Chandrapur News: ४० फुटांचा रस्ता सायंकाळी १५ फुटांवर; बंगाली कॅम्प चौकातील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, अतिक्रमणावर कारवाईची मागणी
सायंकाळी सहा वाजल्यानंतर वाईन शॉप व बार परिसरात ग्राहकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे दुचाकी, चारचाकी, बस तसेच जड वाहनांना मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागतो. पादचाऱ्यांनाही रस्त्याच्या कडेला सुरक्षितपणे चालणे कठीण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या परिसरात यापूर्वी अपघातांच्या घटना घडल्याने हा मार्ग अपघातप्रवण ठिकाण म्हणूनही चर्चेत आहे. या समस्येबाबत भाजपचे जिल्हा महामंत्री मनोज पॉल यांनी प्रशासनाकडे २० हून अधिक निवेदने दिल्याचे सांगितले. मात्र, अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे संबंधित अतिक्रमण व वाहतूक समस्येवर तातडीने कारवाई न झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
दरम्यान, या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिक्रमण हटविणे, मद्यविक्री केंद्रांच्या परिसरातील गर्दीवर नियंत्रण ठेवणे तसेच उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येची दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वाईन शॉपमधून मद्य खरेदी केल्यानंतर काही जण लगतच्या मोकळ्या जागेत बसून उघड्यावर मद्यपान करत असल्याची तक्रार आहे. विशेष म्हणजे, ही जागा चंद्रपूर महानगरपालिकेच्या झोन क्रमांक ३ कार्यालयालगत असल्याने या प्रकारावर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
बंगाली कॅम्प चौकातील प्रमुख मागांची रुंदी सुमारे ४० फूट असतानाही सायंकाळी वाईन शॉप व बारसमोर होणाऱ्या गर्दीमुळे वाहतुकीसाठी उपलब्ध जागा मोठ्या प्रमाणात कमी होते. परिणामी वाहनचालकांना अरुंद जागेतून मार्ग काढावा लागतो. या ठिकाणी वाहतूक कोंडी तसेच अपघाताचा धोका वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
बंगाली कॅम्प चौकातील अतिक्रमण आणि वाहतुकीच्या समस्येबाबत भाजपचे जिल्हा महामंत्री मनोज पॉल यांनी प्रशासनाकडे २० हून अधिक निवेदने दिल्याचे सांगितले. मात्र, समस्या कायम असल्याने आता ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.






