
रोजच्या बातम्या एका क्लिकवर
19 Dec 2025 02:06 PM (IST)
दक्षिण भारतीय स्टार रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. दोघांच्या लग्नाच्या चर्चेतबद्दल असे समजले की कपलचा लग्न समारंभ फेब्रुवारी २०२६ मध्ये होणार आहे. आणि दुसरे वृत्त असे आले की, रश्मिकाने तिच्या गर्ल गँगसोबत श्रीलंकेत बॅचलरेट पार्टी आधीच साजरी केली आहे. या सगळ्यामध्ये, इंटरनेटवर काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये रश्मिका वधू आहे आणि विजय वरच्य पोशाखात दिसत आहे. महेश बाबूपासून ते त्यांची पत्नी नम्रता शिरोडकर आणि प्रभासपर्यंत सर्वजण लग्नात पाहुणे म्हणून उपस्थित होते. या फोटोंमागील सत्य काय आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत?
19 Dec 2025 12:52 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून आशिया खंडात भूगर्भीय हालचालींनी वेग घेतला आहे. गुरुवारी तैवानच्या (Taiwan) हुआलियन शहरात ५.१ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप (Earthquake) झाला, ज्याचा केंद्रबिंदू जमिनीपासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर होता. या धक्क्याने तैवानमध्ये भीतीचे वातावरण पसरले असतानाच, अफगाणिस्तान आणि भारताच्या ईशान्येकडील मणिपूर राज्यातही जमिनीला कंपने जाणवली आहेत. सुदैवाने, या नवीन धक्क्यांमुळे अद्याप कोणत्याही मोठ्या जीवितहानीचे वृत्त नाही.
19 Dec 2025 12:42 PM (IST)
Ishan Kishan Statement : भारताचा संघ सध्या दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. विश्वचषकाआधी भारताच्या संघासाठी ही मालिका फार महत्वाची आहे. तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे फायनलचा सामना काल पार पडला या सामन्यामध्ये झारखंडच्या संघाने बाजी मारली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी इशान किशनसाठी स्वप्नापेक्षा कमी नव्हती. त्याने १० सामन्यांमध्ये ५१७ धावा केल्या आणि सरासरी ५० पेक्षा जास्त होती. इतक्या चांगल्या कामगिरीनंतर, चाहत्यांना विश्वास आहे की तो फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळवेल.
19 Dec 2025 12:32 PM (IST)
भारतातील बहुतेक लोकं खरेदी करताना ऑनलाईन पेमेंटचा पर्याय निवडतात. यामुळे वेळ वाचतो, तसेच सुट्ट्या पैशांची कटकट देखील नसते. ऑनलाईन पेमेंट करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते पिन. तुम्ही पिन नंबर एंटर केल्याशिवाय पेमेंटची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. पण काहीवेळेस आपण आपला पिन नंबर विसरतो. घाईगडबडीत पेमेंट करताना किंवा इतर कारणांमुळे काहीवेळेस आपण चुकीचा पिन नंबर एंटर करतो किंवा काहीवेळेस तर आपण आपला पिन नंबरच विसरतो. अशाच सर्व समस्यांसाठी Amazon Pay एक सुरक्षित उपाय घेऊन आला आहे.
19 Dec 2025 12:22 PM (IST)
देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ही बातमी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) शी संबंधित आहे. ईपीएफ खात्यांमधून पैसे काढण्याची प्रक्रिया जलद, सोपी आणि अधिक तांत्रिकदृष्ट्या प्रगत करण्याच्या दिशेने सरकार एक मोठे पाऊल उचलत आहे. सरकारच्या योजनेअंतर्गत, कर्मचारी लवकरच एटीएम आणि यूपीआय द्वारे त्यांच्या ईपीएफ खात्यातील ७५% पर्यंत थेट काढू शकतील. यामुळे केवळ कागदपत्रांची कामेच संपणार नाहीत तर आपत्कालीन परिस्थितीत निधीची त्वरित उपलब्धता देखील होईल.
19 Dec 2025 12:12 PM (IST)
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने कमालीची कामगिरी केली आहे आणि मालिकेत आघाडी देखील घेतली आहे याचदरम्यान एक घटना घडली आणि ती फारच घातक होती. प्रत्येक क्रिकेट चाहत्याला २५ नोव्हेंबर २०१३ हा दिवस क्रिकेट इतिहासातील सर्वात काळ्या दिवसांपैकी एक म्हणून आठवतो. एका बाउन्सरने एका ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा जीव घेतला. बारा वर्षांनंतर, इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सलाही अशाच एका बाउन्सरचा सामना करावा लागला.
19 Dec 2025 12:02 PM (IST)
सतत भारताविरोधात विखारी वक्तव्य करणाऱ्या शरीफ उस्मान हादीचा गुरुवारी सिंगापूरमध्ये मृत्यू झाला. इंकलाब मंचचा संयोजक शरीफ उस्मान हादीच्या मृत्यूनंतर बांग्लादेशात संतापाची लाट उसळली आहे. गुरुवारी रात्री बांग्लादेशात विरोध प्रदर्शनाचा भडका उडाला. यामध्ये भारताविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
19 Dec 2025 11:55 AM (IST)
मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मीरा-भाईंदरमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. मीरा-भाईंदरमधील तलाव रोड परिसरातील एका इमारतीमध्ये बिबच्या शिरला असून त्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत 3 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्या बिबट्याा जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
19 Dec 2025 11:45 AM (IST)
भाजप नेते राम कदम यांनी घाटकोपरमधील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी केस न कापण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा पाणीप्रश्न सोडवण्याचा संकल्प पूर्ण झाल्याबद्दल दोन वर्षांनंतर आपले केस कापले आहेत.
#WATCH | Maharashtra | BJP leader Ram Kadam today cut his hair after four years on the completion of his resolution to resolve the water problem in Ghatkopar pic.twitter.com/Hd0YvCX6x7
— ANI (@ANI) December 18, 2025
19 Dec 2025 11:35 AM (IST)
सध्या आगामी महानगरपालिका निवडणुकाची रणधुमाळी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक भाजपमध्ये मोठी संघटनात्मक उलथापालथ झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांनी धक्कातंत्राचा अवलंब करत निवडणूक प्रमुखपदावरून आमदार ॲड. राहुल ढिकले यांना अवघ्या महिनाभरातच हटवले आहे. त्यांच्या जागी आता आमदार देवयानी फरांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे नाशिक भाजपमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
19 Dec 2025 11:25 AM (IST)
सदनिका घोटाळा प्रकरणी अटक वॉरंट निघाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद गेले आहे. त्यांच्याकडे असणारे क्रीडा खाते अजित पवारांकडेे देण्यात आले आहे. यानंतर आता मंत्रिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशनात म्हणजे नवीन वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये मंत्र्याची एन्ट्री होणार आहे.
19 Dec 2025 11:15 AM (IST)
नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड मुंबई उच्च न्यायालयाने थांबवली आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी लिहिले आहे की, न्यायालयाचा हा आदेश म्हणजे नाशिकमधील वृक्षतोडीबाबत न्याय मिळण्याचा दृष्टीने पडलेलं हे पहिलं पाऊल आहे. न्यायालयाच्या या आदेशाचं आम्ही स्वागत करतो. आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास असून एकाही झाडाची कत्तल होणार नाही, असा अंतिम आदेश न्यायालयाकडून येईल, ही अपेक्षा आहे! तसंच तपोवनातील एकही इंच जमिनीचा व्यवहार होणार नाही, याकडं लोकांचं आणि आमचं बारकाईने लक्ष आहे, असं काहीही आम्ही कदापि होऊ देणार नाही.
न्यायालयाचा हा आदेश म्हणजे नाशिकमधील वृक्षतोडीबाबत न्याय मिळण्याचा दृष्टीने पडलेलं हे पहिलं पाऊल आहे. न्यायालयाच्या या आदेशाचं आम्ही स्वागत करतो. आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास असून एकाही झाडाची कत्तल होणार नाही, असा अंतिम आदेश न्यायालयाकडून येईल, ही अपेक्षा आहे!
तसंच तपोवनातील… pic.twitter.com/aYFyCN3a4j— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 19, 2025
19 Dec 2025 10:54 AM (IST)
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांच्या सुरक्षेत अचानक मोठी वाढ करण्यात आली आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात मुस्लिम महिलेच्या चेहऱ्यावरून ‘हिजाब’ काढल्याच्या वादग्रस्त प्रकरणावरून त्यांना सोशल मीडियाद्वारे धमक्या मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर बिहार पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना ‘हाय अलर्ट’वर ठेवण्यात आले आहे.
19 Dec 2025 10:52 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून आशिया खंडात भूगर्भीय हालचालींनी वेग घेतला आहे. गुरुवारी तैवानच्या हुआलियन शहरात ५.१ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला, ज्याचा केंद्रबिंदू जमिनीपासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर होता. या धक्क्याने तैवानमध्ये भीतीचे वातावरण पसरले असतानाच, अफगाणिस्तान आणि भारताच्या ईशान्येकडील मणिपूर राज्यातही जमिनीला कंपने जाणवली आहेत. सुदैवाने, या नवीन धक्क्यांमुळे अद्याप कोणत्याही मोठ्या जीवितहानीचे वृत्त नाही.
19 Dec 2025 10:50 AM (IST)
बांगलादेशी नागरिकांनी बनावट नावे, पत्ते व कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात चार बांगलादेशी नागरिकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
19 Dec 2025 10:48 AM (IST)
बांगलादेशातील विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येनंतर संपूर्ण देश हिंसाचाराच्या आगीत होरपळत आहे. मात्र, या हिंसाचाराने आता एक अत्यंत क्रूर रूप धारण केले आहे. ढाका येथील देशातील सर्वात मोठ्या वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर मध्यरात्री जमावाने हल्ला केला. केवळ तोडफोड करून हे हल्लेखोर थांबले नाहीत, तर त्यांनी इमारतीला आग लावून आत असलेल्या पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल(Viral)) होत असून संपूर्ण जगातून यावर टीका होत आहे.
19 Dec 2025 10:47 AM (IST)
आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न केले आहेत. "जामखेडमधील हॉटेल कावेरीचे मालक रोहित अनिल पवार यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी ज्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला ते हे आहेत जामखेडमधील उल्हास विलास माने… याआधीही त्यांच्यावर डबल मर्डरचे गुन्हे दाखल आहेत. आता त्यांच्या पाठीशी कोण आहे, हे तुम्हीच या फोटोंमध्ये बघा.. गल्लीतलं भांडण विधिमंडळात नेणारेही हेच आहेत, ज्यांना केवळ माझे विरोधक आहेत म्हणून भाजपाने विविध पदे दिली.… आता एवढी मोठी राजकीय ताकद पाठीशी असेल तर जामखेडमधील या गुंडांमध्ये भरदिवसा गोळ्या झाडून सामान्य माणसांचे मुडदे पाडण्याची हिंमत का येणार नाही? आणि जामखेडमध्ये गुंडगिरीला कोण पोसतंय? याचं उत्तर मुख्यमंत्री महोदयांनी द्यावं!"
जामखेडमधील हॉटेल कावेरीचे मालक रोहित अनिल पवार यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी ज्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला ते हे आहेत जामखेडमधील उल्हास विलास माने… याआधीही त्यांच्यावर डबल मर्डरचे गुन्हे दाखल आहेत. आता त्यांच्या पाठीशी कोण आहे, हे तुम्हीच या फोटोंमध्ये… pic.twitter.com/gOBdUbEXBZ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 19, 2025
19 Dec 2025 01:02 AM (IST)
2025 मध्ये स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये अनेक बदल झाले. Apple, Samsung, Google, Vivo आणि Oppo सारख्या कंपन्यांनी या वर्षात अनेक प्रिमियम स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. काही स्मार्टफोन्सची किंमत तर इतकी जास्त आहे, की त्या किंमतीत तुम्ही अनेक बजेट स्मार्टफोन किंवा एखादा लॅपटॉप खरेदी करू शकतात. 2025 मध्ये लाँच झालेल्या काही महागड्या स्मार्टफोन्सबाबत आता जाणून घेऊया.
नाशिकमध्ये लवकरच सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून जोरदार तयारी सुरु आहे. यामध्ये सर्वात जास्त वादग्रस्त हे तपोवन ठरले. नाशिकच्या तपोवन येथील 1800 झाडांची कत्तल करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या विरोधात जोरदार जनआंदोलन उभारण्यात आल्या नंतर आणि तीव्र विरोधानंतर देखील शासन निर्णयावर ठाम राहिले. या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. वृक्षतोडीविरोधात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार, नाशिक महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरणाला नोटीस बजावली असून त्यांना उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने प्रशासनाला सध्या झाडे तोडण्यास सुरुवात करू नये असे तोंडी निर्देश दिले आणि खटल्याची सुनावणी 14 जानेवारीपर्यंत पुढे ढकलली. याविरुद्ध आता कायदेशीर लढाई सुरू झाली आहे.