Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondiya News: मृतदेह तब्बल दोन तास रस्त्यावर; स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण! शेतात केला अंत्यसंस्कार!

पळसगाव डव्वा येथे स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण झाल्यामुळे मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा न मिळाल्याने तब्बल दोन तास मृतदेह रस्त्यावर ठेवावा लागला. महसूल व पोलिस प्रशासनाने मध्यस्थी करत शेतशिवारात अंत्यसंस्कार घडवून आणले असून, जागेची मोजणी करून अतिक्रमण हटवण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 13, 2026 | 07:07 PM
Gondiya News: मृतदेह तब्बल दोन तास रस्त्यावर; स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण! शेतात केला अंत्यसंस्कार!
Follow Us
Follow Us:
  • पळसगाव डव्वा येथे स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाच उपलब्ध झाली नाही.
  • जागेच्या अभावामुळे नातेवाईकांना तब्बल दोन तास मृतदेह रस्त्यावर ठेवून तीव्र विरोध व संताप व्यक्त करावा लागला.
  • नायब तहसीलदार व पोलिसांनी मध्यस्थी करत एका शेतात अंत्यसंस्कार केले असून, जागेची मोजणी करून तिढा सोडवण्याचे आश्वासन दिले.

तालुक्यातील पळसगाव डव्वा येथे स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला. गावातील शांताबाई बिसन बनसोड यांचे मंगळवारी निधन झाले. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावातील स्मशानभूमीत नेण्यात आला. मात्र, स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने अंत्यसंस्कारासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे मृतदेह तब्बल दोन तास रस्त्यावर ठेवावा लागला.

गट क्रमांक ३८१/२ मधील स्मशानभूमीसाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेवर गोवर्धन शेंडे यांनी अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. अतिक्रमण हटविण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.

Gondiya News: लाच घेताना वनपाल अडकला जाळ्यात! एसीबीची पारसटोला येथे धडक कारवाई; दोन वनरक्षकांनाही घेतले ताब्यात

घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन तसेच नायब तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाने मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्नकेला. अखेर प्रशासनाच्या उपस्थितीत एका शेतशिवारातील जागेत शांताबाई बनसोड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अतिक्रमण हटविण्याची मागणी; गावातील स्मशानभूमीच्या जागेवर पळसगाव डव्वा येथे स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने अंत्यसंस्कारासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला.

त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिस व महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत गावकरी व मृताच्या नातेवाईकांची समजूत काढली. अखेर प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर शेतजमिनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

Gondiya News: पुरामुळे तुटतोय ९६ गावांचा संपर्क! पावसाळ्यामध्ये वैनगंगा आणि बाग नदीला येतोय पूर

गावातील स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. मात्र, शेतकऱ्याची नेमकी जागा किती आणि स्मशानभूमीसाठी किती जागा निश्चित आहे, याची महसूल विभागाकडून चौकशी करण्यात येणार आहे. महसूल प्रशासनामार्फत जागेची मोजणी करून वस्तुस्थिती स्पष्ट केली जाईल. तसेच हा तिढा लवकरच सोडविण्यात येईल. असे हसीना जांभूळकर, सरपंच, पळसगाव डव्वा यांनी सांगितले.

अतिक्रमणधारक शेतकरी गोवर्धन शेंडे यांना विचारपूस करण्यात आली. त्यांच्या मतानुसार त्यांच्या मालकी हक्काची साडेपाच एकर शेतजमीन आहे. मात्र, त्यांना लवकरच नोटीस बजावली जाणार आहे. त्यांच्या शेतजमिनीची मोजणी केली जाईल. त्यानंतर गावकऱ्यांच्या स्मशानभूमीचा तिढा सोडविला जाईल.- जे. आर. जांभूळकर, नायब तहसीलदार, सडक अर्जुनी.

Web Title: Palasgaon davwa crematorium land encroachment funeral delayed two hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 07:07 PM

Topics:  

  • gondiya
  • india
  • maharashtra

संबंधित बातम्या

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
1

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

Pilot Career: आकाशात संकट आलं तर पायलट काय करतो? कॉकपिट ट्रेनिंगपासून लाखोंच्या पगारापर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती
2

Pilot Career: आकाशात संकट आलं तर पायलट काय करतो? कॉकपिट ट्रेनिंगपासून लाखोंच्या पगारापर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन
3

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन

Dombivli News: आणखी किती जणांचा जीव धोक्यात जाणार? गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
4

Dombivli News: आणखी किती जणांचा जीव धोक्यात जाणार? गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.