Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrahar Patil : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उपोषणाच्या आखाड्यात; कुस्तीक्षेत्रातील विविध मागण्यांसाठी आंदोलन

Chandrahar Patil : एक राज्य-एक खेळ-एक संघटना ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने राबवली पाहिजे, अशी आग्रही मागणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 18, 2025 | 08:44 PM
Chandrahar Patil : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उपोषणाच्या आखाड्यात; कुस्तीक्षेत्रातील विविध मागण्यांसाठी आंदोलन

Chandrahar Patil : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उपोषणाच्या आखाड्यात; कुस्तीक्षेत्रातील विविध मागण्यांसाठी आंदोलन

Follow Us
Close
Follow Us:

सांगली : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्याचे ठरवल्यानंतर चंद्रहार पाटील यांनी उपोषणाचे अस्त्र उगारले आहे. कुस्ती क्षेत्रामध्ये पैलवानांवर होणारा अन्याय हा स्पष्टपणे दिसतोय. कुस्ती क्षेत्राला आणि पैलवानाना न्याय मिळवून देण्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल, मात्र त्यासाठी मी लढत राहणार आहे.

राजकारण थांबले पाहिजे

कुस्ती क्षेत्रामध्ये होणारे राजकारण आता थांबवले पाहिजे. नाही तर पैलवानांची नवीन पिढी तयार होणार नाही. अशी भीती व्यक्त करीत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी एक राज्य-एक खेळ-एक संघटना ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने राबवली पाहिजे, अशी आग्रही मागणी केली आहे. या मागणीसह अनेक मागण्यांना घेऊन चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केलं.

वेळीच दखल घेतल्या गेली नाही तर मंत्रालयावर धडक मोर्चा
महाराष्ट्रात आज कुस्ती म्हटलं तर एक पारंपरिक खेळ म्हणून बघितलं जातं. त्यांच कुस्ती क्षेत्राची आज वाताहत होत आहे. त्यासाठी मी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत असल्याची माहिती चंद्रहार पाटील यांनी दिली. आजवर ज्या स्पर्धा झाल्यात त्यात सलग स्पर्धा होत आहेत. एका 2025 वर्षांत चारदा महाराष्ट्रा केसरी स्पर्धा होणार आहे. किंबहुना राज्यात केवळ वर्षातून एकदाच ही स्पर्धा व्हायला पाहिजे. या प्रमुख आणि इतर मागणीला घेऊन मी आज आंदोलन करत आहे. मात्र त्याची वेळीच दखल घेतल्या गेली नाही तर मोठं आंदोलन करणार असल्याचा इशारा ही चंद्रहार पाटील यांनी दिला आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना भेटून याबाबत परत निवेदन देणार. मात्र सरकारने माझ्या मागणीबाबत विचार केला नाही तर लवकरच मंत्रालयावर धडक मोर्चा काढू असेही ते यावेळी म्हणाले.

चंद्रहार पाटील यांच्या नेमक्या मागण्या काय?
– राज्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दरवर्षी एकदाच झाली पाहिजे.
-एक राज्य-एक खेळ-एक संघटना हि संकल्पना महाराष्ट्र शासनाने राबवली पाहिजे.
-महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजकाने महाराष्ट्र केसरीच्या विजेत्या पैलवानास 1 कोटी रुपयांचे बक्षिस दिले पाहिजे.
-ज्या पद्धतीने तीन वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर DYSP पदी थेट नियुक्ती करण्यात येते, त्याच पद्धतीने एकदा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर PSI पदी थेट नियुक्ती झाली पाहिजे.
-पै. शिवराज राक्षे व पै. महेंद्र गायकवाड यांच्यावरील 3 वर्षांची बंदी हटवण्यात यावी आणि राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पैलवानांची डोपिंग टेस्ट झाली पाहिजे.
या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे.

Web Title: Maharashtra kesari competition double maharashtra kesari chandrahar patil in the arena of hunger strike protest for various demands in the wrestling field

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 08:36 PM

Topics:  

  • chandrahar patil
  • Chief Minister Devendra Fadnavis
  • Maharashtra Kesari
  • MLA Rohit Pawar
  • Sharad Pawar
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
1

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

‘भारताला हिंदू पाकिस्तान बनवू पाहत आहेत…’ उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी
2

‘भारताला हिंदू पाकिस्तान बनवू पाहत आहेत…’ उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी

Ramdas Kadam: “उद्धवजींनी दोन दिवस शिवसेनाप्रमुखांच्या बॉडीचा…; रामदास कदम यांनी फोडला राजकीय बॉम्ब
3

Ramdas Kadam: “उद्धवजींनी दोन दिवस शिवसेनाप्रमुखांच्या बॉडीचा…; रामदास कदम यांनी फोडला राजकीय बॉम्ब

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?
4

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.