Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis : ड्रग्जविरोधात सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात उभारणार विशेष युनिट

राज्यातील अमली पदार्थांची विक्री, तस्करी आणि सेवन रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कारवाईसाठी स्वतंत्र अँटी-नार्कोटिक्स युनिट उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 23, 2026 | 05:10 PM
Devendra Fadnavis Super CM, Maharashtra Government Business Rules 2026,

Devendra Fadnavis Super CM, Maharashtra Government Business Rules 2026,

Follow Us
Follow Us:
  • प्रत्येक पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कार्यवाहीसाठी स्वतंत्र युनिट उभारणार
  • अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून
  • एकत्रित कार्यपद्धती कार्यरत, मुख्यमंत्र्‍यांचा निर्णय
मुंबई : राज्यातील अमली पदार्थांची विक्री, तस्करी आणि सेवन रोखण्यासाठी राज्य शासनाकडून व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. अमली पदार्थ व्यापार व सेवनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कार्यवाहीसाठी स्वतंत्र युनिट उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. राज्यातील अमली पदार्थ विक्री व सेवनासंदर्भात सदस्य सुनील प्रभू यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी सदस्य सुधीर मुनगंटीवार, जयंत पाटील, अमीन पटेल, योगेश सागर आणि संजय क्षीरसागर यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अमली पदार्थांचे उत्पादन, तस्करी आणि सेवन हे केवळ महाराष्ट्रासमोरील नव्हे तर संपूर्ण देशासमोरील गंभीर आव्हान आहे. केंद्र शासनाने देशव्यापी अमली पदार्थविरोधी मोहीम हाती घेतली असून त्याअंतर्गत राज्य शासनाने ‘Whole of Government Approach’ विकसित केला आहे. गृह विभागाच्या माध्यमातून विविध विभागांमध्ये समन्वय साधून अवैध अमली पदार्थांची शेती, लागवड, उत्पादन, व्यापार, वाहतूक, विक्री आणि सेवन यांवर नियंत्रण आणण्यासाठी व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

अवैध मालवाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सचे थेट परमीट रद्द होणार; परिवहन मंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा

अमली पदार्थांच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी राज्यभर जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानाद्वारेही जनजागृती करण्यात येत आहे. तसेच अमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ कायद्यात (NDPS Act) सुधारणा करण्याबाबत केंद्र शासनाला राज्य शासनाने सूचना पाठविल्या असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

राज्य शासनाच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणानुसार NDPS कायद्यांतर्गत दोषी आढळणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, अमली पदार्थविरोधी कारवाईत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बढती, प्रोत्साहनपर लाभ आणि विशेष नियुक्ती देण्यात येणार आहे. अमली पदार्थविरोधी टास्क फोर्समध्ये तीन वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर इच्छेनुसार बदलीची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. मुंबई पोलिसांनी गुजरात, तेलंगणा, उत्तर प्रदेशसह विविध राज्यांत जाऊन यशस्वी कारवाया केल्या आहेत. २०२५ मध्ये अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स आणि पोलीस यंत्रणेमार्फत तब्बल ५२३.१७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले.

जानेवारी ते एप्रिल २०२६ या कालावधीत अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी १,१४२ गुन्हे दाखल करण्यात आले असून १,६२६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत २५४.५३ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच अमली पदार्थ सेवनाविरोधात ३,१९९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मे २०२६ अखेर अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात ५२८ गुन्हे दाखल करून ६५५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच सेवन करणाऱ्या २,८५५ जणांविरोधात गुन्हे दाखल करून २,४५९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

उपप्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील आरोपी सलीम डोला याला परदेशातून अटक करून भारतात आणण्यात आले असून अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई सुरू आहे. कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ जाळून पूर्णतः नष्ट करण्यात येतात, त्यामुळे तो माल पुन्हा बाजारात येण्याची शक्यता राहत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात सध्या अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची सात युनिट्स कार्यरत असून नव्याने पदनिर्मिती करून त्यांचा विस्तार करण्यात येणार आहे. तसेच अमली पदार्थांबाबत माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख गोपनीय ठेवून त्यांना बक्षीस देण्याची योजनाही राबविण्यात येणार आहे.

मुंबई आणि परिसरातील व्यसनाधीन रुग्णांच्या पुनर्वसनासाठी विशेष केंद्रे उभारण्याकरिता जमीन उपलब्ध करून देण्याबाबत मुंबई महानगरपालिकेला निर्देश दिले जाणार आहेत. याशिवाय आरोग्य विभाग आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात व्यसनमुक्ती केंद्रे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चित्रपट आणि इतर माध्यमांमधून होणाऱ्या अमली पदार्थांच्या उदात्तीकरणाबाबतही शासन गंभीर असून त्यावर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

Anna Hazare : केंद्र सरकारला अण्णा हजारेंचा इशारा; RTI नियमांतील बदल मागे न घेतल्यास 5 जुलैपासून उपोषण

Web Title: Maharashtra government to set up anti narcotics units in every police station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Drugs
  • maharashtra
  • police

संबंधित बातम्या

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
1

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
2

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
3

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
4

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.