळे येत्या सोमवारी राज्यभरातील हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम आणि बार बंद राहणार आहेत. यामुळे राज्याच्या महसुलावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

आहार संघटनेच्या वतीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ‘महाराष्ट्र बंद’बाबत पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र बंदचे कारण सांगितले आहे. “१४ जुलै २०२५ रोजी राज्यव्यापी बंद! अन्याय्यकारक कराच्या बोज्याविरोधात महाराष्ट्रातील परमिट रूम आणि बार बंदच राहणार आहेत. हॉस्पिटॅलिटी उद्योग आपला आवाज सर्वांसमोर मांडत आहे! सोमवार, १४ जुलै २०२५ रोजी, महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम आणि बार आमच्या उद्योगावर लादलेल्या अन्याय्य आणि प्रचंड करवाढीच्या निषेधार्थ संपूर्ण बंद पाळतील.

Congress Leader join BJP: काँग्रेसला खिंडार; माजी आमदार भाजपच्या गोटात

दारूवरील व्हॅट दुपटीने वाढ करण्यात आली. परवाना शुल्क १५% वाढवण्यात आले. उत्पादन शुल्कात ६०% ची मोठी वाढ करण्यात आली. राज्य सरकारच्या या तीव्र बदलांमुळे असंख्य लहान आणि मध्यम उद्योगांचे अस्तित्व धोक्यात आले आहे, ज्यामुळे हजारो लोकांच्या नोकऱ्या आणि उपजीविका धोक्यात आली आहे.हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (AHAR) कडून निष्पक्ष धोरणांची मागणी करण्यासाठी आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही बंदची हाक देण्यात आली आहे. आम्ही सर्व उद्योग भागधारकांना एकत्र येऊन मजबूत राहण्याचे आवाहन करतो.चला आपण एक स्पष्ट संदेश देऊया – आता पुरे झाले!” असेही या संघटनेने म्हटले आहे.

Shocking Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! प्रेमी जोडप्याला जनावरांसारखी वागणूक, गावकऱ्यांनी जे केलं ते अंगावर का

राज्य सरकारच्या अन्यायकारक कर धोरणाविरोधात इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (AHAR) अर्थात ‘आहार’ संघटनेने १४ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. “ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे,” असे स्पष्ट शब्दांत सांगत संघटनेने आपली भूमिका मांडली आहे.या आंदोलनांतर्गत राज्यभरातील २०,००० हून अधिक हॉटेल व रेस्टॉरंट मालकांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. बंदचा सर्वाधिक प्रभाव मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर यांसह राज्यातील प्रमुख शहरी भागांमध्ये जाणवणार आहे. सोमवारी राज्यातील सर्व परमिट रूम्स, बार, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. हा बंद पूर्णतः शांततेत पार पडणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे.मात्र, सरकारने जर याकडे दुर्लक्ष केले, तर पुढील काळात तीव्र आणि उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

Web Title: Maharashtra band after bharat bandh now maharashtra bandh food organization calls for bandh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 12:15 PM

Topics:  

  • Maharashtra Bandh
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “… आज बाळासाहेब नाहीयेत ते बरंय”; मनसे अध्यक्ष राज ठाकरे कडाडले
1

Maharashtra Politics: “… आज बाळासाहेब नाहीयेत ते बरंय”; मनसे अध्यक्ष राज ठाकरे कडाडले

Maharashtra Politics : मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरात महायुतीचाच महापौर; एकनाथ शिंदे यांची उबाठावर घणाघाती टीका
2

Maharashtra Politics : मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरात महायुतीचाच महापौर; एकनाथ शिंदे यांची उबाठावर घणाघाती टीका

Zilla Parishad Election 2026: जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपूर्वी पुन्हा मोठे बदल; भाजपच्या बड्या नेत्याचे सूचक विधान
3

Zilla Parishad Election 2026: जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपूर्वी पुन्हा मोठे बदल; भाजपच्या बड्या नेत्याचे सूचक विधान

Maharashtra Politics : मनसेच्या ‘त्या’ निर्णयाने राजकारणात मोठी खळबळ; उद्धव ठाकरेंचीही तीव्र नाराजी
4

Maharashtra Politics : मनसेच्या ‘त्या’ निर्णयाने राजकारणात मोठी खळबळ; उद्धव ठाकरेंचीही तीव्र नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.