Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking Live Today’s News: महाराष्ट्राच्या राजकारणासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडे्स एका क्लिकवर

#MaharashtraLive, #LiveBlogMarathi #BreakingNews #आजच्या_बातम्या, आजच्या ताज्या बातम्या LIVE: महाराष्ट्र आणि देश-विदेशातील प्रत्येक मोठी घडामोड एका क्लिकवर

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 22, 2025 | 01:20 PM
LIVE
#LiveBlogMarathi #BreakingNews #आजच्या_बातम्या

#LiveBlogMarathi #BreakingNews #आजच्या_बातम्या

Follow Us
Close
Follow Us:
  • 22 Dec 2025 01:20 PM (IST)

    22 Dec 2025 01:20 PM (IST)

    नवीन वर्षाच्या जल्लोषावर ISISचे सावट; जागतिक स्तरावर हल्ल्यांचा मोठा कट

    संपूर्ण जग नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असतानाच एक अत्यंत भीतीदायक बातमी समोर आली आहे. क्रूरतेचा कळस गाठलेली दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (ISIS) पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. अमेरिकन मासिक ‘न्यूजवीक’ने (Newsweek) प्रसिद्ध केलेल्या एका खळबळजनक अहवालानुसार, आयसिसचे दहशतवादी नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये रक्ताचा खेळ खेळण्याच्या तयारीत आहेत. सौदी अरेबिया, इंडोनेशिया आणि फिलीपिन्स यांसारख्या देशांतून मिळालेल्या काही संशयास्पद ‘सांकेतिक संदेशांनी’ (Coded Messages) जागतिक सुरक्षा यंत्रणांची झोप उडवली आहे.

  • 22 Dec 2025 01:10 PM (IST)

    22 Dec 2025 01:10 PM (IST)

    मंत्रीपद गेले तरी आमदारकी कायम राहणार;माणिकराव कोकाटेंना सर्वोच्च दिलासा, पण…

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी निवासस्थान मिळवल्याच्या प्रकरणात न्यायालयाने कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे, ज्यामुळे त्यांना आमदार अपात्रतेपासून तात्पुरते संरक्षण मिळाले आहे. हा कायदेशीर वाद जवळजवळ तीन दशकांपासूनचा आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे  यांनी नाशिक शहरातील उच्चभ्रू भागात असलेल्या कॅनडा कॉर्नर येथील निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्याअंतर्गत एक फ्लॅट मिळवला होता.

  • 22 Dec 2025 01:04 PM (IST)

    22 Dec 2025 01:04 PM (IST)

    हा’ दक्षिण भारतीय स्टार मोठ्या पडद्यावर साकारणार मोदींची भूमिका

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आणखी एका बायोपिकचे काम सुरू आहे. या चित्रपटाचे नाव “माँ वंदे” असेल. या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. पंतप्रधान मोदींवरील या बायोपिकची घोषणा झाल्यापासून, लोक त्याच्या मुख्य अभिनेत्याबद्दल उत्सुक आणि उत्सुक आहेत. लोकप्रिय दक्षिण भारतीय स्टार उन्नी मुकुंदन “माँ वंदे” मध्ये मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. मल्याळम चित्रपट अभिनेता उन्नी मुकुंदन मोठ्या पडद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारणार आहे. हा दक्षिण भारतीय स्टार बराच काळ गुजरातमध्ये राहत आहे.

  • 22 Dec 2025 01:00 PM (IST)

    22 Dec 2025 01:00 PM (IST)

    पुण्यात किरकोळ वादातून दोघांवर खुनी हल्ला; नेमकं काय घडलं?

    किरकोळ वादातून वेगवेगळ्या घटनेत दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना चतु:शृंगी तसेच धानोरी भागात घडली आहे. याप्रकरणी चतु:शृंगी आणि विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 22 Dec 2025 12:55 PM (IST)

    22 Dec 2025 12:55 PM (IST)

    व्यापाऱ्याचा खून! कारमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह; घरकाम करणारीच ठरली कटामागे

    पंजाबमधील नवांशहरमध्ये व्यापारी रवी सोबती यांचा खून करून मृतदेह कारमध्ये जाळण्यात आला. तपासात घरकाम करणारी सोनम आणि तिचा दाजी कटामागे असल्याचं उघड झालं असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

  • 22 Dec 2025 12:50 PM (IST)

    22 Dec 2025 12:50 PM (IST)

    शाळेतून घरी जाताना आठवीच्या विद्यार्थ्यावर चाकूहल्ला

    नागपुरात धक्कादायक घटना! शाळेतील गॅदरिंग आटोपून घरी जात असताना आठवीच्या 13 वर्षीय विद्यार्थ्यावर चाकूहल्ला झाला. जखमी विद्यार्थ्यावर मेयो रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. हल्लेखोर अल्पवयीन असण्याची शक्यता.

  • 22 Dec 2025 12:40 PM (IST)

    22 Dec 2025 12:40 PM (IST)

    शेतवाटपाच्या वादातून मुलानेच जन्मदात्या पित्याचा दगड घालून खून

    सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यात शेतवाटप व कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना घडली. दारूच्या नशेत मुलानेच वडिलांच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

  • 22 Dec 2025 12:30 PM (IST)

    22 Dec 2025 12:30 PM (IST)

    दिव्यांग महिलेवर लैंगिक शोषण करून ब्लॅकमेल

    मुंबईत मूक-बधिर दिव्यांग तरुणींना टार्गेट करून लैंगिक अत्याचार व ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश झाला. 2009 मधील अत्याचाराची पीडितेने 16 वर्षांनंतर तक्रार दिल्यावर महेश पवारला अटक करण्यात आली.

  • 22 Dec 2025 11:55 AM (IST)

    22 Dec 2025 11:55 AM (IST)

    पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात - नितेश राणे

    भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन सूचक विधान केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल हाती आल्यानंतर यामध्ये नितेश राणे यांनी बाजी मारली. यानंतर आता त्यांनी लिहिले आहे की, गप्प होतो .. पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी.. पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात.. पण आता ती वेळ आली आहे ! अशी सूचक पोस्ट नितेश राणे यांनी केली आहे.

    गप्प होतो ..
    पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी..
    पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात..
    पण आता ती वेळ आली आहे !

    — Nitesh Rane (@NiteshNRane) December 22, 2025

  • 22 Dec 2025 11:45 AM (IST)

    22 Dec 2025 11:45 AM (IST)

    नगर पंचायतीच्या निवडणूका जिंकल्यानंतर PM मोदींनी केली खास पोस्ट

    महाराष्ट्राच्या नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे.पंतप्रधान मोदींनी लिहिले आहे की, "महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! ​ नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपा आणि महायुतीवर विश्वास दाखवल्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा ऋणी आहे. आमच्या लोक-केंद्रित विकासाच्या दृष्टीकोनावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचे हे प्रतिबिंब आहे. आम्ही राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नव्या ऊर्जेने काम करण्यासाठी वचनबद्ध आहोत. ​भाजपा आणि महायुतीच्या तळागाळापर्यंत मेहनत घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी कौतुक करतो, असे पंतप्रधानांनी लिहिले आहे.

    महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!
    ​
    नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपा आणि महायुतीवर विश्वास दाखवल्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा ऋणी आहे. आमच्या लोक-केंद्रित विकासाच्या दृष्टीकोनावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचे हे प्रतिबिंब आहे. आम्ही राज्यातील प्रत्येक… https://t.co/X5jmfpb3M8

    — Narendra Modi (@narendramodi) December 21, 2025

  • 22 Dec 2025 11:35 AM (IST)

    22 Dec 2025 11:35 AM (IST)

    ठाकरे बंधूंमध्ये जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु

    मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी बैठकांचे सत्र सुरु आहे. प्रत्येक बैठक संपल्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी जागावापट होऊन मनसे आणि ठाकरे गटाची युती जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, अनेक मराठीबहुल भागांमध्ये प्रभागांच्या वाटणीवरुन शिवसेना-ठाकरे गटात रस्सीखेंच सुरु असल्याची माहिती आता समोर आली आहे.

  • 22 Dec 2025 11:25 AM (IST)

    22 Dec 2025 11:25 AM (IST)

    मुंबई लोकलमधून 18 वर्षीय तरुणीने चालत्या ट्रेनमधून दिला धक्का

    50 वर्षीय शेख अख्तर नवाज असे आरोपीचे नाव असून तो मुंबईल लोकलमधील महिलांच्या डब्यात चढला होता. ते पाहून डब्यातील काही महिला प्रवाशांनी त्याला खाली उतरण्यास सांगितलं, यावरून त्यांच्यात बोलाचाली झाली. एका 18 वर्षांच्या तरूणीनेही नवाज याला विरोध दर्शवत खाली उतरायला सांगितलं. मात्र ते ऐकून आरोपी प्रचंड संतापला आणि रागाच्या भरात त्याने मागचा पुढचा विचार न करता त्या तरुणीला चालत्या लोकलमधून धक्का देऊन बाहेर फेकलं

  • 22 Dec 2025 11:15 AM (IST)

    22 Dec 2025 11:15 AM (IST)

    भारत हिंदू राष्ट्रच, संविधानाच्या मान्यतेची गरज नाही - मोहन भागवत

    “भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे आणि हे वास्तव स्वीकारण्यासाठी कोणत्याही घटनात्मक मंजुरीची किंवा कागदोपत्री पुराव्याची आवश्यकता नाही”, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली. कोलकाता येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० व्या वर्षानिमित्त आयोजित १०० व्याख्यानमाला या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

  • 22 Dec 2025 11:05 AM (IST)

    22 Dec 2025 11:05 AM (IST)

    शीख धर्माचे दहावे गुरु गोविंद सिंह यांची जयंती

    शिख सांप्रदायातील शेवटचे गुरु म्हणजे गुरु गोविंद सिंह. ते शीख धर्माचे दहावे आणि शेवटचे मानवी गुरू होते. गुरु गोविंद सिंह  यांनी १६९९ मध्ये खालसा पंथाची स्थापना केली, शिखांना ‘पाच ककार’ (केश, कडा, कंघा, काचेरा, कृपाण) धारण करण्याचा आदेश दिला, न्याय, समानता आणि शौर्याचा संदेश दिला आणि गुरु ग्रंथ साहिब यांना शिखांचा शाश्वत गुरू घोषित करून गुरु-परंपरा थांबवली. त्यांचा जन्म २२ डिसेंबर १६६६ रोजी पटना येथे झाला आणि मृत्यू ७ ऑक्टोबर १७०8 रोजी महाराष्ट्रातील नांदेड येथे झाला. आज त्यांची जयंती असून शिख बांधव उत्साहाने ती साजरी करत आहेत.

  • 22 Dec 2025 10:59 AM (IST)

    22 Dec 2025 10:59 AM (IST)

    iPhone 20 मध्ये होणार सर्वात मोठा बदल!

    टेक जायंट कंपनी Apple पुढील वर्षी त्यांची आयफोन 18 सिरीज लाँच करणार आहे. या सिरीजमध्ये कोणत्या मॉडेल्सचा समावेश असणार आहे आणि त्यांचे स्पेसिफिकेशन्स काय असणार आहे, याबाबत सतत नवीन अपडेट्स समोर येत असतात. याशिवाय असं देखील सांगितलं जात आहे की, कंपनी आयफोन 18 सिरीजसोबत फोल्डेबल आयफोन देखील लाँच करणार आहे. कंपनीच्या आगामी आयफोन 18 सिरीजमध्ये कोणत्या मॉडेल्सचा समावेश केला जाणार आहे, याची माहिती देखील समोर आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनी आयफोन 18 सिरीजअंतर्गत iPhone 18, 18 Pro आमि 18 Pro Max लाँच करणार आहे.

  • 22 Dec 2025 10:54 AM (IST)

    22 Dec 2025 10:54 AM (IST)

    रशियाचा युक्रेनमध्ये कहर !

    रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) दिवसेंदिवस भयंकर होत चालले आहे. या युद्धाने आतापर्यंत हजारोंचा बळी घेतला आहे. या युद्धाने सर्वाधिक युक्रेनचे नुकसान केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. यामुळे युक्रेनमध्ये अनेक पायाभूत सुविधा नष्ट झाल्या आहेत. युक्रेनेचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या आठड्यात रशियाने अनेक ड्रोन आणि ग्रेनेड बॉम्ब, क्षेपणास्त्रे युक्रेनच्या प्रदेशांवर डागली आहे.

  • 22 Dec 2025 10:47 AM (IST)

    22 Dec 2025 10:47 AM (IST)

    प्लेअर्सना मिळणार 67 Emote फ्री मिळवण्याची सुवर्णसंधी

    फ्री फायर मॅक्समध्ये नवीन फेडेड व्हिल ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना 67 ईमोट मोफत जिंकण्याची संधी मिळणार आहे. हा या गेममधील लक रॉयल ईव्हेंट आहे, ज्यामध्ये रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावं लागणार आहे. या गेममध्ये रिवॉर्ड जिंकणं तुमच्या नशिबावर अवलंबून असणार आहे. प्रत्येक स्पिननंतर प्लेअर्सना रिवॉर्ड मिळणार आहे. या ईव्हेंटमधील ग्रँट प्राईज मिळवण्यासाठी देखील प्लेअर्सना स्पिन करावं लागणार आहे. स्पिन करण्यासाठी तुम्हाला डायमंड्स खर्च करावे लागणार आहे.

  • 22 Dec 2025 10:40 AM (IST)

    22 Dec 2025 10:40 AM (IST)

    चॅम्पियन महिला संघाची विजयी सुरुवात

    भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेचा पहिला सामना काल पार पडला, या पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली आणि संघाने विजयी सुरुवात केली आहे. या विजयासह भारताच्या संघाने मालिकेमध्ये देखील 1-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम, भारतीय संघाने शानदार गोलंदाजी केली आणि श्रीलंकेला मजबूत धावसंख्या उभारण्यापासून रोखले. त्यानंतर, भारतीय गोलंदाजांनी त्यांची ताकद दाखवून विजय मिळवला. भारताने श्रीलंकेचा 8 विकेट्सने पराभव केला.

  • 22 Dec 2025 10:32 AM (IST)

    22 Dec 2025 10:32 AM (IST)

    चीनमध्ये ‘Uyghur Muslims’वर ‘Genocide Emergency’

    जगातील महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चीनचा (China) खरा आणि क्रूर चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. चीनच्या शिनजियांग प्रांतात राहणाऱ्या उइगर मुस्लिमांच्या (Uighur Muslims in China) अस्तित्वावरच आता संकट ओढवले आहे. वॉशिंग्टन येथील प्रतिष्ठित संस्था ‘जेनोसाइड वॉच’ (Genocide Watch) ने आपल्या ताज्या अहवालात २०२५ सालासाठी चीनमध्ये “नरसंहार आणीबाणी” (Genocide Emergency) जाहीर केली आहे. या अहवालाने मानवी हक्कांच्या रक्षणाचा दावा करणाऱ्या जागतिक समुदायाचे डोळे उघडले असून, उइगर मुस्लिमांचा पद्धतशीरपणे नाश केला जात असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

  • 22 Dec 2025 10:27 AM (IST)

    22 Dec 2025 10:27 AM (IST)

    स्मृती मानधनाने पुनरागमन करून रचला इतिहास!

    मानधना २३ नोव्हेंबर रोजी संगीतकार पलाश मुच्छल यांच्याशी लग्न करणार होती, परंतु लग्न रद्द झाले. त्यानंतर, भारतीय खेळाडूने पहिल्यांदाच मैदानावर पाऊल ठेवले आणि इतिहास रचला. विशाखापट्टणम येथे श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात तिने हे केले, ज्यामध्ये भारताने विजय मिळवला. या सामन्यात मानधनाने मोठी खेळी केली नाही, पण तरीही तिने एका खास यादीत आपले स्थान मिळवले. ती या यादीतील फक्त दुसरी फलंदाज आहे. मानधनाने श्रीलंकेविरुद्ध २५ चेंडूंचा सामना केला आणि तेवढ्याच धावा केल्या. डावखुऱ्या फलंदाजाने तिच्या डावात चार चौकार मारले. या खेळीदरम्यान, मंधानाने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एक मोठा टप्पा गाठला. तिने ४,००० टी-२० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा ओलांडला.

  • 22 Dec 2025 10:19 AM (IST)

    22 Dec 2025 10:19 AM (IST)

    बांगलादेशी मीडियाविरुद्ध MEA Randhir Jaiswal यांचा ‘नो नॉन्सेन्स’ वार

    भारत (India) आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यातील संबंध सध्या एका नाजूक वळणावर आहेत. अशातच बांगलादेशातील काही माध्यम समूहाने दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर झालेल्या निदर्शनांबाबत खोट्या आणि चिथावणीखोर बातम्या पसरवण्यास सुरुवात केली आहे. या ‘फेक न्यूज’ मोहिमेचा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) तीव्र शब्दात निषेध केला आहे. भारताने स्पष्टपणे सांगितले आहे की, बांगलादेशी माध्यमांमध्ये जे काही दाखवले जात आहे, तो केवळ एक जाणीवपूर्वक रचलेला ‘प्रोपोगंडा’ म्हणजेच अपप्रचार आहे.

  • 22 Dec 2025 10:14 AM (IST)

    22 Dec 2025 10:14 AM (IST)

    IND W vs SL W : पहिल्या सामन्यात श्रीलंका 8 विकेट्सने पराभूत

    भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेचा पहिला सामना काल पार पडला, या पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली आणि संघाने विजयी सुरुवात केली आहे. या विजयासह भारताच्या संघाने मालिकेमध्ये देखील 1-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम, भारतीय संघाने शानदार गोलंदाजी केली आणि श्रीलंकेला मजबूत धावसंख्या उभारण्यापासून रोखले. त्यानंतर, भारतीय गोलंदाजांनी त्यांची ताकद दाखवून विजय मिळवला. भारताने श्रीलंकेचा 8 विकेट्सने पराभव केला.

  • 22 Dec 2025 10:13 AM (IST)

    22 Dec 2025 10:13 AM (IST)

    भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय; स्मृती मंधानाचा नवा विक्रम

    विशाखापट्टनम : आयसीसी विमेन्स वर्ल्डकप २०२५ चा खिताब जिंकल्यानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात सध्या टी-२० मालिका खेळवण्यात येत असून, या मालिकेतील पहिला सामना रविवारी विशाखापट्टनमच्या मैदानावर झाला.

    या सामन्यात भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत श्रीलंकेवर ८ विकेट्सने विजय मिळवला. गोलंदाजांच्या अचूक माऱ्यानंतर फलंदाजांनी संयमी आणि आक्रमक खेळ साकारत सहज विजय संपादन केला.

    या विजयासोबतच भारतीय संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधानाने नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला गेला असून, चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • 22 Dec 2025 10:12 AM (IST)

    22 Dec 2025 10:12 AM (IST)

    या शेअर्सवर असणार आज गुंतवणूकदारांची नजर

    जागतिक बाजारातील सकारात्मक ट्रेंडमुळे सोमवार, २२ डिसेंबर रोजी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. वॉल स्ट्रीटवरील तंत्रज्ञान-चालित वाढीमुळे आशियाई शेअर बाजार सोमवारी तेजीत राहिले. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २६,१७० च्या जवळ व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा १३९ अंकांनी किंवा ०.५४% ने वाढला.

  • 22 Dec 2025 10:04 AM (IST)

    22 Dec 2025 10:04 AM (IST)

    शाळेतून घरी जाताना आठवीच्या विद्यार्थ्यावर चाकूहल्ला

    नागपूरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. शाळकरी विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना नवीन कामठी पोलीस ठाणे परिसरात शुक्रवारी (20 डिसेंबर 2025) संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. सीबीएसई इयत्ता आठवीचा विद्यार्थी शाळेतील गॅदरिंग आटोपून घरी जात असताना त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. यात तो गंभीर जखमी झाला. जखमी विद्यार्थ्यांवर मेयो हॉस्पिटलच्या आयसीयू विभागामध्ये उपचार सुरू आहेत.

  • 22 Dec 2025 09:58 AM (IST)

    22 Dec 2025 09:58 AM (IST)

    Shardul Thakur च्या घरी झाले खास पाहुण्याचे आगमन!

    स्टार फास्ट बॉलिंग ऑलराउंडर शार्दुल ठाकूर आणि मिताली पारुलकर एका मुलाचे पालक झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर त्यांची बातमी शेअर करत म्हटले आहे की, “पालकांच्या हृदयात लपलेले, शांतता, विश्वास आणि असीम प्रेमाने संरक्षित. आमचे रहस्य अखेर उघड झाले आहे. स्वागत आहे मुला, आम्ही नऊ महिने शांतपणे जोपासलेले स्वप्न.” ठाकूर आणि मितालीचे लग्न २७ फेब्रुवारी २०२३ रोजी झाले होते. लग्नापूर्वी त्यांनी एकमेकांना डेट केले होते. ते अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करताना दिसतात. मितालीने शार्दुलला त्याच्या कठीण काळात साथ दिली.

  • 22 Dec 2025 09:55 AM (IST)

    22 Dec 2025 09:55 AM (IST)

    Buldhana Election : सिंदखेड राजात २१ वर्षीय सौरभ तायडेंनी मारली बाजी

    सिंदखेड राजा (बुलढाणा) : राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. या निवडणुकांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा नगरपरिषदेची लढत विशेष चर्चेची ठरली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या चुरशीच्या संघर्षात अवघ्या २१ वर्षीय सौरभ तायडे यांनी विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • 22 Dec 2025 09:40 AM (IST)

    22 Dec 2025 09:40 AM (IST)

    India Bangladesh: फेक न्यूजचा पर्दाफाश! बांगलादेशी मीडियाविरुद्ध MEA Randhir Jaiswal यांचा ‘नो नॉन्सेन्स’ वार

    MEA Randhir Jaiswal on Bangladesh High Commission protest : भारत (India) आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यातील संबंध सध्या एका नाजूक वळणावर आहेत. अशातच बांगलादेशातील काही माध्यम समूहाने दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर झालेल्या निदर्शनांबाबत खोट्या आणि चिथावणीखोर बातम्या पसरवण्यास सुरुवात केली आहे. या ‘फेक न्यूज’ मोहिमेचा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) तीव्र शब्दात निषेध केला आहे. भारताने स्पष्टपणे सांगितले आहे की, बांगलादेशी माध्यमांमध्ये जे काही दाखवले जात आहे, तो केवळ एक जाणीवपूर्वक रचलेला ‘प्रोपोगंडा’ म्हणजेच अपप्रचार आहे.

  • 22 Dec 2025 09:35 AM (IST)

    22 Dec 2025 09:35 AM (IST)

    रशियाच युक्रेनमध्ये कहर ! एका आठवड्यात तब्बल ‘इतक्या’ ड्रोन अन् बॉम्बसाचा मारा

    Russia Ukraine War News Marathi : कीव/मॉस्को : रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) दिवसेंदिवस भयंकर होत चालले आहे. या युद्धाने आतापर्यंत हजारोंचा बळी घेतला आहे. या युद्धाने सर्वाधिक युक्रेनचे नुकसान केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. यामुळे युक्रेनमध्ये अनेक पायाभूत सुविधा नष्ट झाल्या आहेत. युक्रेनेचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या आठड्यात रशियाने अनेक ड्रोन आणि ग्रेनेड बॉम्ब, क्षेपणास्त्रे युक्रेनच्या प्रदेशांवर डागली आहे.

  • 22 Dec 2025 09:30 AM (IST)

    22 Dec 2025 09:30 AM (IST)

    Yavatmal News : राजकीय पाठबळाविना सचिन उर्फ जांभा कराळेंनी राठोडांचा बालेकिल्ला भेदला

    पाठीशी कोणतेही मोठे राजकीय पाठबळ नसताना, कोणत्याही पक्षाची साथ न घेता आणि आर्थिकदृष्ट्याही सक्षम नसतानाही एका तरुण उमेदवाराने लोकशाहीच्या या उत्सवात आपले नशीब आजमावले. विशेष म्हणजे, लोकराजाने त्याच्या पारड्यात भरभरून मतदान करत त्या तरुणाला दणदणीत विजय मिळवून दिला आहे. सचिन उर्फ जांभा कैलास कराळे असे या विजयी उमेदवाराचे नाव असून, त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे हा ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री संजय राठोड यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नेरमध्ये कराळे यांनी बाजी मारल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

  • 22 Dec 2025 09:25 AM (IST)

    22 Dec 2025 09:25 AM (IST)

    Entertainment News बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर’चा धुरळा; तिसऱ्या आठवड्यातही विक्रमी कमाई, क्रेझ कायम

    Dhurandhar Movie :  अक्षय खन्ना आणि रणवीर सिंह यांचा ‘धुरंधर’ हा चित्रपट सध्या भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. सिनेमा रिलीज होऊन तब्बल तीन आठवडे उलटले असले, तरीही प्रेक्षकांची क्रेझ कमी झाल्याचे कोणतेही संकेत दिसत नाहीत. उलट, तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटाने विक्रमी कमाई करत नवा इतिहास रचला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई सुरू ठेवली आहे. विशेष म्हणजे, सहसा चित्रपट तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी कमाईच्या बाबतीत संथावतात. मात्र, ‘धुरंधर’च्या बाबतीत याउलट चित्र पाहायला मिळत आहे. सिनेमाच्या कमाईत कोणतीही घट झालेली नाही, तर वाढच होताना दिसत आहे.

  • 22 Dec 2025 09:23 AM (IST)

    22 Dec 2025 09:23 AM (IST)

    WTC Latest Points Table: ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय; भारत-इंग्लंडच्या अंतिम फेरीच्या आशा मावळल्या

    ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या अंतिम दिवशी भेदक गोलंदाजी करत इंग्लंडचा ८२ धावांनी पराभव केला. या शानदार विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी निर्णायक आघाडी घेत अॅशेसवर कब्जा केला आहे. ४३५ धावांचे आव्हान मिळालेल्या इंग्लंडचा दुसरा डाव ३५२ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी अंतिम दिवशी प्रभावी मारा करत इंग्लंडला लक्ष्यापर्यंत पोहोचू दिले नाही.

Maharashtra- National And International Breaking news : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली आहे. मुळातच दोन्ही पक्षांनी आणि त्यांच्या सर्वोच्च नेतृत्त्वाने या निवडणुकीकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले नाही, याचा थेट परिणाम निकालांवर दिसून आला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही महायुतीच्या प्रमुख नेत्यांप्रमाणे मैदानात सक्रियपणे उतरले नव्हते. त्यामुळे या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांना फारसे यश मिळवता आले नाही.

दरम्यान, राज्यातील आगामी २९ महानगरपालिकांच्या निवडणुका ठाकरे गट आणि मनसेसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. यामध्ये विशेषतः मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही दोन्ही पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेसाठी (BMC Election 2026) मनसे आणि ठाकरे गटामध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे.

Web Title: Maharashtra india marathi breaking news today live updates maharashtra india world live todays breaking news live updates maharashtra political breaking news live coverage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 09:21 AM

Topics:  

  • Maharashtra Breaking News update

संबंधित बातम्या

Top Marathi News Today Live: कर्णधार आयुष म्हात्रेचा निर्णय फसला! पाकिस्तानने जिंकली फायनल आशिया कपवर कोरलं नाव
1

Top Marathi News Today Live: कर्णधार आयुष म्हात्रेचा निर्णय फसला! पाकिस्तानने जिंकली फायनल आशिया कपवर कोरलं नाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.