Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MKVDC News: राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना संजीवनी! महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मोठे पाऊल

पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या भागांना दिलासा देखील मिळणार असून शेती उत्पादन वाढ , भूजल पुनर्भरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास नक्कीच मदत होईल. राज्यातील सिंचन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या प्रयत्नांचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 04, 2026 | 10:57 AM
Maharashtra Water Resources, Pune, Satara, Agriculture Irrigation

Maharashtra Water Resources, Pune, Satara, Agriculture Irrigation

Follow Us
Follow Us:
  • राज्यातील बारा महत्त्वाच्या सिंचन योजनांसाठी  नाबार्डकडे तब्बल नऊ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा प्रस्ताव
  • पुणे , सातारा, सांगली, कोल्हापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यातील विविध सिंचन योजनांचा समावेश
  • बारा सिंचन प्रकल्पांच्या योजनांची अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नवीन क्षेत्र सिंचनाखाली येण्याची अपेक्षा
Maharashtra Krishna Valley Development Corporation: वर्षानुवर्षे निधी अभावी रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना अखेर संजीवनी मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने राज्यातील बारा महत्त्वाच्या सिंचन योजनांची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी नाबार्डकडे तब्बल नऊ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा प्रस्ताव सादर केला असून त्याला मंजुरी मिळाली तर हजारो हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे .

दरम्यान राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने मोठे पाऊल उचलले आहे. जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील 12 महत्त्वाच्या सिंचन योजनेची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी नाबार्डकडे सुमारे नऊ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास अनेक वर्षापासून रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळून सिंचन क्षमता वाढण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Maharashtra Monsoon Alert: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, अनेक ठिकाणी शाळांना

महामंडळाच्या कार्यक्षेत्रात पुणे , सातारा, सांगली, कोल्हापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यातील विविध सिंचन योजनांचा समावेश होतो. या योजनांपैकी अनेक प्रकल्पांची प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी पूर्ण झाली असून काही ठिकाणी निविदा प्रक्रियाही पार पडली आहे. परंतु निधीअभावी कामांचा वेग मंदावला होता. त्यामुळे उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी नाबार्ड मार्फत निधी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या प्रस्तावात खडकवासला , फुरसुंगी बोगदा प्रकल्प , गुंजवणी , चासकमान, निरा -देवधर , टाकळी – निघोज उपसा सिंचन योजना , कृष्णा -कोयना उपसा सिंचन योजना , देऊर उपसा सिंचन योजना , स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना , मंगळवेढा उपसा सिंचन योजना , हणबारवाडी आणि धामणी म्हाळसाकांत सिंचन प्रकल्प अशा एकूण बारा महत्त्वाच्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील धामणी म्हाळसाकांत सिंचन योजना राबवण्याकरिता आंबेगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी तथा माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केले. अखेर वळसे पाटील यांच्या प्रयत्नाला यश आले असून धामणी म्हाळसाकांत सिंचन योजनेचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तालुक्याच्या पूर्व भागातील धामणी , पहाडदरा , लोणी , शिरदाळे , खडकवाडी आदी गावांना सिंचनाचा महत्त्वाचा प्रश्न भेडसावत होता परंतु वळसे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आता या भागातील नागरिकांना माळसाकांत योजनेचे पाणी मिळू शकते.

CBSE New Chairman: CBSE च्या नव्या अध्याक्षपदी IAS प्रशांत लोखंडे यांची नियुक्ती;

दरम्यान बारा सिंचन प्रकल्पांच्या योजनांची अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नवीन क्षेत्र सिंचनाखाली येण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या भागांना दिलासा देखील मिळणार असून शेती उत्पादन वाढ , भूजल पुनर्भरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास नक्कीच मदत होईल. राज्यातील सिंचन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या प्रयत्नांचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. नाबार्ड करून कर्जाला मंजुरी मिळाल्यानंतर रखडलेल्या प्रकल्पांना नव संजीवनी मिळेल.

राज्यातील 12 रखडलेले सिंचन प्रकल्प पुढील प्रमाणे -खडकवासला ते फुरसुंगी बोगदा प्रकल्प , गुंजवणी , चासकमान, निरा -देवधर , लाकडी -निंबोडी उपसा सिंचन योजना , कृष्णा – कोयना उपसा सिंचन योजना , टेंभू उपसा सिंचन योजना , स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना , मंगळवेढा उपसा सिंचन योजना , हणबरवाडी , धामणी म्हाळसाकांत सिंचन योजना , भीमा -उजनी प्रकल्प याप्रमाणे आहे.

सध्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत 40 पैकी 12 प्रकल्प प्रामुख्याने हाती घेतले आहेत. त्याकरिता नऊ हजार पंचवीस कोटी रुपयांच्या कर्जासाठी प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे जवळजवळ एक लाख 99 हजार 545 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. तसेच लाखो शेतकऱ्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल असे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ.हनुमंत धुमाळ यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra irrigation projects pune satara sangli kolhapur ahmednagar water resource department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 10:57 AM

Topics:  

  • Agriculture News
  • irrigation projects
  • Water supply

संबंधित बातम्या

Maval News: पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार? मावळात नव्या राजकीय संघर्षाची चिन्हे
1

Maval News: पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार? मावळात नव्या राजकीय संघर्षाची चिन्हे

PCMC Water Update: पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी महापालिकेने कसली कंबर, नवे वेळापत्रक जाहीर
2

PCMC Water Update: पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी महापालिकेने कसली कंबर, नवे वेळापत्रक जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.