Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live: IND U19 vs PAK U19 सामन्याला सुरुवात, भारत गोलंदाजी करणार

Marathi Breaking Live Updates: राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन, क्रीडा विश्व, देश-विदेशसह इतर महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींसाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा...

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 21, 2025 | 01:10 PM
LIVE
Top Marathi News Today Live: महाराष्ट्रातील २८८ नगरपरिषदा, नगरपंचचायतींची मतमोजणी प्रक्रिया आज पार पडणार!

Top Marathi News Today Live: महाराष्ट्रातील २८८ नगरपरिषदा, नगरपंचचायतींची मतमोजणी प्रक्रिया आज पार पडणार!

Follow Us
Close
Follow Us:
  • 21 Dec 2025 01:15 PM (IST)

    21 Dec 2025 01:15 PM (IST)

    मिचेल स्टार्कने 2025 मध्ये जेम्स अँडरसन आणि शॉन पोलॉक यांना टाकलं मागे

    २०२५-२६ च्या अ‍ॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दणदणीत विजय मिळवला. अ‍ॅडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ८२ धावांनी पराभव करून अ‍ॅशेस कायम राखली. अवघ्या ११ दिवसांत तीन कसोटी सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचे अ‍ॅशेस जिंकण्याचे स्वप्न भंग केले. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने पर्थ कसोटी २ दिवसांत आणि गाब्बा कसोटी ४ दिवसांत जिंकली होती. तिसऱ्या कसोटीचा निकाल ५ व्या दिवशी लागला.

  • 21 Dec 2025 01:10 PM (IST)

    21 Dec 2025 01:10 PM (IST)

    हिवाळ्याच्या थंडीत ‘माये’चा उबदार हात: पुण्यात २ हजार विद्यार्थ्यांना हुडीज-जॅकेट्स वाटप

    आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लहान मुलांच्या आरोग्यावर हिवाळ्याच्या तीव्र थंडीमुळे परिणाम होऊ नये, तसेच त्यांचे शिक्षण खंडित होऊ नये, या सामाजिक जाणिवेतून पुणे शहर व पुण्यालगतच्या परिसरातील १८ प्राथमिक शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांसाठी हुडीज व जॅकेट्स वितरणाचा व्यापक सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला.हा सामाजिक उपक्रम गौरव नहार, अक्षय जैन, अमित लोढा, सिद्धार्थ नहार, शुभम लुनावत, आकाश ओसवाल, गौरव बठिया, सुयोग बोरा व साहिल नहार, या युवकांच्या पुढाकारातून राबवण्यात आला आहे. या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य व पाठबळ दिल्याबद्दल राजेश नहार, सुभाष नहार, स्नेहल चोरडिया, निकिता नहार, पायल बोरा,प्राजोत , यश नवलखा व कौशभ धोका यांचे विशेष आभार मानण्यात आले.

  • 21 Dec 2025 01:04 PM (IST)

    21 Dec 2025 01:04 PM (IST)

    जोतिबा डोंगरावर केदारण्य प्रकल्पाचा दुसरा टप्पा; विकास आराखड्याची अंबलबजावणी जलद गतीने सुरु

    महाराष्ट्रासह आसपासच्या राज्याच्ये लोकदैवत, कुलदैवत असलेल्या वाडी रत्नागिरी तालुका  पन्हाळा येथील श्री जोतिबा तिर्थक्षेत्रावरील डोंगराचे प्राचीन अध्यात्मिक आणि नैसर्गिक वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरणाच्या वतीने दख्खन केदारण्य या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या टप्पा क्रमांक 2 चा प्रारंभ डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

  • 21 Dec 2025 12:55 PM (IST)

    21 Dec 2025 12:55 PM (IST)

    नवी मुंबईत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, बॅकमेलिंग करत वर्षभर तोडले लचके

    नवी मुंबईत नेरूळ पोलीस ठाण्यात 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, मानसिक छळ आणि धमकी प्रकरणी POCSO कायद्यांतर्गत गुन्हा नोंद. आरोपी अद्याप फरार असून पोलीस तपास सुरू आहेत.

  • 21 Dec 2025 12:51 PM (IST)

    21 Dec 2025 12:51 PM (IST)

    JALGAON: प्रभाग क्रमांक ९ मध्ये शिवसेनेच्या नम्रता पाटील यांची ३,१४९ मतांची आघाडी

    प्रभाग क्रमांक नऊमध्ये शिवसेनेच्या नम्रता पाटील यांनी ३,१४९ मतांची आघाडी घेतली असून त्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. सध्या तरी शिवसेना आघाडीवर असल्यामुळे नम्रता पाटील यांचा विजय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र अजूनही चित्र अस्पष्ट आहे

  • 21 Dec 2025 12:50 PM (IST)

    21 Dec 2025 12:50 PM (IST)

    घरात एकटी असताना 18 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या

    छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील मुरमी येथे 18 वर्षीय वैष्णवी नीळ हिची घरात गळा चिरून निर्घृण हत्या झाली. एकही साक्षीदार नसतानाही वाळूज पोलिसांनी अवघ्या 4 तासांत आरोपी नानासाहेब मोरेला अटक केली.

  • 21 Dec 2025 12:40 PM (IST)

    21 Dec 2025 12:40 PM (IST)

    रागावून माहेरी गेलेली पत्नी परत यावी म्हणून ९ वर्षांच्या चिमुकलीची हत्या

    राजस्थानच्या अलवरमध्ये पत्नीशी वादातून एका नराधम बापाने आपल्या ९ वर्षांच्या मुलीचा गळा दाबून खून केला. पत्नी परत यावी म्हणून लेकीचा जीव घेतल्याचं तपासात उघड झालं असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

  • 21 Dec 2025 12:35 PM (IST)

    21 Dec 2025 12:35 PM (IST)

    धावत्या लोकलमधून 18 वर्षीय तरुणीला ढकललं; नवी मुंबई येथील घटना

    नवी मुंबईतील पनवेल–खांदेश्वरदरम्यान धावत्या लोकलमध्ये 50 वर्षीय व्यक्तीने महिलांच्या डब्यात घुसून 18 वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थिनीला खाली ढकलले. तरुणी गंभीर जखमी असून आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

  • 21 Dec 2025 12:30 PM (IST)

    21 Dec 2025 12:30 PM (IST)

    सुरतहून यात्रेसाठी गावी आलेल्या 22 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं

    धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात तापी पुलावरून उडी घेत 22 वर्षीय उमेश पाटीलने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी इन्स्टाग्रामवर ‘गुड बाय’ स्टेटस व सेल्फी पोस्ट केल्याचे समोर आले. कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस तपास सुरू

  • 21 Dec 2025 12:20 PM (IST)

    21 Dec 2025 12:20 PM (IST)

    जामखेडनंतर सासवडमध्येही एकाचा खून; पुणे ग्रामीण पोलिसांकडून दुहेरी खूनाचा उलगडा

    दोन खून करून वेगवेगळ्या शहरांत लपलेल्या आरोपीचा रक्तरंजित प्रवास अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी थांबवला आहे. पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

  • 21 Dec 2025 11:55 AM (IST)

    21 Dec 2025 11:55 AM (IST)

    WhatsApp Scam : OTP शिवाय कसा मिळतो हॅकर्सना अ‍ॅक्सेस?

    सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp वर एक स्कॅम सुरु झाला आहे. यूजर्सची फसवणूक करण्यासाठी आणि यूजर्सच्या अकाऊंटचा अ‍ॅक्सेस मिळवण्यासाठी हॅकर्सनी प्रयत्न सुरु केले आहेत. सायबर अटॅकद्वारे सुरु असलेल्या या स्कॅमला ‘भयानक’ स्कॅम म्हटलं जात आहे. यामध्ये हॅकर्स कोणत्याही ओटीपी आणि ऑथेंटिकेशनशिवाय यूजर्सच्या अकाऊंटचा अ‍ॅक्सेस मिळवत आहेत. यामध्ये स्कॅमर्स यूजर्सच्या पर्सनल डेटाची चोरी करत आहेत आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जात आहे.

  • 21 Dec 2025 11:45 AM (IST)

    21 Dec 2025 11:45 AM (IST)

    अमेरिकेने लष्करी कारवाई करत दहशतवादी अड्डे केले उद्ध्वस्त

    अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १३ डिसेंबर २०२५ रोजी सीरियातील अमेरिकन तळावर झालेल्या हल्ल्याच्या बदल्यात ही कारवाई करण्यात आली आहे.  या हल्ल्यात दोन अमेरिकन सैनिक आणि एक अमेरिकन दुभाषीकाचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी याचा बदला घेतला जाईल हे स्पष्ट केले होते. विशेष म्हणजे ही कारवाई अशा वेळी करण्यात आली आहे जेव्हा अमेरिकेने नुकतेच सीरियावरील सर्व कठोर निर्बंध हटवले होते. सीरियाने या निर्णयाबद्दल अमेरिकेचे आभारही मानले होते.

  • 21 Dec 2025 11:35 AM (IST)

    21 Dec 2025 11:35 AM (IST)

    नवी मुंबईत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

    नवी मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १० वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, मानसिक छळ आणि धमकी दिल्याचे समोर आले आहे. हा छळ एका वर्षांपासून सुरु होते. याप्रकरणी POCSO कायदा 2012 अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • 21 Dec 2025 11:25 AM (IST)

    21 Dec 2025 11:25 AM (IST)

    कट्टरपंथीयांचा काळ बनून परतणार तारिक रहमान

    बांगलादेशातील (Bangladesh)राजकारण सध्या एका अत्यंत स्फोटक वळणावर येऊन ठेपले आहे. शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर आता देशात १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सार्वत्रिक निवडणुका घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या घोषणेसोबतच बांगलादेशातील रस्त्यांवर पुन्हा एकदा हिंसाचाराचा वणवा पेटला आहे. १७ वर्षांच्या प्रदीर्घ वनवासानंतर ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ (BNP) चे कार्यवाहक अध्यक्ष तारिक रहमान (Tariq Rahman) २५ डिसेंबर रोजी मायदेशी परतणार आहेत. त्यांच्या या पुनरागमनाने जमात-ए-इस्लामी आणि कट्टरपंथी गटांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असून, राजकीय विश्लेषकांच्या मते याच भीतीपोटी बांगलादेशाला पुन्हा एकदा अस्थिरतेच्या खाईत लोटले जात आहे.

  • 21 Dec 2025 11:15 AM (IST)

    21 Dec 2025 11:15 AM (IST)

    २०५ औषधांचे नमुने अयशवस्वी! चुकूनही खाऊ नका ‘या’ गोळ्या

    वातावरणात बदल झाल्यानंतर संपूर्ण आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. सर्दी, खोकला, ताप इतर इत्यादी आजारांची शरीराला लागण होते. साथीच्या आजारांची लागण झाल्यानंतर सुरुवातीला अतिशय सौम्य लक्षणे दिसू लागतात. मात्र कालांतराने लक्षणांमध्ये वाढ होते. पण तरीसुद्धा दुर्लक्ष केले जाते. सर्दी, खोकला आणि ताप आल्यानंतर मेडिकलमधील पेनकिलरच्या गोळ्या खाल्ल्या जातात. या गोळ्या खाल्ल्यामुळे तात्पुरता आराम मिळतो आणि पुन्हा एकदा ताप येऊन आरोग्य बिघडते.

  • 21 Dec 2025 11:05 AM (IST)

    21 Dec 2025 11:05 AM (IST)

    गंभीर अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची तब्येत?

    प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही हिचे शनिवारी दुपारी मुंबईत एका भीषण कार अपघातात मृत्यू झाला. या अपघातात तिला किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर तिने तिच्या चाहत्यांना आरोग्याबाबत अपडेट दिले. नोराने इन्स्टाग्राम स्टोरीजवर अपघाताचे तपशीलवार अनेक व्हिडिओ शेअर केले आणि सांगितले की तिला अजूनही मानसिक धक्का बसला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अपघातानंतर काही तासांतच नोराने मुंबईतील डेव्हिड गुएटाच्या कॉन्सर्टमध्ये सादरीकरण केले. तिने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना तिच्या आरोग्याबद्दल अपडेट केले, हा अनुभव “माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक आणि वेदनादायक क्षण” असल्याचे वर्णन केले आणि मद्यधुंद चालकांविरुद्ध तिचा संताप व्यक्त केला.

  • 21 Dec 2025 10:51 AM (IST)

    21 Dec 2025 10:51 AM (IST)

    राज्यात एक नंबर भाजपच! कॉंग्रेसच्या वडेट्टीवारांची कबुली

    राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाची उत्सुकता निर्माण झाली आहे. आज (दि.21) नगर पंचायत आणि नगर परिषदांचे निकाल हाती येणार आहे. 288 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी पार पडत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार ही मतमोजणी प्रक्रिया राज्यभर एकाच दिवशी राबवली जात आहे. 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. यानंतर आता निकाल हाती येत असून सर्वच राजकीय पक्षांना विजयाची प्रतिक्षा आहे. दरम्यान, कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कॉंग्रेसच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

  • 21 Dec 2025 10:45 AM (IST)

    21 Dec 2025 10:45 AM (IST)

    चीनमध्ये रोबोट्सचा स्टेजवर जलवा!

    सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ह्युमनॉइड रोबोट्सने एका कॉन्सर्टमध्ये शानदार नृत्य केले आहे. हा व्हिडिओ पाहून अमेरिकेचे उद्योजक एलॉनव मस्कही आश्चर्यचकित झाले आहे. चीन-अमेरिकन गायक-गीतकार वांग लीहोम याच्या कॉनसर्टमध्ये हे रोबोट्स नाचताना दिस आहेत. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

  • 21 Dec 2025 10:40 AM (IST)

    21 Dec 2025 10:40 AM (IST)

    सरकारी कंपनी पुन्हा घेऊन आली बजेट फ्रेंडली प्लॅन!

    गेल्या काही दिवसांपासून असं सांगितलं जात आहे की प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्या त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ करणार आहेत. त्यामुळे या कंपन्यांच्या यूजर्सनी चिंता व्यक्त केली आहे. प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांच्या रिचार्ज वाढीची चर्चा सुरु असतानाच आता सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL त्यांच्या यूजर्ससाठी एक खास रिचार्ज प्लॅन घेऊन आली आहे. हा रिचार्ज प्लॅन नेहमीप्रमाणे छोटा पॅकेट बडा धमाका आहे. म्हणजेच यूजर्सना कमी पैशांत जास्त दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे.

  • 21 Dec 2025 10:31 AM (IST)

    21 Dec 2025 10:31 AM (IST)

    ऑस्ट्रेलियाने संपवली ‘बेजबॉल’ कहाणी

    ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी अ‍ॅशेस कसोटी अ‍ॅडलेडमध्ये संपली. ऑस्ट्रेलियाने ४३५ धावांचे लक्ष्य ठेवले होते आणि इंग्लंड सहज पराभूत होईल असे वाटत होते. तथापि, इंग्लिश संघाने धाडसी लढत दिली आणि सामना अटीतटीचा झाला. एकेकाळी असे वाटत होते की इंग्लंड या विशाल लक्ष्याचा पाठलाग करेल, परंतु विल जॅक्स बाद झाल्यानंतर परिस्थिती उलटली. ऑस्ट्रेलियाने अ‍ॅडलेड कसोटी ८२ धावांनी जिंकली आणि अ‍ॅशेस मालिका जिंकली.

  • 21 Dec 2025 10:26 AM (IST)

    21 Dec 2025 10:26 AM (IST)

    JALGAON News: भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे निवडणूक अधिकाऱ्याचे नियोजन शून्य; मतमोजणी केंद्रात प्रतिनिधींची गर्दी

    भुसावळ तालुक्यातील वरणगाव निवडणूक अधिकाऱ्याचे नियोजन शून्य, मतमोजणी केंद्रात शिरण्यासाठी प्रतिनिधींची केंद्रावर एकच गर्दी, त्यामुळे उडाला गोंधळ. मुक्ताईनगर मतमोजणी केंद्रावर टपाली मतदान उघडले. टपाली मतदान मोजणीला सुरुवात

  • 21 Dec 2025 10:22 AM (IST)

    21 Dec 2025 10:22 AM (IST)

    घरात एकटी असताना 18 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या

    छत्रपती संभाजीनगर येथील गंगापूर तालुक्यातून एक धक्कदायक घटना समोर आली होती. एका १८ वर्षीय तरुणीची अज्ञाताने घरात गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले होते. ही धक्कदायक घटना शुक्रवारी मुरमी येथे घडली. मृत तरुणीचे नाव वैष्णवी संतोष नीळ असे आहे. या घटनेचा एकही साक्षिदार किंवा ठोस पुरावा नव्हता म्हणून आरोपीला शोधण्याचं मोठं आवाहन पोलिसांसमोर होत. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या चार तासात वाळूज पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपी कोण आहे, त्याने हत्या का केली? आरोपीला कशी अटक करण्यात आली? नेमकं प्रकरण काय?

  • 21 Dec 2025 10:14 AM (IST)

    21 Dec 2025 10:14 AM (IST)

    एक रशियन तब्बल ‘इतक्या’ डॉलर्सला

    अमेरिकेतील (America) कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनच्या संबंधित प्रकरणाने संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ माजवली आहे. नुकतेच या प्रकरणातून १६ फाइल्स गायब झाल्या असल्याचा दावा केला जात असून याचा संबंध डोनाल्ड ट्रम्पशी (Donald Trump) जोडला जात आहे. यामुळे अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आतापर्यंत अनेक दिग्गज, प्रभाशाली उद्योजक, व्यक्तीमत्त्व, गायक, पॉप सिंगर्स, राजकीय अधिकाऱ्यांशी याचा संबंध असल्याचे समोर आले आहे. यामध्ये काही दिग्गजांचे जेफ्री एपस्टीनसोबत आणि अल्पवयीन सोबत काही फोटो देखील समोर आले आहेत. याच वेळी आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ते म्हणजे अल्पवयीन मुली आणि महिलांचा व्यवहार कसा केला जायचा. यामुळे या प्रकरणाने आणखी गंभीर वळण घेतले आहे.

  • 21 Dec 2025 10:08 AM (IST)

    21 Dec 2025 10:08 AM (IST)

    BHANDARA: भंडारा जिल्ह्यातील 4 नगर परिषदेच्या 34 नगराध्यक्ष आणि 588 नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला

    नगर परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर आज भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर साकोली आणि पवनी या चार नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. सकाळी 10 वाजतापासून मतमोजणी सुरू होऊन 1 वाजेपर्यंत निकालाचा अंदाज स्पष्ट होण्याची शक्यता आहे. यात 4 नगराध्यक्ष पदासाठी 34 उमेदवार नगराध्यक्षपदाची निवडणूक लढलेल्या 34 उमेदवारांच्या, आणि 100 नगरसेवकपदासाठी लढलेल्या 588 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. भंडाऱ्यात 14 टेबलवर ही मतमोजणी होणार आहे त्याच्या 9 फेऱ्या होतील. या निवडणुकीत काँग्रेस नेते नाना पटोले, भाजप नेते परिणय फुके, राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल आणि शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.

  • 21 Dec 2025 10:07 AM (IST)

    21 Dec 2025 10:07 AM (IST)

    Bharti Singh ची दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर समोर आली पहिली प्रतिक्रिया

    विनोदी अभिनेत्री भारती सिंग सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहे. तिने १९ डिसेंबर रोजी सकाळी तिचा मुलगा काजू याला जन्म दिला आणि ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली. तिच्या नवीनतम व्लॉगमध्ये तिने प्रसूतीपूर्वी आणि नंतरचे अपडेट्स देखील आता शेअर केले आहेत. तिने वर्णन केले की तिची पाण्याची पिशवी कशी फुटली, ज्यामुळे तिच्या कपड्यांपासून ते तिच्या बेडिंगपर्यंत सर्व काही ओले झाले. तिने डॉक्टरांशी संवाद साधला आणि तिला ताबडतोब रुग्णालयात येण्यास सांगण्यात आले. तिने असेही उघड केले की तिचे नसबंदीकरण झाले नाही.

  • 21 Dec 2025 10:05 AM (IST)

    21 Dec 2025 10:05 AM (IST)

    Karad News: कराड नगरपालिका निवडणुकीच्या आजच्या मतमोजणीकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष

    निवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि यशवंत विकास आघाडी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नगराध्यक्षपदासाठी 9 उमेदवार रिंगणात होते.
    नगरसेवकपदासाठी 31 जागांसाठी 109 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतल्यामुळे या निवडणुकीला विशेष चुरस निर्माण झाली आहे. भाजपाचे उमेदवार विनायक पावसकर आणि राजेंद्रसिंह यादव यांच्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी चुरस आहे.

  • 21 Dec 2025 10:02 AM (IST)

    21 Dec 2025 10:02 AM (IST)

    "मुंबईच्या विकासासाठी ही निवडणूक जिंकणे महत्त्वाचे आहे," - रामदास आठवले

    मुंबई महानगरपालिका निवडणुकीबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, "रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीचा (महायुती) भाग आहे आणि २०१२ पासून भाजप आणि शिवसेनेशी युती करत आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांना बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. रिपब्लिकन पक्ष महायुतीच्या (महायुती) माध्यमातूनच निवडणुका लढवू इच्छितो.... मुंबईच्या विकासासाठी ही निवडणूक जिंकणे महत्त्वाचे आहे..."

  • 21 Dec 2025 09:59 AM (IST)

    21 Dec 2025 09:59 AM (IST)

    Maharashtra Civic Poll Results Live Updates: दोंडाईचा, अंगार आणि जमेर येथे बिनविरोध निवडणूक

    Maharashtra Civic Poll Results Live Updates: दोंडाईचा नगरपरिषद आणि अंगार नगरपंचायतीच्या सदस्य आणि अध्यक्षांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. जमेर नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूकही बिनविरोध झाली. काही भागात, भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह सत्ताधारी आघाडीचे मित्रपक्ष एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत.

  • 21 Dec 2025 09:55 AM (IST)

    21 Dec 2025 09:55 AM (IST)

    हे आहेत वर्षभरात लाँच झालेले 5 सर्वात स्मार्ट AI फोन

    2025 स्मार्टफोन इंडस्ट्रीसाठी अतिशय खास ठरले होते. यावर्षात अनेक नवीन स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले होते. यातील अनेक स्मार्टफोन्स AI आधारित होते. हे केवळ स्मार्टफोन्स नाही तर एक स्मार्ट पर्सनल असिस्टेंट देखील होते. जनरेटिव एडिटिंग, ऑन-डिवाइस इंटेलिजेंस, रियल-टाइम ट्रांसक्रिप्शन, फोटो आपोआप परफेक्ट बनवणारे टूल्स, अशा अनेक फीचर्सने सुसज्ज असलेले स्मार्टफोन्स या वर्षात लाँच करण्यात आले होते. 

  • 21 Dec 2025 09:50 AM (IST)

    21 Dec 2025 09:50 AM (IST)

    धावत्या लोकलमधून 18 वर्षीय तरुणीला ढकललं

    नवी मुंबई: नवी मुंबईमधून एक धक्कदायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास एका १८ वर्षीय तरुणीला धावत्या लोकलमधून खाली ढकलून दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. लोकलमधील महिला डब्यात एक ५० वर्षीय पुरुष घुसला होता. महिलांनी त्याला जाब विचारला असता तो संतापला आणि त्याने एका १८ वर्षीय तरुणीला धावत्या लोकलमधून खाली ढकलून दिले. यात तरुणी गंभीर जखमी झाली. तरुणी ही अभियांत्रिकीची विद्यार्थिनी आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना पनवेल ते खांदेश्वर स्थानकादरम्यान घडली.

  • 21 Dec 2025 09:45 AM (IST)

    21 Dec 2025 09:45 AM (IST)

    गिलला डच्चू दिल्यानंतर निवडकर्त्या आगरकरांचे विधान चर्चेत

    Ajit Agarkar commented on Shubman Gill : २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने २० डिसेंबर रोजी २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या निवडीमधील आश्चर्यजनक बाब म्हणजे भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार आणि टी-20 उप-कर्णधार शुभमन गिलला संघातून डच्चू दिला आहे. उपकर्णधारपद आता अक्षर पटेलकडे असणार आहे. गिलल वगळल्यानंतर अजित निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • 21 Dec 2025 09:40 AM (IST)

    21 Dec 2025 09:40 AM (IST)

    जेफ्री एपस्टाईनशी संबंधित किमान 16 फायली गहाळ!

    Jeffrey Epstein DOJ files missing December 2025 : जगातील सर्वात वादग्रस्त सेक्स रॅकेट प्रकरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेफ्री एपस्टाईन(Jeffrey Epstein) प्रकरणाने आता एक नवीन आणि धक्कादायक वळण घेतले आहे. अमेरिकेच्या (America) न्याय विभागाने (Department of Justice) अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या काही फाईल्स अचानक ‘डिलिट’ केल्याने अमेरिकेत मोठा गोंधळ उडाला आहे. यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एपस्टाईनसोबतचा फोटोही गायब झाल्याने, ‘महत्त्वाचे सत्य लपवण्याचा प्रयत्न सुरू आहे का?’ असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

  • 21 Dec 2025 09:35 AM (IST)

    21 Dec 2025 09:35 AM (IST)

    ‘Laughter chefs 3’ मध्ये अर्जुन बिजलानीचे पुनरागमन!

    अभिनेता अर्जुन बिजलानीला पुन्हा एकदा लाफ्टर शेफ्समध्ये परतला आहे. अभिनेता आधी ज्या शो मध्ये शेफ होता त्या शोचे होस्टिंग करताना आता तो दिसणार आहे. त्याने लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंगची रिप्लेसमेंट केली आहे. आता पहिल्या सीझनपासून चाहत्यांचा आवडता अभिनेता पुन्हा एकदा “लाफ्टर शेफ्स सीझन ३” हा कॉमेडी कुकिंग शो होस्ट करत आहे. तो शेफ हरपाल सिंग सोबत होस्ट करताना आणि स्पर्धकांचे जेवण टेस्ट करताना दिसणार आहे. चाहत्यांचा आनंद आणखी वाढला आहे. तसेच चाहते त्याला पुन्हा त्याच्या लाडक्या अभिनेत्याला पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

  • 21 Dec 2025 09:30 AM (IST)

    21 Dec 2025 09:30 AM (IST)

    आग्रा बास्केटबॉल असोसिएशनने घडवले भारतीय संघाचे शिलेदार

    World Basketball Day December 21 2025 celebration : आज, २१ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण जगात ‘जागतिक बास्केटबॉल दिन’ (World Basketball Day) साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या एका दशकात भारतातील या खेळाची दिशा पूर्णपणे बदलली आहे. एकेकाळी आशियाई स्पर्धांसाठी पात्र ठरताना संघर्ष करणाऱ्या भारतीय बास्केटबॉलमध्ये आता आग्र्यासारख्या शहरांनी क्रांती घडवून आणली आहे. आग्रा जिल्हा आज केवळ उत्तर प्रदेशचाच नव्हे, तर देशाचा बास्केटबॉलमधील महत्त्वाचा आधारस्तंभ बनला आहे.

  • 21 Dec 2025 09:25 AM (IST)

    21 Dec 2025 09:25 AM (IST)

    इशान किशनचे दोन वर्षानंतर संघामध्ये पुनरागमन

    Ishan Kishan’s mother’s reaction : २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. इशान किशन दोन वर्षांहून अधिक काळ भारतीय संघाबाहेर होता. त्याला मागील अनेक महिन्यांपासून भारतीय संघामध्ये दुर्लक्ष करण्यात आले होते. त्याचबरोबर त्याला भारतीय संघाच्या काॅट्रक्टमधून देखील काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे तो बऱ्याचदा देशांतर्गत सामने खेळत होता. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्तक अली ट्राॅफी त्याने कर्णधार म्हणून नावावर केली आहे.

  • 21 Dec 2025 09:20 AM (IST)

    21 Dec 2025 09:20 AM (IST)

    स्टेटस ठेवून तापी नदीत तरुणाने आयुष्य संपवलं

    धुळे: धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाडी खुर्द येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय तरुणाने तापी पुलावरून उडी घेऊन आपले जीवन संपवले. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव उमेश राजेंद्र पाटील असे आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवून नदी पात्रात उडी घेतली.

  • 21 Dec 2025 09:15 AM (IST)

    21 Dec 2025 09:15 AM (IST)

    सोन्या – चांदीच्या दरात चढऊतार सुरुच!

    Gold Rate Today: भारतात 21 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,418 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,300 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,064 रुपये आहे. भारतात 21 डिसेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,23,000 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,34,180 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,00,640 रुपये आहे. भारतात 21 डिसेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 214 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,14,000 रुपये आहे.

  • 21 Dec 2025 09:11 AM (IST)

    21 Dec 2025 09:11 AM (IST)

    वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे पाकिस्तानचे धागेदोरे उलगडण्यास सज्ज

    Probable playing 11 under 19 team India for India vs Pakistan match : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंडर-१९ आशिया कप २०२५ चा अंतिम सामना २१ डिसेंबर रोजी होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी खूप चांगली राहिली आहे आणि त्यांनी आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. आता, अंतिम सामन्यातही टीम इंडियाच्या युवा खेळाडूंकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. अंतिम सामन्यासारख्या मोठ्या सामन्यासाठी सर्वांचे लक्ष भारताच्या प्लेइंग ११ वर आहे. अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. दोघेही पाकिस्तानचे धागेदोरे उलगडून दाखवू इच्छितात आणि धावांचा वर्षाव करू इच्छितात.

Maharashtra Breaking News : Politics, Crime, Weather: 20 डिसेंबर रोजी राज्यात नगरपरिषदांसह नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले. या मतदानाचा निकाल आज 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला देखील सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आजच्या निकालाकडे लागले आहे. तसेच आज क्रिडा क्षेत्रातील एक महत्त्वाची अपडेट म्हणजे २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. इशान किशन दोन वर्षांहून अधिक काळ भारतीय संघाबाहेर होता. मात्र आता नुकत्याच संपलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये इशानने शानदार कामगिरी केली आणि त्याचे फळ त्याला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाल्याने मिळाले.

Web Title: Marathi breaking news today live updates politics updates weather updates election updates marathi live blog todays top news and breaking updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 09:06 AM

Topics:  

  • maharashtra breaking news
  • Maharashtra Breaking News update

संबंधित बातम्या

Top Marathi News Today Live : नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवरुन उच्च न्यायालयाचा महायुती सरकारला दणका
1

Top Marathi News Today Live : नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवरुन उच्च न्यायालयाचा महायुती सरकारला दणका

Maharashtra Breaking News Today: मोठी बातमी! मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी
2

Maharashtra Breaking News Today: मोठी बातमी! मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी

Maharashtra Breaking Updates: IPL 2026 च्या लिलावात KKR ची मोठी खेळी! ‘या’ खेळाडूसाठी मोजले 18 कोटी रुपये
3

Maharashtra Breaking Updates: IPL 2026 च्या लिलावात KKR ची मोठी खेळी! ‘या’ खेळाडूसाठी मोजले 18 कोटी रुपये

Top Marathi News Today: अखेर २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं, 15 जानेवारीला मतदान, 16 तारखेला निकाल
4

Top Marathi News Today: अखेर २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं, 15 जानेवारीला मतदान, 16 तारखेला निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.