
maharashtra crisis
मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रालयात पार पडली. राज्यातील टंचाई स्थितीचा आढावा त्यात घेण्यात आला. मंत्री बावनकुळे यांनी, कर्जवसुली थांबविण्याचे परिपत्रक रिझर्व्ह बँक काढेल का, याची विचारणा करण्याची सूचना मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना केली. पतसंस्था, बँकांनी कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांकडे जाता कामा नये यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देण्याचेही सांगितले. बावनकुळे म्हणाले की, शेतकऱ्यांना सर्व मदत मिळाली पाहिजे. प्रत्येक पंचनाम्यावर शेतकऱ्याची सही घेतली आहे.
चाराटंचाई, पाणीटंचाई आणि धरण व तलावातील जलसाठे नियंत्रणाच्या उपाययोजना आवश्यक आहेत. मोठ्या बांधकामांवर बंदीसह सिमेंटचे रस्ते आणि पाण्याचा अपव्यय होणारी कामे टाळावीत. जिल्हाधिकाऱ्यांनी सीएसआर फंडाचा पाण्याला प्राधान्य ठरवावे, पंपांची वीज तोडणार, गावतलाव व पाझरतलाव पिण्याच्या पाण्यासाठी लागूया. वाटपाचा क्रम पिण्यासाठी, चारा पिके, रब्बी पिके (गहू, इ.) आणि शेवटी ऊस पीक असा असावा, अशा सूचनाही करण्यात आल्या.
Karjat : नेरळमधील उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू; ग्रामपंचायतीच्या उत्तरावर उपोषणकर्ते असमाधानी
पर्यावरण व वातावरण बदलमंत्री पंकजा मुंडे यांनी पाणीटंचाईच्या भागात वैयक्तिक व व्यावसायिक बांधकामांच्या परवानगी स्थगित करण्याची सूचना केली.तलावांच्या आजूबाजूला होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी वीज कनेक्शन तोडण्याचे निर्देश मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. उपयोग दुष्काळ निवारणकामी करण्याच्या सूचनाही मंत्र्यांनी केल्या. प्रधान सचिव विनिता वेद सिंघल यांनी, ‘ट्रिगर-२’ लागू होणाऱ्या ४३ तालुक्यांसह सर्व प्रभावित क्षेत्रांसाठी कागदोपत्री विलंबाची वाट न पाहता शासनाचा निर्णय तातडीने जारी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले. चारा छावणीचा प्रारंभिक प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करावा. त्यासाठी जिल्हा परिषद सीईओ, कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यांची समिती करून ती अंतिम करण्यात यावा.