Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेस पक्षाचा मोठा निर्णय; ‘या’ बड्या नेत्यावर दिली पुण्याची जबाबदारी

पुणे शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 06, 2025 | 01:18 PM
'ते योगी नाही तर सत्ताभोगी, स्वतःला फकीर म्हणवणारे...'; काँग्रेसचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

'ते योगी नाही तर सत्ताभोगी, स्वतःला फकीर म्हणवणारे...'; काँग्रेसचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : लाडकी बहीण योजनेच्या लाटेत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. महायुतीला मोठं बहुमत मिळालं. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. त्यानंतर काँग्रेसने या पराभवाची गंभीर दखल घेतली असून नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपादवरून उचलबांगडी करण्यात आली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अशातचं आता आणखी एक मोठा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी सतेज पाटील यांची नियुक्ती केली आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये पक्ष संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी घेतला आहे. त्यांच्या सूचनेनुसार पुण्यासाठी निरीक्षकपदी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे येथे जाऊन तालुकाध्यक्ष, नेतेमंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी आपण चर्चा करावी, तालुकानिहाय बैठका घ्याव्यात आणि १५ दिवसांत अहवाल द्यावा, असे पाटील यांना पाठविलेल्या नियुक्तिपत्रात म्हटले आहे.

जिल्ह्याच्या पक्षप्रभारींना सोबत घेऊन, त्यांना दौऱ्यातही सोबत घेऊन आणि त्यांच्याशी चर्चा करून अहवाल पाठवावा, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजपचा वरचष्मा आहे. अशा परिस्थितीत पुण्यातील काँग्रेसच्या नेमक्या स्थितीचा अहवाल देण्याची महत्त्वाची जबाबदारी सतेज पाटील यांच्यावर देण्यात आली आहे.

Web Title: Maharashtra congress party has taken a big decision to expand the party in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 01:18 PM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • maharashtra
  • pune news
  • Satej Patil

संबंधित बातम्या

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस
1

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘या’ बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण
2

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘या’ बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
3

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक
4

महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.