काँग्रेसला खिंडार; माजी आमदार भाजपच्या गोटात
Pune Politics: राज्यात येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील हालचालींनाही वेग आला असून अनेक नेते, पदाधिकारी महायुतीत पक्षप्रवेश करताना दिसत आहेत. अशातच भाजपने काँग्रेसला पुणे जिल्ह्यात मोठा धक्का दिला आहे. पुरंदरचे माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप 16 जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पुरंदर तालुक्यातील एका मोठ्या मेळाव्यात संजय जगताप अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश करणार असून, त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, यापूर्वी काही महिन्यांपूर्वीच पुण्याचे कसबा पेठचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनीदेखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर माजी आमदार संग्राम थोपटे यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यानंतर आता संजय जगताप यांच्याही भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रात आणखी एक मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जगताप यांच्या यांच्या पक्षप्रवेशामुळे पश्चिम महाराष्ट्रात ‘मिशन लोटस’सक्रिय झाल्याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत.
Delhi Building Collapse : दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली, १२ जण ढीगार्याखाली गाडले गेल्याची भीती
याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील अनेक प्रमुख नेते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे येत्या काळात पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे ‘मिशन लोटस’आणखी गती घेईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्याबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराच्या हालचालींना वेग आला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर संजय जगताप पक्षांतर्गत नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यांचा माजी आमदार संग्राम थोपटे यांच्यासोबतच भाजपमध्ये प्रवेश होणार होता. मात्र, स्थानिक भाजप नेत्यांच्या विरोधामुळे त्यावेळी हा मार्ग बंद झाला होता, असे सांगितले जाते. आता मात्र सर्व अडथळे दूर होत त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, तसेच इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
धक्कादायक ! पत्नीने पतीला फेकून मारलेले त्रिशूल चिमुकल्याच्या डोक्यात घुसले; तडफडून झाला मृत्यू
जगताप कुटुंबीयांचा पुरंदर तालुक्यात काँग्रेसवर दीर्घकालीन आणि प्रभावी पकड आहे. त्यामुळे त्यांचा भाजपमध्ये प्रवेश काँग्रेससाठी निश्चितच मोठा धक्का मानला जात आहे. भाजपसाठी ही एक महत्त्वाची राजकीय संधी आहे. पुरंदरमधील आपली मुळे अधिक घट्ट करण्यासाठी आणि बारामती लोकसभा मतदारसंघात प्रभाव वाढवण्यासाठी संजय जगताप यांचा भाजपमध्ये प्रवेश फायदेशीर ठरू शकतो. विशेषतः आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये त्यांचा स्थानिक प्रभाव भाजपसाठी निर्णायक ठरू शकतो.
सत्ताधारी महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्र असून, त्यात भाजप पुणे जिल्ह्यात आपले वर्चस्व वाढवण्यासाठी ठोस पावले उचलत आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून माजी आमदार संग्राम थोपटे आणि आता संजय जगताप यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणण्यात आला आहे. पुणे शहरात भाजपची भक्कम ताकद असली तरी जिल्ह्यात अजित पवारांचे वर्चस्व, तसेच शिवसेनेची स्थानिक पकड भाजपपेक्षा अधिक असल्याने, भाजपने प्रभावशाली नेत्यांना आपल्या गोटात खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
बायकोची दहशत! महिलेच्या केसांशी खेळत होता गोरिला तितक्यात बायको आली अन् मग जे घडलं… पाहून हसूच
संजय जगताप हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून, पुरंदर तालुक्यात त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मजबूत प्रभावशाली स्थान आहे. त्यांच्या भाजपमध्ये प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे, तर भाजपसाठी जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याची मोठी संधी आहे. या आधी कसबा पेठचे माजी आमदार रवींद्र धंगेकर शिंदे गटात गेले, आणि संग्राम थोपटे भाजपमध्ये आले. या सर्व हालचालींमुळे पुणे जिल्ह्यातील राजकारण अधिक तापले आहे.