
Maharashtra politics: 'We will make not only Mumbra but the entire Maharashtra green...'; Imtiaz Jaleel's statement after Sahar Sheikh.
Maharashtra political news: ठाणे जिल्ह्यातील AIMIM’च्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्या वादग्रस्त विधानासाठी तक्रारही केली होती. त्यानंतर सहर शेख यांना माफीही मागावी लागली. पण सहर शेख यांचे प्रकरण ताजे असतानाच आता एमआयएम चे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मुंब्राच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू, असे विधान करत पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. हिरवा रंग काय दहशतवादाचा आहे का, अशा सवालीह त्यांनी उपस्थित केला आहे.
Gulabrao Patil controversial statement : “तुमची बायको हेमामालिनी आहे असं समजा…! गुलाबराव पाटील हे
इम्तियाज जलील यांच्या या विधानावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्यासह हिंदुत्त्ववादी संघटनांनी जलील यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत एमआयएमच्या तिकीटावर विजयी झालेल्या सहर शेख यांनी येत्या पाच वर्षांत मुंब्रा पूर्णपणे हिरवा करायचा असल्याचे विधान केलं होतं. शेख यांच्या या विधानानंतर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. त्यावरून किरीट सोमय्या यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी माफीनामाही दिला. या सगळ्या घडामोडींनंतर इम्तियाज जलील यांनी मुंब्रा इथं सहर शेख आणि अन्य नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेतली.
यावेळी बोलताना इम्तियाज जलील यांनी एमआयएम पक्ष सहर शेख यांच्या पाठिशी ठामपणे उभा असल्याचे सांगितले. तसेच कोणत्याही प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न झाला तर त्याला उत्तर देण्याची जबाबदारी माझी असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला. कारवाई करायची असेल तर ती माझ्यावर करा, असा इशाराही यजावेळी जलील यांनी दिला.
Delhi NCR Weather : दिल्लीत एक दिवस झालेल्या पावसाने प्रदुषण विरले; 100 दिवसांनंतर, AQI 151 वर
सहर शेख यांच्या विधानावरही जलील यांनी भाष्य केलं. ” हिरवा शब्द हा दहशतवादाची जोडण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. झाडे, पर्यावरण आणि विकासाच्या संदर्भातही हा शब्द वापरला जातो. मग या विधानाकडे त्या दृष्टीने का पाहिले जात नाही,” याकडे इम्तियाज जलील यांनी लक्ष वेधलं. याशिवाय नगरसेविका सहर शेख यांना माफी मागण्यासाठी दबावही टाकला गेल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
माजी खासदार नवनीत राणा यांनी इम्तियाज जलील यांच्यावर कडाडून टीका करताना म्हटले की, जलील आपली औकात आणि परिस्थिती पूर्णपणे विसरले आहेत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान भक्त असून त्यांच्या विचारांचे रक्त आजही आमच्या धमन्यांत वाहत आहे. तुम्हीच काय, तर तुमच्या सात पिढ्या जरी उतरल्या तरी महाराष्ट्राला ‘हिरवा’ करणे कधीही शक्य होणार नाही. जलील हे बोलताना सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडत आहेत. अल्पसंख्याक म्हणून आम्ही तुम्हाला सहन करत आहोत, याचा अर्थ असा मुळीच नाही की आम्ही शांत बसू किंवा आम्ही हातात बांगड्या भरल्या आहेत. ज्या दिवशी ताकद दाखवण्याची वेळ येईल, त्या दिवशी आम्हाला केवळ पंधरा सेकंद देखील पुरेसे ठरतील; महाराष्ट्र हिरवा करण्याचे तुमचे स्वप्न कधीही पूर्ण होऊ दिले जाणार नाही.