Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Update: २० जुलैनंतर मान्सून धुमाकूळ घालणार? पुण्यासह आज ‘या’ ५ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Rain Update- कोकण विभागात सध्या दमट आणि ढगाळ वातावरण कायम आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, या जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष हवामान इशारा जारी केलेला नाही.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 16, 2026 | 08:23 AM
देशातील अनेक राज्यांत पावसाचा जोर कायम; उत्तर प्रदेशातील 63 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

देशातील अनेक राज्यांत पावसाचा जोर कायम; उत्तर प्रदेशातील 63 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अपेक्षेइतका पाऊस झालेला नाही.
  • पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांना यलो अलर्ट
  • मराठवाड्याला पावसाची प्रतिक्षा कायम
 

Maharashtra Rain Update: जुलैचा अर्धा महिना उलटून गेला असतानाही राज्यातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस झालेला नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोकण, घाटमाथा, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अपेक्षेइतका पाऊस झालेला नाही.  भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, २० जुलैनंतर देशातील अनेक भागांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.

आज ‘या’ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट

हवामान विभागाने आज पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Ashada Gupta Navratri: आषाढ गुप्त नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करा या देवीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत

कोकणात हलक्या सरींची शक्यता

कोकण विभागात सध्या दमट आणि ढगाळ वातावरण कायम आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, या जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष हवामान इशारा जारी केलेला नाही.

मराठवाड्यात व्यापक पावसाची शक्यता कमी

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि लातूर जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही. धाराशिव जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असला तरी व्यापक स्वरूपाच्या पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. या भागातही ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.

डोंबिवली हादरली! डॉक्टर मारहाण प्रकरण ताजे असतानाच शिंदे सेनेचे २ मोठे नेते अटकेत; १५ लाखांचा गंडा घातल्या

उत्तर महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नाशिक घाटमाथा परिसरात हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. अनेक भागांत उष्णता आणि दमट वातावरण कायम असल्याने शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष मान्सून पुन्हा कधी सक्रिय होणार, याकडे लागले आहे.

२० जुलैनंतर मान्सूनला गती मिळण्याची शक्यता

सध्या महाराष्ट्रातील बहुतांश भागात जोरदार पावसासाठी अनुकूल हवामान प्रणाली सक्रिय नसली, तरी हवामान विभागाच्या अंदाजानुसार २० जुलैनंतर देशातील अनेक भागांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढतो का, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Maharashtra rain yellow alert update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 08:23 AM

Topics:  

  • Maharashtra Rain Update
  • Monsoon 2026
  • Monsoon News

संबंधित बातम्या

देशभरात 11 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता; नेपाळनंतर आता उत्तराखंडसह हिमाचल प्रदेशात पूर येणार?
1

देशभरात 11 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता; नेपाळनंतर आता उत्तराखंडसह हिमाचल प्रदेशात पूर येणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.