दहावीच्या विद्यार्थ्यांना सोमवारपासून भरता येणार परीक्षा अर्ज; 'ही' असणार अर्ज भरण्याची शेवटची तारीख (फोटो सौजन्य-X)
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी येत्या सोमवारपासून अर्ज भरता येणार आहे. फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेसाठी ऑनलाईन परीक्षा अर्ज सोमवार (दि.15) पासून भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 6 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे यू-डायसमधील पेन आयडीवरून त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत ऑनलाईन सादर करावयाची आहेत. तर पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त खाजगी विद्यार्थी श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेणारे विद्यार्थी तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे मंडळाच्या संकेतस्थळावर www.mahahsscboard.in येथे भरायची आहेत. माध्यमिक शाळांनी परीक्षा शुल्काचा भरणा शुल्क पावती/चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रि-लिस्ट जमा करण्याची तारीख मंडळाकडून नंतर जाहीर केली जाणार आहे.
हेदेखील वाचा : टीईआरएन ग्रुपने २४ दशलक्ष डॉलर्सची उभारणी निधी! भारताला जगाची कौशल्य राजधानी बनवण्यासाठी प्रयत्नशील
तसेच आवेदनपत्रे भरण्यापूर्वी शाळांनी स्कूल प्रोफाईलमधील शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय व शिक्षकांची अद्ययावत माहिती भरून मंडळाकडे पाठवणे आवश्यक आहे. आवेदनपत्रे सबमिट झाल्यानंतर शाळांच्या लॉगिनमध्ये प्री-लिस्ट उपलब्ध होणार असून, त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांकडून तपासणी करून स्वाक्षरी घ्यावी.
मुख्याध्यापकांची स्वाक्षरी बंधनकारक
पडताळणी झाल्यानंतर संबंधित प्री-लिस्टवर मुख्याध्यापकांनी शिक्क्यासह स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे. मंडळाने स्पष्ट केले आहे की, दहावीच्या सर्व आवेदनपत्रांची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन पध्दतीने होणार असून, विद्यार्थ्यांनी थेट न भरता आपल्या संबंधित शाळेमार्फतच अर्ज भरावीत.
SSC मध्ये भरतीसाठी अर्ज
यापूर्वी, एसएससी अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) च्या फेज-13 ची परीक्षा झाली होती. या परीक्षेत निवड पद भरती 2025 मध्ये देशभरातील तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या भरतीसाठी आयोगाला एकूण २९४०१७५ अर्ज प्राप्त झाले होते. केंद्र सरकारच्या मंत्रालये आणि विभागांमध्ये गट ‘ब’ (नॉन-राजपत्रित) आणि गट ‘क’ (नॉन-टेक्निकल) पदांसाठी ही भरती केली गेली. त्यानंतर आता दहावी परीक्षा होणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.