फोटो - टीम नवराष्ट्र
महाराष्ट्राच्या भूमीला खूप मोठा इतिहास आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारने प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे. प्रतापगड किल्ल्याला फार मोठा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला आदिलशहाचा सरदार अफजलखान याचा वध केला होता. त्या प्रतापगडाच्या विकासासाठी राज्य सरकारने प्राधिकरणाची स्थापना केली आहे. भाजप खासदार छत्रपती उदयनमहाराज भोसले हे या प्राधिकरणाचे अध्यक्ष असणार आहेत.
राज्य सरकारने प्रतापगड किल्ल्याच्या विकासासाठी प्राधिकरणाची स्थापना केली आहे. छत्रपती उद्यानमहाराज भोसले या प्राधिकरणाचे अध्यक्ष असणार आहेत. तसेच प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणावर सहअध्यक्ष म्हणून साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर निमंत्रित सदस्य म्हणून विजय नायडू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
प्रतापगड किल्ल्याचे बांधकाम हे छत्रपती शिवाची महाराजांच्या काळात १६५६ मध्ये करण्यात आले. १० नोव्हेंबर १६५९ मध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी सरदार अफजलखान याचा वध केला होता. ही एक मोठी ऐतिहासिक घटना आहे. अशा या ऐतिहासिक किल्य्याच्या विकासासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. उदयनराजे भोसले यांना या प्राधिकरणाचे अध्यक्ष करण्यात आले आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबतचे आदेश काढले आहेत.