Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News LIVE : महाराष्ट्रासह देश-विदेशातील ब्रेकिंग बातम्यांच्या अपडे्स एका क्लिकवर

#MaharashtraLive, #Navarashtralive #LiveBlogMarathi #BreakingNews #आजच्या_बातम्या, आजच्या ताज्या बातम्या LIVE: महाराष्ट्र आणि देश-विदेशातील प्रत्येक मोठी घडामोडीच्या ब्रेकिंग अपडे्स

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 23, 2025 | 12:01 PM
LIVE
#LiveBlogMarathi #BreakingNews #आजच्या_बातम्या

#LiveBlogMarathi #BreakingNews #आजच्या_बातम्या

Follow Us
Close
Follow Us:
  • 23 Dec 2025 12:40 PM (IST)

    23 Dec 2025 12:40 PM (IST)

    अल्पवयीन मुलीवर पुजाऱ्याने केला अत्याचार

    एका मंदिरातील पुजाऱ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पुजाऱ्याला अटक केली आहे.

  • 23 Dec 2025 12:30 PM (IST)

    23 Dec 2025 12:30 PM (IST)

    घरात घुसून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

    पीडिता अलीकडील काळात शाळेत गप्प राहू लागली होती. ही बाब शाळेतील एका महिला कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर तिने पीडितेच्या आईला माहिती दिली. त्यानंतर आईने शाळेत येऊन मुलीशी विश्वासाने संवाद साधला.

  • 23 Dec 2025 12:20 PM (IST)

    23 Dec 2025 12:20 PM (IST)

    आईच्या प्रियकराने तीन वर्षांच्या चिमुकल्याचा गळा दाबून केली निर्घृण हत्या

    सोलापुरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. आईच्या प्रियकराने रागाच्या भरात तीन वर्षांच्या चिमुकल्याचा गळा दाबून निर्घृण हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.

  • 23 Dec 2025 12:10 PM (IST)

    23 Dec 2025 12:10 PM (IST)

    चंद्रपूर किडनी प्रकरणातील मोठी अपडेट; आरोपीला सोलापुरातून केली अटक

    नागभीड तहसीलमधील मिंथूर गावातील रहिवासी रोशन कुडे यांना कर्ज फेडण्यासाठी बेकायदेशीर सावकारांनी त्यांची किडनी विकण्यास भाग पाडले होते. त्यानंतर ते परदेशात कंबोडियाला गेले.

  • 23 Dec 2025 12:01 PM (IST)

    23 Dec 2025 12:01 PM (IST)

    माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे यांचे अपहरण, जीवघेणी मारहाण

    नांदेडमध्ये माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे पाटील यांचे अपहरण करून जबर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात सात जणांना अटक झाली असून आमदार प्रताप पाटील चिखलीकरांवर घोगरेंनी गंभीर आरोप केले आहेत.

  • 23 Dec 2025 12:00 PM (IST)

    23 Dec 2025 12:00 PM (IST)

    एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांमध्ये दोन तास दीर्घ चर्चा

    अनेक दिवसानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली आहे. वाद-विवाद आणि टीकानंतर अखेर दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली.

  • 23 Dec 2025 11:50 AM (IST)

    23 Dec 2025 11:50 AM (IST)

    हमें बोलना चाहिये था…..! शायरीमधून संजय राऊतांचा सूचक संदेश

    राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये नगर पंचायत आणि नगर परिषदांमध्ये ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे. यानंतर खासदार संजय राऊत यांनी  सोशल मीडियावर पोस्ट करत सूचक वक्तव्य केले आह. यामध्ये एक शायरी त्यांनी शेअर केली. यामध्ये लिहिले आहे की, एक दिन हम सब अपनी - अपनी चुप्पियों को लेकर मर जाएंगे और हमारा सबसे आख़िरी ख़याल होगा हमें बोलना चाहिए था। असे सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

    हमें बोलना चाहिये था…..! pic.twitter.com/f3W632VJCm

    — Sanjay Raut (@rautsanjay61) December 23, 2025

  • 23 Dec 2025 11:40 AM (IST)

    23 Dec 2025 11:40 AM (IST)

    खासदार राऊत यांचा थेट राहुल गांधींना फोन

    खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्याशी संपर्क केल्याची माहिती पण समोर येत आहे. आगामी महापालिका निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढावी यासाठी त्यांची आग्रही भूमिका त्यांनी मांडली. काँग्रेसने मुंबई महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. पण शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी महाविकास आघाडी एकजुटीसाठी प्रयत्न करत आहेत

  • 23 Dec 2025 11:20 AM (IST)

    23 Dec 2025 11:20 AM (IST)

    पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची युती, पण शहराध्यक्षांनी सोडला पक्ष

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, पुण्यात शरद पवार गट आणि अजित पवार गटाची युती होत आहे. मात्र यावरुन नाराज असलेल्या शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशांत जगताप हे शरद पवार यांचे निष्ठावंत नेते मानले जातात.

  • 23 Dec 2025 11:10 AM (IST)

    23 Dec 2025 11:10 AM (IST)

    महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल प्रक्रिया आजपासून सुरु

    राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची मागील आठवड्यात घोषणा झाली. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरूवात होणार आहे. आजपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असून 30 डिसेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

  • 23 Dec 2025 11:02 AM (IST)

    23 Dec 2025 11:02 AM (IST)

    भारताचे ९वे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांची पुण्यतिथी

    पी.व्ही. नरसिंह राव यांनी भारताचे ९वे पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला.  त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला चालना दिली. पी व्ही नरसिंह राव यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचे उदारीकरण करून महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणा घडवून आणल्या. त्यांची ओळख एक बहुभाषिक नेते, लेखक, आणि कायद्याचे जाणकार म्हणून होती. आजच्या दिवशी 2004 साली पी व्ही नरसिंह राव यांची प्राणज्योत मालावली. त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी अल्पमतात असतानाही ५ वर्षांचे सरकार यशस्वीपणे चालवले आणि देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

  • 23 Dec 2025 10:59 AM (IST)

    23 Dec 2025 10:59 AM (IST)

    जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार

    राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. अनेक ठिकाणी अजूनही विजयाचा जल्लोष सुरू आहे. यानंतर राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून मुंबई–पुण्यासह 29 महापालिकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पण त्याचवेळी राज्यातील, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकां कधी होणार, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

  • 23 Dec 2025 10:49 AM (IST)

    23 Dec 2025 10:49 AM (IST)

    अ‍ॅसिड हल्ल्यानंतर बदलले माधुरी दीक्षितचे आयुष्य

    माधुरी दीक्षित सध्या तिच्या नवीनतम वेब सिरीज “मिसेस देशपांडे” मुळे चर्चेत आहे. अलिकडेच, बॉलीवूडची धक धक गर्ल, तिच्या आईकडून मिळालेल्या भावनिक स्थिरता, आत्मविश्वास आणि चिकाटीबद्दल आणि तिच्या आईच्या सल्ल्याने तिला चित्रपट उद्योगात सुरुवातीच्या टीकेवर मात करण्यास कशी मदत केली याबद्दल उघडपणे बोलताना दिसली आहे. अलिकडेच एका मुलाखतीत, अभिनेत्रीने सतत मार्गदर्शनाखाली वाढण्याचा तिचा अनुभव शेअर केला, ज्यामुळे तिच्या कलात्मकतेलाच नव्हे तर तिच्या आत्मसन्मानालाही आकार मिळाला.

  • 23 Dec 2025 10:41 AM (IST)

    23 Dec 2025 10:41 AM (IST)

    पराभवानंतर ब्रेंडन मॅक्युलम राजीनामा देणार का?

    अ‍ॅशेस मालिकेतील पराभवानंतर, तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर जेव्हा ब्रेंडन मॅक्युलमला विचारले गेले की ते मुख्य प्रशिक्षकपद सोडतील का, तेव्हा ते म्हणाले, “मला माहित नाही. हा खरोखर माझा निर्णय नाही, आहे का? मी फक्त काम करत राहणार आहे, जे धडे मी अद्याप नीट शिकलो नाही ते शिकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यात बदल करणार आहे. हे प्रश्न माझ्यासाठी नाही तर दुसऱ्या कोणासाठी तरी आहेत. हे एक उत्तम काम आहे. ते खूप मजेदार आहे. तुम्हाला मुलांसोबत जगभर प्रवास करण्याची आणि काही रोमांचक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करण्याची आणि काही गोष्टी साध्य करण्याची संधी मिळते.”

  • 23 Dec 2025 10:33 AM (IST)

    23 Dec 2025 10:33 AM (IST)

    बांगलादेशात राजकीय अस्थिरतेदरम्यान युनूस यांची मोठी घोषणा

    बांगलादेशात ( Bangladesh ) गेल्या दोन आठवड्यांपासून अस्थिरतेचे वातावरण आहे. बांगलदेशचा विद्यार्थी नेता उस्मान हादी याची हत्या झाली आहे. त्याच्या हत्येनंतर प्रचंड तणाव निर्माण झाला असून हादीच्या इंकलाब गटाने याला तीव्र विरोध केला आहे. देशाचा हिंसाचाराचे वातावरण वाढत असून येत्या सार्वत्रिक निवडणुकांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. याच वेळी बांगलादेशचे अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांनी यावर मोठी घोषणा केली आहे.

  • 23 Dec 2025 10:26 AM (IST)

    23 Dec 2025 10:26 AM (IST)

    पैठणमध्ये अर्धवट कुजलेला मृतदेह आढळला

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पाटेगाव शिवारातील गोदावरी नदीच्या काठावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. नदी काठी नागरिक गेले असता त्यांना दुर्गंधी सुटल्याचे जाणवले, त्यानंतर हा प्रक्रर उघड झाला. मंगळवारी ही घटना समोर आली असून या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा मृतदेह कोणाचा हे शोधन आता पोलिसांसमोर मोठे आवाहन असणार आहे.

  • 23 Dec 2025 10:19 AM (IST)

    23 Dec 2025 10:19 AM (IST)

    लाडकी बहीण योजनेतून आणखी ४० लाख महिला अपात्र

    लाडक्या बहिणींना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी शासनाकडून मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. यामुळे अद्याप ई-केवायसी न केलेल्या लाभार्थी महिलांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आतापर्यंत राज्यभरात सुमारे 1 कोटी 60 लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित पात्र महिलांनी वेळेत ई-केवायसी करून योजनेचा लाभ कायम ठेवावा, असे आवाहन महिला व बालविकास विभागाकडून करण्यात आले आहे.

  • 23 Dec 2025 10:11 AM (IST)

    23 Dec 2025 10:11 AM (IST)

    कधी आणि कुठे पाहता येणार टीम इंडियाचा दुसरा T20 सामना?

    भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्याचा टॉस संध्याकाळी ६:३० वाजता होईल, तर सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. भारत आणि श्रीलंकेच्या महिला संघांमधील मालिकेतील दुसरा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर थेट पाहता येईल. चाहते हिंदी आणि इंग्रजीमध्ये सामना पाहू शकतील. तो JioHotstar वर देखील स्ट्रीम करता येईल.

  • 23 Dec 2025 10:02 AM (IST)

    23 Dec 2025 10:02 AM (IST)

    ‘कांतारा चॅप्टर १’ ला तगडी टक्कर

    एका सत्य घटनेवर आधारित, “धुरंधर” हा चित्रपट ५ डिसेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवशी २८ कोटी रुपये या चित्रपटाने कमावले आहे. त्यानंतरही त्याची कमाई कमी झाली नाही. १७ दिवसांत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्वात मोठ्या चित्रपटांनाही मागे टाकले. पहिल्या आठवड्यात त्याने २०७.२५ कोटी रुपये कमावले आणि दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने २५३.२५ कोटी रुपये कमावले. आता, तिसऱ्या आठवड्यात, त्याच्या कमाईच्या चार्टमध्ये थोडी चढ-उतार पाहायला मिळत आहे. १८ व्या दिवशी सर्वात कमी कमाई झाली, परंतु आता धुरंधरने “कांतारा २” ला मागे टाकले आहे.

  • 23 Dec 2025 09:53 AM (IST)

    23 Dec 2025 09:53 AM (IST)

    सोने-चांदी नव्या उच्चांकावर

    डॉलर कमकुवत झाल्यामुळे आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपात होण्याची अपेक्षा असल्याने सोमवारी वायदा व्यवहारात सोने आणि चांदीच्या किमती सर्वकालीन उच्वांकावर पोहोचल्या, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर फेब्रुवारी २०२६ च्या कराराची किंमत १.६२८ रुपये किंवा १.२१ टक्क्यांनी वाढून १.३५.८२४ रुपये प्रति १० ग्रॅम झाली. गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमती ५७४ रुपये किंवा ०.४३ टक्क्यांनी वाढल्या होत्या. एमसीएक्सवर चांदीच्या वायदा किंवा सराफा व्यवहारातही मोठी वाढ झाली. मार्च २०२६ च्या करारात ६,१४४ रुपये किंवा २.९५ टक्क्यांनी वाढ होऊन तो २,१४.५८३ रुपये प्रति किलोग्रॅमचा सर्वकालीन उच्चांक गाठला.

  • 23 Dec 2025 09:48 AM (IST)

    23 Dec 2025 09:48 AM (IST)

    पिंपरीत भाजपची ताकद आणखी वाढणार

    माजी नगरसेवक राहुल कलाटे आज आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याने पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रवेशामुळे भाजपची शहरातील ताकद आणखी वाढणार असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

  • 23 Dec 2025 09:40 AM (IST)

    23 Dec 2025 09:40 AM (IST)

    Vijay Hazare Trophy : सुर्या आणि दुबे खेळणार मुंबईसाठी, इशानकडे झारखंडचे नेतृत्व

    विजय हजारे ट्रॉफीची सुरुवात झाली आहे, भारताच्या संघामधील अनेक खेळाडू हे विजय हजारे ट्रॉफीचे सामने खेळताना दिसणार आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे  भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू शिवम दुबे विजय हजारे ट्रॉफी गटातील मुंबईच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये खेळतील. हे दोन्ही खेळाडू ६ जानेवारी रोजी हिमाचल प्रदेश आणि ८ जानेवारी रोजी जयपूर येथे होणाऱ्या पंजाबविरुद्धच्या सामन्यांसाठी उपलब्ध असतील.

  • 23 Dec 2025 09:35 AM (IST)

    23 Dec 2025 09:35 AM (IST)

    कंपनीकडून अनोखा निर्णय; कर्मचाऱ्यांना 1.5 कोटींचे फ्लॅट बक्षीस

    चीनमधील एका खासगी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अनोखा आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. कंपनीकडून तब्बल 18 कर्मचाऱ्यांना फ्लॅट देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या फ्लॅटची किंमत प्रत्येकी सुमारे 1.3 कोटी ते 1.50 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. तीन वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना हे फ्लॅट देण्यात येणार आहेत. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालानुसार, कंपनीचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ आपल्या संस्थेशी जोडून ठेवण्याचा आहे.

  • 23 Dec 2025 09:30 AM (IST)

    23 Dec 2025 09:30 AM (IST)

    Municipal Council Election: विजयी रॅलीदरम्यान भाजप नगरसेवकाचा महिलेला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

    भंडाराच्या तुमसर नगरपालिकेचा निवडणूक निकाल  घोषित झाल्यानंतर काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान भाजपचे विजयी नगरसेवक पंकज बालपांडे यांनी एका महिलेला मारहाण करीत शिवीगाळ केली. या प्रकरणी काल (22 डिसेंबर) बालपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, या घटनेचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. भाजपचे नगरसेवक पंकज बालपांडे यांची विजयी रॅली निघालेली असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या  विजयी उमेदवार वर्षा लांजेवार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अंडा फेकून मारल्यानं हा वाद वाढल्याचं आता समोर आलं आहे.

  • 23 Dec 2025 09:25 AM (IST)

    23 Dec 2025 09:25 AM (IST)

    Nagarparishad Election Congress: नगरपरिषद निवडणुकांत काँग्रेसच्या पराभवाच्या मालिकेला काहीसा ब्रेक

    राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीने सत्ता मिळवली असली, तरी राजकीय वर्तुळात भाजपच्या यशापेक्षा काँग्रेसच्या पराभवाचीच अधिक चर्चा होताना दिसत आहे. सातत्याने निवडणूक अपयशांचा सामना करणाऱ्या काँग्रेससाठी ही निवडणूक काही अंशी दिलासादायक ठरल्याचे चित्र आहे. 2014 नंतर सलग अनेक निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेस पक्षाने या नगरपरिषद निवडणुकीत राज्यभरात नगराध्यक्ष पदाच्या 43 जागा आणि नगरसेवक पदाच्या 1006 जागा जिंकल्या आहेत. या निकालामुळे काँग्रेसची पराभवाची मालिका काही अंशी खंडित झाल्याचे मानले जात आहे.

  • 23 Dec 2025 09:20 AM (IST)

    23 Dec 2025 09:20 AM (IST)

    Thackeray Brothers Alliance: 24 डिसेंबरला ठाकरे गट–मनसे युतीची अधिकृत घोषणा 

    आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून 24 डिसेंबर रोजी, बुधवारी ठाकरे गट–मनसे युतीची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करतील, असे सांगितले जात आहे.

  • 23 Dec 2025 09:15 AM (IST)

    23 Dec 2025 09:15 AM (IST)

    Under 19 Asia Cup : भारताला हरवणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंवर होणार कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी

    अंडर 19 आशिया कप फायनलचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पार पडला. या सामन्यामध्ये भारताच्या संघाची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली आणि टीम इंडियाचा फायनलच्या सामन्यामध्ये पराभव झाला. संपूर्ण स्पर्धेमध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली होती पण भारताचे फलंदाज फायनलच्या सामन्यामध्ये खराब कामगिरी केल्यामुळे आशिया कप 2025 ची ट्राॅफी पाकिस्तानच्या नावावर झाली आहे.

  • 23 Dec 2025 09:10 AM (IST)

    23 Dec 2025 09:10 AM (IST)

    नांदेडमध्ये माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे यांचे अपहरण, जीवघेणी मारहाण

     नांदेड मनपाचे माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे पाटील यांच्यावर अपहरण करून जीवघेणी मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. अपहरण होतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात चित्रीत झाले आहेत. अपहरणकर्त्यांनी आपला संतोष देशमुख करू अशी धमकीही दिल्याची माहिती जीवन घोगरे यांनी दिली. त्यांनी आपल्याला झालेल्या मारहाणीमागे अजितदादांच्या पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांच्या सहकार्यांचा हात असल्याचा आरोप जीवन घोगरे यांनी केला आहे. या अपहरण आणि मारहाणीत ते गंभीर जखमी झाले आहे. अपहरण होतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहे.

  • 23 Dec 2025 09:08 AM (IST)

    23 Dec 2025 09:08 AM (IST)

    Central Government: आगीने ग्रस्त रुग्णांना आता मिळणार तातडीने उपचार

    केंद्र सरकारकडून जनतेच्या फायद्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी आगीच्या घटनेत बाधित झालेल्या रुग्णांना आता उपचाराशिवाय रुग्णालयात ‘वेटिंग’वर ठेवले जाणार नाही. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, जर रुग्णालयात उपचार उपलब्ध नसतील तर रुग्णाची स्थिती स्थिर करावी आणि योग्य उपचार शक्य असलेल्या रुग्णालयात थेट हलवावे.

Maharashtra- National And International Breaking news : माजी नगरसेवक राहुल कलाटे आज आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याने पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रवेशामुळे भाजपची शहरातील ताकद आणखी वाढणार असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. राहुल कलाटे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत तुतारी चिन्हावर निवडणूक लढवली होती. कलाटे यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातुन तीन वेळा निवडणूक लढवत विजयी उमेदवाराला तगडे आव्हान दिले होते.

 

 

Web Title: Maharashtra india world news live updates marathi live news todays top stories live maharashtra live marathi news updates from maharashtra to global stage maharashtra national global politics live n

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 09:03 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today Live: कर्णधार आयुष म्हात्रेचा निर्णय फसला! पाकिस्तानने जिंकली फायनल आशिया कपवर कोरलं नाव
1

Top Marathi News Today Live: कर्णधार आयुष म्हात्रेचा निर्णय फसला! पाकिस्तानने जिंकली फायनल आशिया कपवर कोरलं नाव

Top Marathi News Today Live : नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवरुन उच्च न्यायालयाचा महायुती सरकारला दणका
2

Top Marathi News Today Live : नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवरुन उच्च न्यायालयाचा महायुती सरकारला दणका

Maharashtra Breaking News Today: मोठी बातमी! मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी
3

Maharashtra Breaking News Today: मोठी बातमी! मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.