Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FDA News: आता एजंटची पण खैर नाही…! ‘परवाना मिळवून देतो’ म्हणत पैशांची मागणी करणाऱ्यांपासून सावध, FDA चा इशारा

FDA News: अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्राने अन्न व औषधविषयक परवाने मिळवण्यासाठी बनावट एजंट, मध्यस्थ किंवा व्यक्तींची मदत घेऊ नये, असे आवाहन केले आहे. परवाना अर्ज आणि मंजुरीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, FDA महाराष्ट्राने कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थाची अधिकृत नियुक्ती केलेली नाही.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 13, 2026 | 06:28 PM
आता एजंटची पण खैर नाही...! ‘परवाना मिळवून देतो’ म्हणत पैशांची मागणी करणाऱ्यांपासून सावध, FDA चा इशारा

आता एजंटची पण खैर नाही...! ‘परवाना मिळवून देतो’ म्हणत पैशांची मागणी करणाऱ्यांपासून सावध, FDA चा इशारा

Follow Us
Follow Us:
  • अन्न-औषध परवाने फक्त ऑनलाइनच
  • बनावट एजंटांपासून सावध राहण्याचे FDAचे आवाहन
  • ‘परवाना मिळवून देतो’ म्हणत पैशांची मागणी करणाऱ्यांपासून सावध
FDA News: तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार स्विकारताच कारवाईचा धडाका लावला आहे. अशातच आता आणखी एक निर्णय घेत अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्राने अन्न व औषधविषयक परवाने मिळवून देण्याच्या नावाखाली नागरिकांकडून पैशांची मागणी करणाऱ्या बनावट एजंट आणि मध्यस्थांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. काही व्यक्ती किंवा संस्था स्वतःला अन्न व औषध प्रशासनाचे अधिकृत एजंट असल्याचे भासवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा व्यक्तींकडून शासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नावाचाही गैरवापर केला जात असल्याचे FDA महाराष्ट्राने स्पष्ट केले आहे.

FDAने कोणत्याही एजंटची नियुक्ती केलेली नाही

अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अन्न व औषधविषयक परवाने मिळवण्यासाठी कोणत्याही एजंट, मध्यस्थ किंवा खासगी व्यक्तीची अधिकृत नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे परवाना मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीमार्फत अर्ज करण्याची आवश्यकता नाही. संबंधित अर्जदाराने स्वतः अधिकृत ऑनलाइन प्रणालीचा वापर करून अर्ज करावा.

तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांवरील कँटीनकडे; सिल्लोडमध्ये FDA ची धडक कारवाई

परवाना प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन

अन्न व औषधविषयक परवान्यासाठी अर्ज करण्यापासून ते परवाना मंजुरीपर्यंतची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक, औषध उत्पादक, घाऊक व किरकोळ औषध विक्रेते तसेच Food Business Operators यांनी कोणत्याही मध्यस्थाच्या माध्यमातून अर्ज करण्याची गरज नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह स्वतः ऑनलाइन अर्ज करावा आणि अधिकृत पोर्टलवर उपलब्ध मार्गदर्शक सूचनांचा वापर करावा.

कोणत्या वेबसाइटवर अर्ज करायचा?

औषधविषयक परवान्यांसाठी FDA महाराष्ट्राचे अधिकृत ऑनलाइन पोर्टल वापरावे:

FDA Maharashtra अधिकृत पोर्टल

अन्नविषयक परवान्यांसाठी अधिकृत FoSCoS पोर्टलचा वापर करावा:

FoSCoS – FSSAI अधिकृत पोर्टल

या पोर्टलवर अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक मार्गदर्शक सूचना उपलब्ध आहेत.

‘परवाना मिळवून देतो’ म्हणत पैशांची मागणी?

FDAच्या अधिकाऱ्यांच्या नावाने किंवा अधिकारी-कर्मचाऱ्यांमार्फत अर्जावर कारवाई करून देण्याच्या नावाखाली कोणी आर्थिक मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अशा प्रकारची आर्थिक मागणी करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेविरोधात माहिती देताना तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

औषध उत्पादक आणि विक्रेत्यांनाही इशारा

या सूचनेमध्ये महाराष्ट्रातील औषध उत्पादक, घाऊक आणि किरकोळ औषध विक्रेते, Food Business Operators तसेच अन्न व औषध परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या सर्व संबंधितांना सावध करण्यात आले आहे.

बनावट एजंटांच्या आमिषाला बळी न पडता अधिकृत ऑनलाइन प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Blinkit च्या मालाड गोदामावर FDA चा छापा; फूड लायसन्स निलंबित, कारवाईने खळबळ

मार्गदर्शक सूचना ऑनलाइन उपलब्ध

औषध परवान्यासाठी अर्ज प्रक्रिया आणि मार्गदर्शक सूचना FDA महाराष्ट्राच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहेत. तसेच अन्न परवान्यासाठी FoSCoS प्रणालीवर अर्ज करण्याची प्रक्रिया आणि मार्गदर्शक सूचना उपलब्ध आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, परवाना मिळवण्यासाठी कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थाची आवश्यकता नाही. अर्जदाराने स्वतः अधिकृत ऑनलाइन प्रणालीचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘परवाना मंजूर करून देतो’ किंवा ‘अधिकाऱ्यांशी संपर्क आहे’ असे सांगून पैसे मागणाऱ्या व्यक्तींपासून नागरिकांनी सावध राहावे.

Web Title: Maharashtra fda warns against fake agents for drug and food licenses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • FDA
  • maharashtra

संबंधित बातम्या

Gondiya News: मृतदेह तब्बल दोन तास रस्त्यावर; स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण! शेतात केला अंत्यसंस्कार!
1

Gondiya News: मृतदेह तब्बल दोन तास रस्त्यावर; स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण! शेतात केला अंत्यसंस्कार!

सोनाली गायकवाड आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, नवरा गेल्यानंतर सासरच्यांनी…; माहेरच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप
2

सोनाली गायकवाड आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, नवरा गेल्यानंतर सासरच्यांनी…; माहेरच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर
3

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर

From Worker to Contractor: मजुरापासून कंत्राटदारापर्यंत; सुनील अडे यांच्या मेहनतीची यशोगाथा
4

From Worker to Contractor: मजुरापासून कंत्राटदारापर्यंत; सुनील अडे यांच्या मेहनतीची यशोगाथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.