Breaking News अपडेट
15 Sep 2025 02:00 PM (IST)
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये काल आशिया कपचा सामना झाला या सामन्यात भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली आणि त्याचबरोबर भारताच्या खेळाडूंनी सामन्यामध्ये विजय मिळवल्यानंतर हॅन्डशेक न केल्यामुळे सोशल मिडियावर विचारांचा महापुर आला होता. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आशिया कप २०२५ च्या सहाव्या सामन्यात पाकिस्तानचा ७ विकेट्सने पराभव केला. भारताने अद्भुत गोलंदाजी कामगिरी दाखवत पाकिस्तानला २० षटकांत ९ विकेट्सच्या मोबदल्यात फक्त १२७ धावांवर रोखले. त्यानंतर टीम इंडियाने १५.५ षटकांत फक्त तीन विकेट्स गमावून लक्ष्य गाठले.
15 Sep 2025 01:55 PM (IST)
Oppo ने F31 ही नवीन स्मार्टफोन सिरीज लाँच केली असून, या सिरीजमध्ये ओप्पो F31, F31 प्रो आणि F31 प्रो+ यांचा समावेश आहे. कंपनीने सांगितलं आहे की, या सर्व डिव्हाईसमध्ये अधिक चांगला परफॉर्मेंस, जास्त काळ चालणारी बॅटरी आणि उत्तम ड्यूरेबिलिटी देण्यात आली आहे. या सिरीजमधील बेस मॉडेल F31 आणि F31 प्रोमध्ये मीडियाटेक 6300/7300 एनर्जी चिपसेट देण्यात आला आहे.स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर ओप्पो F31 5G ची सुरुवातीची किंमत 22,999 रुपये आहे. तर सीरीजमधील F31 प्रो 5G ची किंमत 26,999 रुपयांपासून सुरु होते.
15 Sep 2025 01:50 PM (IST)
ऑगस्टमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांनी बाजारात मोठी गुंतवणूक केली. अनेक मोठ्या व्यवहारांमुळे त्यांना त्यांचे पैसे चांगल्या वापरासाठी वापरता आले, त्यामुळे त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम १.८५ लाख कोटी रुपयांवरून १.७६ लाख कोटी रुपयांवर आली. ऑगस्ट महिन्यात भारतातील टॉप म्युच्युअल फंडांनी काय खरेदी केले आणि काय विकले हे नुवामा अल्टरनेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्चच्या आधारे जाणून घेऊयात.
15 Sep 2025 01:48 PM (IST)
मागील काही वर्षे मणिपूर हे जळत असून जातीय हिंसाचार वाढला आहे. यामध्ये अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार कमी करण्यास आणि शांतता प्रस्थापित करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. यानंतर मागील दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर दौरा देखील केला. मात्र पंतप्रधानांचा दौरा झाल्यानंतर पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे.
15 Sep 2025 01:35 PM (IST)
सध्या नेपाळमधील परिस्थिती हळूहळू सुरळीत होत चालली आहे. नेपाळचे माजी पंतप्रधान ओली शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर वातावरण स्थिरता निर्माण होत असून अंतिरम सरकारची स्थापना सुरु आहे. नेपाळच्या माजी महिल सर न्यायाधीशी सुशीला कार्की यांनी नेपाळच्या पहिला महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. दरम्यान त्यांना मंत्रीमंडळाच विस्तार केला करण्यास सुरुवात केली आहे. सध्या काळजीवाहू सरकारची स्थापना सुरु असून यामध्ये तीन नेत्यांना सामील करण्यात आले आहे.
15 Sep 2025 01:25 PM (IST)
आशिया कप 2025 सुरु असून रविवारी संध्याकाळी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पार पडला. यामध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंचा दारुण पराभव केला. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर हा सामना होऊ नये अशी मागणी देशभरातून केली जात होती. या सामन्यामधून पाकिस्तानला अर्थिक फायदा होईल असे देखील म्हटले जात होते. यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन देखील करण्यात आले. यामध्ये भारतीय खेळाडू विजयी झाले असले तरी भारत पाकिस्तान सामना हा फिक्सिंग होता असा गंभीर दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
15 Sep 2025 01:15 PM (IST)
“जे जे जगी जगते तया, माझे म्हणा, करुणाकरा” या भावनेशी प्रामाणिक राहून ‘नाम फाऊंडेशन’ ही नामांकित संस्था गेली १० वर्षे पर्यावरण आणि विविध शाश्वत विकास क्षेत्रांमध्ये अविरत कार्यरत आहे. संस्थेचा दशकपूर्ती समारंभ नुकताच पुण्यात उत्साहात संपन्न झाला. पालखी नृत्याने तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करीत या सोहळ्याची सुरुवात झाली.नाम फाऊंडेशनच्या दशकपूर्तीनिमित्त आयोजित या स्नेहमेळाव्यात माननीय श्री. नितीनजी गडकरी (केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री), चंद्रकांतदादा पाटील (उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य), पद्मभूषण डॉ. विजय भटकर (संगणक शास्त्रज्ञ), माननीय श्री. उदय सामंत (उद्योग/मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र राज ) आदि मान्यवर मंडळी उपस्थित होती.
15 Sep 2025 01:08 PM (IST)
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (15 सप्टेंबर) वक्फ कायद्याशी संबंधित प्रकरणावर मोठा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने वक्फ कायद्याच्या बाबतीत सरकार आणि मुस्लिम समुदायामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. न्यायालयाने वक्फ कायद्याच्या कलम ३ आणि कलम ४ वर बंदी घातली आहे. सुनावणीनंतर न्यायालयाने म्हटले की, संपूर्ण कायद्यावर बंदी घालण्याचा अधिकार आम्हाला नाही. नेमकं कोर्टाने काय म्हटलं जाणून घेऊया…
15 Sep 2025 01:05 PM (IST)
जालन्यातील गोंदी इथल्या गोंदेश्वर महादेव मंदिरामध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. गोंदी महसूल मंडळामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने परिसरातून वाहणाऱ्या मांगणी, डोरली, गल्हाटी या नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडून काठावरील गोंदेश्वर महादेव मंदिरात पुराचं पाणी शिरलं आहे.
15 Sep 2025 12:55 PM (IST)
सोलापूर शहर आणि परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोलापूरकरांचे हाल होत आहेत. सैफुल, स्वामी विवेकानंद भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे, ड्रेनेजचं पाणी घरात शिरल्याने सोलापूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सततच्या पावसामुळे सोलापूरकरांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
15 Sep 2025 12:45 PM (IST)
अहिल्यानगर शहरासह जिल्हात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषतः शेवगाव पाथर्डी तालुक्यातील काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून पाथर्डी तालुक्याच्या तिसगाव इथल्या नदीला शंभर वर्षानंतर मोठा पूर आला आहे. या पावसामुळे शेवगाव पाथर्डी भागामध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या कापूस आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे.
15 Sep 2025 12:35 PM (IST)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. अनेक भागात ढगाळ वातावरण असून सावंतवाडी कुडाळ भागात पावसाचा जोर वाढलेला असून पुढील काळात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
15 Sep 2025 12:30 PM (IST)
काल पाकिस्तान बरोबर भारत जिंकले त्याच्याबरोबर 25 महिलांचे कुंकू पुसलेले परत आले का यात भरपाई काय झाली? पाकिस्तानला घुसून मारण्याची संधी आली असताना भारतीय जनता पक्षाच्या सरकारने माघार घेतली. क्रिकेटच्या मैदानावरती ती काय फिक्सिंग मॅच होती कालच्या मॅचवर दीड लाख कोटींचा जुगार खेळायला गेला यात पाकिस्तानला सुद्धा त्याचे पैसे मिळाले असतील. कालच्या मॅचमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान एक हजार कोटी मिळाले असतील. तुम्ही पाकिस्तानला आमच्याविरुद्ध लढण्यासाठी महिलांचं कुंकू पुसण्यासाठी सक्षम करत आहात याच्यावर बोला पाकिस्तान जिंकला हरला आम्हाला काही फरक पडत नाही., असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
15 Sep 2025 11:42 AM (IST)
मुसळधार पावसाचा फटका तिन्ही रेल्वे मार्गांना बसला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील अप लोकल 20-25 मिनिटे उशिराने धावत आहेत. तर मध्य रेल्वेवरील डाऊन लोकल 15-20 मिनिटे उशिराने धावत आहेत. पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल 15-20 मिनिटे उशिराने सुरू आहेत. अप-डाऊन या दोन्ही मार्गावरील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय.
15 Sep 2025 11:15 AM (IST)
बीड जिल्ह्यामध्ये आज बंजारा समाज बांधवांचा विराट मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये लाखो बंजारा बांधव सहभागी होणार असून बीडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे या मोर्चाचे निवेदन शाळकरी मुलींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.
15 Sep 2025 11:13 AM (IST)
पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात विजांसह वादळी वारे आणि ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
15 Sep 2025 10:59 AM (IST)
देशातील कोट्यवधी करदात्यांची आयकर भरण्याची अंतिम तारीख आज संपत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर ही अंतिम तारीख १५ सप्टेंबरवरून ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याचे दावे केले जात आहेत. आयकर विभागाच्या नावाने करण्यात येणाऱ्या या दाव्यांवर लाखो लोक प्रतिक्रिया देत आहेत. अशा परिस्थितीत, ज्या लाखो करदात्यांनी अद्याप आयकर परतफेड केली नाही त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागला आहे की, या दाव्यात काही तथ्य आहे की खोटा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.
15 Sep 2025 10:55 AM (IST)
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी हा विजय भारतीय सैनिकांना समर्पित केला. सामन्यानंतर ते म्हणाले, “एक संघ म्हणून आम्हाला पहलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबांसोबत उभे राहायचे होते. ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या आमच्या सैनिकांचे आभार.” गंभीरचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा कर्णधार सूर्यकुमार यादवने आशिया कपमध्ये पाकिस्तानवरील विजय भारतीय सशस्त्र दलांना समर्पित केला होता.
15 Sep 2025 10:50 AM (IST)
पुण्यातील पिंपरी चिंचवड येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने सायबेरियन हस्की जातीच्या कुत्र्याला दगडाने व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आकुर्डी येथील डी टू सी कमर्शियल दुकानासमोर घडली. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार कैद झाला आहे.
15 Sep 2025 10:44 AM (IST)
सध्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रेट्रो ट्रेंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुलं असो किंवा मुली, प्रत्येकजण हा ट्रेंड फॉलो करत आहे. Gemini AI चा वापर करून युजर्स त्यांचे फोटो रेट्रो लूकमध्ये कन्व्हर्ट करत आहेत. खरं सांगायच तर हा ट्रेंड अतिशय मजेदार आहे. तुम्हाला केवळ तुमचा फोटो अपलोड करून आवडता प्रॉम्प्ट द्यायाच आहे. त्यानंतर काही क्षणातच Gemini AI तुमच्या फोटोला रेट्रो लुकमध्ये कन्व्हर्ट करते.
सोमवारी सकाळपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसात, वडाळा परिसरात मोनोरेल सेवेत मोठी समस्या निर्माण झाली. सकाळी ७ वाजताच्या सुमारास, तांत्रिक बिघाडामुळे वडाळ्याकडे जाणारी एक मोनोरेल अचानक रस्त्यातच थांबली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. मोनोरेल कॉर्पोरेशनने सांगितले की, पुरवठा बिघाडामुळे ही समस्या निर्माण झाली आहे आणि अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
#WATCH | Mumbai, Maharashtra: A monorail came to a halt in the Wadala area of Mumbai due to technical glitches.
MMRDA PRO says, “17 passengers have been evacuated after a technical glitch happened in the monorail at Wadala. Passengers were evacuated at 7:45 am.” pic.twitter.com/nVF64OeuQk
— ANI (@ANI) September 15, 2025