Maharashtra Breaking News Updates Today:
03 Apr 2026 11:16 AM (IST)
बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुका लढवण्याला काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी मंजूरी दिल्याची माहिती समोर आली आहे.
03 Apr 2026 11:05 AM (IST)
आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांना त्यांच्या पक्षाने राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवल्यानंतर राघव चड्ढा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आतापर्यंत राज्यसभेत उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे.
03 Apr 2026 10:45 AM (IST)
Realme Smartphone Launched: टेक कंपनी रिअलमीने भारतात Realme 16 5G या नावाने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन तगडा प्रोसेसर आणि दमदार फीचर्सने सुसज्ज आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन मिड रेंज किंमतीत सादर केला आहे. कंपनीने 3 रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये हा स्मार्टफोन लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या खरेदीवर काही ऑफर्स देखील उपलब्ध आहेत.
03 Apr 2026 10:35 AM (IST)
ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते आणि विनोदी कलाकार राजपाल यादव यांच्या चेक बाऊन्स प्रकरणातील कायदेशीर अडचणी कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही आहेत. ९ कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात फेब्रुवारी महिन्यात त्यांची तिहार तुरुंगातून सुटका झाली होती. एका कौटुंबिक लग्नसमारंभाला उपस्थित राहण्यासाठी अभिनेत्याने जामिनासाठी अर्ज केला आणि तक्रारदाराकडे १.५ कोटी रुपये जमा केले, त्यानंतर न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी दिलासा मिळूनही राजपाल यादव यांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. उच्च न्यायालयाने त्यांच्या प्रकरणातील निर्णय राखून ठेवला आहे.
03 Apr 2026 10:25 AM (IST)
दुबई/नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचे गंभीर परिणाम आता जागतिक स्तरावर दिसू लागले आहेत. इराणने 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुज'मधील जलवाहतुकीवर नियंत्रण मिळवल्याने कच्चे तेल आणि एलपीजी गॅसच्या निर्यातीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. तेलाच्या पुरवठ्यात व्यत्यय आल्याने जागतिक बाजारपेठेत इंधनाचे दर कडाडले आहेत. याचा सर्वाधिक फटका पाकिस्तान आणि श्रीलंकेला बसला असून, तिथे पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की, या देशांना लॉकडाऊनसारखे कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत.
03 Apr 2026 10:20 AM (IST)
वॉशिंग्टन/बगदाद: इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता अत्यंत भीषण वळणावर येऊन पोहोचला आहे. जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळावर इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर अमेरिकेने आक्रमक पवित्रा घेतला असून, इराकमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना पुढील ४८ तासांच्या आत देश सोडण्याचे कडक आदेश दिले आहेत.
अमेरिकन दूतावासाने जारी केलेल्या या तातडीच्या आदेशामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. काहीतरी मोठी लष्करी कारवाई होण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. इराणने जॉर्डनमधील अमेरिकन तळाला लक्ष्य करत जोरदार क्षेपणास्त्र डागले. या हल्ल्याचे भीषण चित्रण असलेले व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अमेरिकेने अधिक घातक हल्ले करण्याची धमकी दिल्याने अनेक देश 'अलर्ट मोड'वर आले आहेत. आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी अमेरिका प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
03 Apr 2026 10:16 AM (IST)
नाशिक: भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात केवळ खरातवरच नाही, तर त्याच्याकडे स्वेच्छेने जाणाऱ्या महिलांवरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी ज्येष्ठ लेखिका अरुणा सबाने यांनी केली आहे.
अरुणा सबाने यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.उपलब्ध व्हिडीओ आणि फोटोंचे निरीक्षण केले असता, संबंधित महिलांना तिथे जबरदस्तीने आणले आहे असे वाटत नाही. तसेच त्यांना गुंगीचे औषध दिल्याचेही दिसून येत नाही, असे निरीक्षण सबाने यांनी नोंदवले आहे.
03 Apr 2026 10:15 AM (IST)
पुणे: भोंदू बाबा अशोक खरात याने १३० बनावट बँक खाती उघडून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. जगदंबा आणि समता पतसंस्थेच्या माध्यमातून हा मोठा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांच्या आदेशानुसार समता पतसंस्थेने १०० हून अधिक खात्यांचे व्यवहार तातडीने 'होल्ड'वर ठेवले आहेत. या होल्ड केलेल्या खात्यांमध्ये रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर, काही बांधकाम व्यावसायिक आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या खात्यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
03 Apr 2026 10:10 AM (IST)
मुंबई: राज्यातील आगामी बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. या दोन्ही मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्धार काँग्रेसने व्यक्त केला असून पक्षश्रेष्ठींकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती नुकत्याच पार पडल्या. यावेळी स्थानिक राजकीय समीकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राहुरी मतदारसंघासाठी उमेदवार निश्चितीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. इच्छुकांची मोठी संख्या पाहता, पक्ष नेतृत्व अत्यंत काळजीपूर्वक उमेदवाराची निवड करणार आहे.
Maharashtra to World Breaking News: आज काय घडतंय? कुठे काय झालं? राजकीय उलथापालथीपासून ते क्रिकेटच्या मैदानापर्यंत, सर्व ताज्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स फक्त येथे
भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली असून ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार असला, तरी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरील परिसरात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून, सायंकाळच्या वेळी ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी आणि नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.






