Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MNS Politics: मी आणि माझा बबड्या…; शिंदेंच्या मेळाव्यानंतर मनसेने डिवचलं

गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यास मनसेने महायुतीला खुला पाठिंबा दिला होता. त्यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा प्रचार राजू पाटील यांनी केला होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 20, 2025 | 11:04 AM
MNS Politics:  मी आणि माझा बबड्या…; शिंदेंच्या मेळाव्यानंतर मनसेने डिवचलं
Follow Us
Close
Follow Us:

Raju Patil News:शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा काल मुंबईत पार पडला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आपालल्या मेळाव्यातून टीकाटिपण्ण्यां झाल्या. या मेळाव्यात, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत विधानसभेत जनतेने तुम्हाला गाडून टाकल्याची टीका केली. इतकेच नव्हे तर, युतीसाठी ते लाचार झालेत. हिंदुत्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे किती आगतिक झालीये हे आपण पाहत आहोत, असा टोलाही त्यांनी लगावला. तर उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे, ते होईल,असे अस्पष्ट संकेत दिले. या मेळाव्यानंतर मनसेकडून काय प्रतिसाद मिळणार, याकडे लक्ष लागले होते. अखेर एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यानंतर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत थेट शिंदेंना टोला लगावला आहे.

एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यानंतर राजू पाटील यांनी ट्विट करत शिंदेंवर टीका केली आहे. ” ‘मी आणि माझा बबड्या…..मेळावा संपला!” इतकेच नव्हे तर, अभ्यासक्रमात पहिलापासून हिंदी शिकवण्याच्या मुद्द्यावरूनही राजू पाटलांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. “शिवसेना पक्ष, शिवसेनेचा धनुष्यबाण आपलाच म्हणणारे, सध्या शिवसेनेचा आत्मा असणाऱ्या “मराठी” भाषेत वाटेकरी होण्यासाठी येऊ घातलेल्या तिसऱ्या भाषेच्या बाबत आपली भूमिका मांडताना का दिसत नाहीत?” असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Thackeray Brother Alliance: डिनर डिप्लोमसी अन्…; ठाकरे बंधुंच्या युतीला शिंदे गटाकडून सुरूंग, राज ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष

दरम्यान, गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यास मनसेने महायुतीला खुला पाठिंबा दिला होता. त्यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा प्रचार राजू पाटील यांनी केला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत केलेली मदत लक्षात ठेवून श्रीकांत शिंदे विधानसभा निवडणुकीत आपल्याला पाठिंबा देतील, अशी अपेक्षा होती. पण विधानसभेला शिंदे गटाने आपला उमेदवार राजू पाटील यांच्या विरोधात उतरवून त्यांचा पराभव केला. त्यामुळेही राजू पाटील यांच्या मनात श्रीकांत शिंदेंविषयी राग असल्याची चर्चा आहे.

एकीकडे उद्धव ठाकरेंनी मेळाव्यात बोलताना, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे, तेच होणार, पण काहीजणांना मराठी माणूस एकत्र आलेला नको, म्हणून हॉटेलमध्ये गाठीभेटी सुरू आहेत. असा टोलाही त्यांनी लगावला. पण मनसेसोबत युतीचे अस्पष्ट संकेतही त्यांनी दिले. मनसेसोबत युतीसाठी लाचार… महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होणार पण काही जणांना मराठी माणूस एकत्र आलेला नको आहे म्हणून हाॅटेलमध्ये गाठीभेटी घेतात, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक असल्याचे संकेत त्यांनी दिले.

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांचा एक आठवणीचा किस्सा सांगितला. 1992 साली मुंबईत दंगल उसळली होती, तेव्हा शिवसैनिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी छातीचा कोट करून मुंबईचं रक्षण केलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.ते पुढे म्हणाले, “त्यावेळी एक व्यक्ती बाळासाहेबांकडे आली आणि म्हणाली – ‘बाळासाहेब, आता पुरे झालं.’ ती व्यक्ती आता हयात नाही आणि मी त्याचं नाव घेणार नाही. त्यावेळी बाळासाहेबांनी नाना पाटेकरच्या ‘प्रहार’ या चित्रपटातील एक डायलॉग ऐकवला होता.”

औषधापेक्षाही गुणकारी ठरतोय व्यायाम, 37% कॅन्सर मृत्यू 28% पुन्हा कॅन्सर होण्याचा धोका कमी; रिसर्चमध्ये खुलासा

या आठवणीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावत थेट आव्हानच दिलं. ते म्हणाले, “नाना पाटेकर त्या चित्रपटात गुंडासमोर उभा राहून म्हणतो – ‘कम ऑन, किल मी’. त्याचप्रमाणे, मी देखील गद्दारांसमोर उभा राहून म्हणतो – ‘कम ऑन, किल मी’. असेल हिंमत, तर या अंगावर. पण लक्षात ठेवा, अंगावर याल तर रुग्णवाहिका घेऊन या, कारण येताना सरळ याल, पण जाताना आडवं होऊन जाल.”

 

Web Title: Maharashtra navnirman sena leader raju patil criticized eknath shindes melava

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 11:04 AM

Topics:  

  • MNS
  • raj thackeray
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल
1

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?
2

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
3

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?
4

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.