Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmers Help : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; नाशिक, अहिल्यानगर, जळगावला दिलासा

Farmers Help : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून ८६.६५ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. नाशिक, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांतील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार असून, पीक नुकसानीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 25, 2026 | 09:07 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:

Farmers Help : खरीप २०२५ मध्ये जून ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पाऊस, सरासरीपेक्षा अधिक पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांसाठी ८६ कोटी ६५ लाख २९ हजार रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

मोर्चापूर्वीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट? लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला बबनराव तायवाडेंचा विरोध

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या पात्र शेतकऱ्यांना शासनाने निश्चित केलेल्या निकष व दरानुसार ही मदत देण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणून हा निधी उपलब्ध करून देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.पात्र लाभार्थ्यांची माहिती निश्चित करून डीबीटी प्रणालीद्वारे मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. मदत वाटपाची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्याचे निर्देश संबंधित जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्याच हंगामात यापूर्वी वितरित झालेल्या मदतीची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

‘अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकवणार, जाणीवपूर्वक मराठी शिकण्यास नकार दिल्यास..,’ परिवहनमंत्री सरनाईकांची मोठी घोषणा

मंत्रिमंडळ उपसमितीच्या २ जुलै २०२६ रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार हा निधी विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे नाशिक विभागातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त पात्र शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, पुढील शेती हंगामासाठी त्यांना आर्थिक आधार उपलब्ध होणार आहे.पात्र शेतकऱ्यांना ही मदत डीबीटी प्रणालीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

मदत वाटपाची प्रक्रिया पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. नैसर्गिक संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे ही शासनाची प्राथमिकता असल्याचेही मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.याबाबतचा मदत व पुनर्वसन विभागाने शासननिर्णय नुकताच प्रसिध्द केलेला आहे.

Web Title: Farmers aid 8665 crore in assistance for farmers affected by natural disasters relief for nashik ahilyanagar and jalgaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 09:07 PM

Topics:  

  • Farmer Crisis
  • goverment news
  • Maharshtra news

संबंधित बातम्या

Kidney-Liver Transplant : शासकीय रुग्णालयांत प्रत्यारोपण सुविधा वाढवा – हसन मुश्रीफ
1

Kidney-Liver Transplant : शासकीय रुग्णालयांत प्रत्यारोपण सुविधा वाढवा – हसन मुश्रीफ

Tribal Hostel :शासकीय आदिवासी वसतिगृहांबाबतचा शासन निर्णय रद्द ,वसतीगृह प्रवेशाची वयाची अट रद्द
2

Tribal Hostel :शासकीय आदिवासी वसतिगृहांबाबतचा शासन निर्णय रद्द ,वसतीगृह प्रवेशाची वयाची अट रद्द

Navi Mumbai: वर्षानुवर्षे एकाच आरोग्य केंद्रात ड्युटी; वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्सच्या बदल्यांसाठी राष्ट्रवादी आक्रमक
3

Navi Mumbai: वर्षानुवर्षे एकाच आरोग्य केंद्रात ड्युटी; वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्सच्या बदल्यांसाठी राष्ट्रवादी आक्रमक

Jalgaon News: ज्वारी खरेदीला ब्रेक! चार दिवसांपासून केंद्र बंद, नोंदणीच्या घोळामुळे शेतकरी संतप्त
4

Jalgaon News: ज्वारी खरेदीला ब्रेक! चार दिवसांपासून केंद्र बंद, नोंदणीच्या घोळामुळे शेतकरी संतप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.