Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 23 कोटींची मदत; 17 हजार 245 शेतकऱ्यांना दिलासा

जून-जुलै 2026 मध्ये अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. 17 हजार 245 शेतकऱ्यांसाठी 23 कोटी 33 लाख 31 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, ही मदत DBTद्वारे थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 27, 2026 | 10:18 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 17 हजार 245 बाधित शेतकऱ्यांसाठी 23 कोटी 33 लाख रुपयांचा निधी मंजूर.
  • 11 हजार 207.79 हेक्टर क्षेत्रातील पीक नुकसानीसाठी DBTद्वारे थेट मदत.
  • मदतीची रक्कम जुन्या कर्जखात्यात वळती न करण्याचे बँकांना निर्देश
 

जून आणि जुलै 2026 मध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांत झालेल्या अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 23 कोटी 33 लाख 31 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, 27 ऑगस्ट 2026 रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्यातील एकूण 17 हजार 245 शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. 11 हजार 207.79 हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीसाठी ही मदत मंजूर करण्यात आली आहे.

अमरावती विभागाला सर्वाधिक मदत

विभागनिहाय विचार केला असता अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांतील 9 हजार 683 शेतकऱ्यांसाठी 13 कोटी 80 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

नेपाळमधील पूर-भूस्खलनामुळे महाराष्ट्रातील पर्यटक अडकले; केंद्राच्या संपर्कात राज्य सरकार, 4 जणांशी संपर्क

पुणे विभागातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील 6 हजार 885 बाधित शेतकऱ्यांसाठी 9 कोटी 13 लाख रुपये देण्यात येणार आहेत. नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील 661 शेतकऱ्यांसाठी 38 लाख 87 हजार रुपये, तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 16 शेतकऱ्यांसाठी 41 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

मदतीची रक्कम कर्जखात्यात वळती करू नये

शेतकऱ्यांना मिळणारी नुकसानभरपाई कोणत्याही जुन्या कर्जखात्यात किंवा वसुलीसाठी वळती करू नये, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. संबंधित बँकांनाही याबाबत कडक निर्देश देण्यास सांगण्यात आले आहे.

ही मदत DBT प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. मदत वाटप करताना एकाच व्यक्तीला दोनदा लाभ मिळणार नाही, याची खबरदारी तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.

अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिली एक वर्षाची मुदतवाढ; प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया

मदत वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि प्रत्येकाला मिळालेल्या मदतीचा तपशील संबंधित जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसोबतच मदत वाटपाच्या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यावरही सरकारने भर दिला आहे.

Web Title: Maharashtra farmers crop damage 23 crore assistance heavy rain flood

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 10:18 PM

Topics:  

  • Farmer Crisis
  • Maharashtra Govenment

संबंधित बातम्या

Farmers Help : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; नाशिक, अहिल्यानगर, जळगावला दिलासा
1

Farmers Help : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; नाशिक, अहिल्यानगर, जळगावला दिलासा

Jalgaon News: ज्वारी खरेदीला ब्रेक! चार दिवसांपासून केंद्र बंद, नोंदणीच्या घोळामुळे शेतकरी संतप्त
2

Jalgaon News: ज्वारी खरेदीला ब्रेक! चार दिवसांपासून केंद्र बंद, नोंदणीच्या घोळामुळे शेतकरी संतप्त

Wardha News : सोयाबीन, कपाशीवर कीडरोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांच्या अडचणीत भर; ढगाळ वातावरणाचा पिकांवर दुष्परिणाम
3

Wardha News : सोयाबीन, कपाशीवर कीडरोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांच्या अडचणीत भर; ढगाळ वातावरणाचा पिकांवर दुष्परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.