Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: पुण्यासह आज ‘या’ ५ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Breaking News: मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि लातूर जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही. धाराशिव जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असला तरी व्यापक स्वरूपाच्या पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 16, 2026 | 06:45 PM
Maharashtra Breaking News Today 30. 09.2026

Maharashtra Breaking News Today 30. 09.2026

Follow Us
Follow Us:

Maharashtra to National And International Breaking News:

Maharashtra Rain Update: जुलैचा अर्धा महिना उलटून गेला असतानाही राज्यातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस झालेला नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोकण, घाटमाथा, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अपेक्षेइतका पाऊस झालेला नाही.  भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, २० जुलैनंतर देशातील अनेक भागांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.

आज ‘या’ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट

हवामान विभागाने आज पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 

 

The liveblog has ended.
  • 16 Jul 2026 06:44 PM (IST)

    16 Jul 2026 06:44 PM (IST)

    क्रिकेट जगतात खळबळ! निवृत्तीच्या अवघ्या ३ आठवड्यांत ‘या’ दिग्गज खेळाडूचा धक्कादायक यू-टर्न

    England Cricket: सध्या भारत अन् इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची वनडे सिरिज सुरू आहे. आज दूसरा सामना खेळवला जात आहे. त्यातच आता इंग्लंड क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार आणि ऑल राऊंडर खेळाडू बेन स्टोक्स वनडे सामने खेळताना दिसणार आहे. तब्बल तीन वर्षांनी बेन स्टोक्स वनडे सामने खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

  • 16 Jul 2026 06:28 PM (IST)

    16 Jul 2026 06:28 PM (IST)

    चांदोबाच्या लिंब येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पहिले उभे रिंगण; लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने अश्वांची नेत्रदीपक दौड

    फलटण : महाराष्ट्राची महान वारकरी परंपरा असलेल्या जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यातील पहिले भव्य ‘उभे रिंगण’ फलटण तालुक्यातील तरडगाव जवळील ऐतिहासिक चांदोबाचा लिंब येथे अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. टाळ-मृदंगाचा कानठळ्या बसवणारा गजर, हरिनामाचा अखंड जयघोष आणि वैष्णवांच्या अथांग उत्साहात लाखो भाविकांनी या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या नेत्रदीपक सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यापूर्वी लोणंद येथील दीड दिवसांचा मुक्काम आटोपून पालखी सोहळ्याने खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यामध्ये प्रवेश केला. या वेळी कापडगाव येथील सरदेचा ओढा येथे तालुक्याच्या वतीने सोहळ्याचे भव्य स्वागत करण्यात आले. या स्वागतप्रसंगी आमदार सचिन पाटील, माजी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार अभिजित जाधव आणि अभिजित नाईक निंबाळकर यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • 16 Jul 2026 06:08 PM (IST)

    16 Jul 2026 06:08 PM (IST)

    Dhule Crime: ‘माझ्यावर अन्याय झाला’…भावनिक व्हिडीओ बनवत २८ वर्षीय तरुणाची तापी नदीत उडी; दोन दिवसांनी सापडला मृतदेह

    धुळे: धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २८ वर्षीय तरुणाने तापी नदीत उडी मारत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने पुलावरून एक भावनिक व गंभीर आरोप करणारा व्हिडीओ बनवला. त्यांनतर हा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल केला. दोन दिवसानंतर त्याचा मृतदे नदीत सापडून आला आहे.

  • 16 Jul 2026 05:45 PM (IST)

    16 Jul 2026 05:45 PM (IST)

    US-Iran War : अमेरिका-इराण युद्ध भडकलं!

    US-Iran War News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष काही थांबण्याचे नाव घेईना. दोन्ही देशांकडून हल्ले-प्रतिहल्ले सुरुच आहेत. अमेरिकेने इराणच्या अनेक लष्करी ठिकाणांवर आणि  महत्त्वपूर्ण बंदरांवर हल्ले केले असून या हल्ल्यांमध्ये एका बाल रुग्णालयावरही हल्ला करण्यात आल्याचा दावा इराणने केला आहे.

    १५ जुलैच्या मध्यरात्री झालेल्या हल्ल्यात बाल कर्करोग रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगतिले जात आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने हा दावा केला आहे. तसेच अमेरिकेचे MQ-9 रिपर ड्रोनही पाडण्यात आल्याचा दावा केला जात आहे. परंतु याची अमेरिकेकडून अधिकृत पुष्टी नाही.

  • 16 Jul 2026 05:30 PM (IST)

    16 Jul 2026 05:30 PM (IST)

    Yavatmal Crime: मुलीच्या सुखासाठी लग्न लावून दिलं

    यवतमाळ: यवतमाळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासऱ्यानेच आपल्या जावयाची हत्या केल्याचे समोर आले आहे. जावई मुलीला त्रास देत असल्याचे समजताच सासऱ्याने हा टोकाचा निर्णय घेतला. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. घडलेली घटना

    या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शंकर मसाराम मस्के (35, रा. कुंभारी, ता. पुसद) असे मृत जावयाचे नाव आहे. तर रामनाथ किसान कवडे (60) असे आरोपी सासऱ्याचे नाव आहे. वडिलाने मुलीचा प्रेम विवाह करून दिला. मात्र मुलीला जावई हा दारूच्या नशेत सतत मारहाण व छळ करीत असल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये सातत्याने वाद होत होते.

  • 16 Jul 2026 05:20 PM (IST)

    16 Jul 2026 05:20 PM (IST)

    US-Iran War : अमेरिका-इराण युद्ध भडकलं!

    US-Iran War News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष काही थांबण्याचे नाव घेईना. दोन्ही देशांकडून हल्ले-प्रतिहल्ले सुरुच आहेत. अमेरिकेने इराणच्या अनेक लष्करी ठिकाणांवर आणि  महत्त्वपूर्ण बंदरांवर हल्ले केले असून या हल्ल्यांमध्ये एका बाल रुग्णालयावरही हल्ला करण्यात आल्याचा दावा इराणने केला आहे.

    १५ जुलैच्या मध्यरात्री झालेल्या हल्ल्यात बाल कर्करोग रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगतिले जात आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने हा दावा केला आहे. तसेच अमेरिकेचे MQ-9 रिपर ड्रोनही पाडण्यात आल्याचा दावा केला जात आहे. परंतु याची अमेरिकेकडून अधिकृत पुष्टी नाही.

  • 16 Jul 2026 05:10 PM (IST)

    16 Jul 2026 05:10 PM (IST)

    Shravan 2026 : श्रावणाचा पहिला दिवस कधी?

    First Day of Shravan : हिंदू धर्मात श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित मानला जातो. या महिन्यात भगवान शिवाची भक्तिभावाने पूजा, रुद्राभिषेक, जलाभिषेक आणि सोमवारी उपवास केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे श्रावण महिन्याची सुरुवात कधी होते, याकडे भाविकांचे विशेष लक्ष असते.

    श्रावण, आषाढ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सुरू होतो. श्रावण महिन्याला श्रावण नक्षत्र याच महिन्याच्या पौर्णिमेला येत असल्यामुळे या महिन्याला श्रावण महिना असेही म्हटले जाते. म्हणूनच या महिन्याला श्रावण असे नाव दिले आहे. श्रावण महिन्यात देवांचे देव असलेल्या भगवान शिवाची पूजा करतात आणि जलाभिषेक करतात. असे म्हटले जाते की, श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगाला एक कलश पाणी अर्पण केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि तुमच्या इच्छा पूर्ण करतात. चला तर मग जाणून घेऊया की श्रावण महिन्याचा पहिला दिवस कधी असतो. त्या दिवशी जलाभिषेक करण्याची योग्य वेळ कोणती आहे?

  • 16 Jul 2026 05:00 PM (IST)

    16 Jul 2026 05:00 PM (IST)

    FIFA World Cup 2026 Final: मेस्सी vs यामाल आमनेसामने!

    फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धेत आता अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. गतविजेता अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात विजेतेपदासाठी सामना होणार आहे. उपांत्य फेरीत फ्रान्सला २-० ने हरवून स्पेनने अंतिम फेरीत प्रवेश केला, तर अर्जेंटिनाने इंग्लंडला २-१ ने पराभूत करुन सलग दुसऱ्यांदा विश्वचषक अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ८ संघांसह सुरू झालेल्या या सर्वात मोठ्या फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आता २ संघ आमनेसामने येणार आहेत. अर्जेंटिना-स्पेनचा अंतिम सामना तु्म्ही कधी अन् कुठे पाहू शकता, जाणून घ्या.

  • 16 Jul 2026 04:59 PM (IST)

    16 Jul 2026 04:59 PM (IST)

    शिंदे गटात गेलेले सचिन अहिर सरकारी बंगल्यावरून नाराज? एकनाथ शिंदेंकडे व्यक्त केली थेट नाराजी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

    काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या ६ खासदारांच्या बंडानंतर मोठा राजकीय भूकंप झाला होता. या राजकीय घडामोडींदरम्यान, ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंसोबत खंबीरपणे काम करणारे नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनीही शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Eknath Shinde) प्रवेश केला होता.

  • 16 Jul 2026 04:47 PM (IST)

    16 Jul 2026 04:47 PM (IST)

    शुभमन गिलच्या फिटनेसने वाढवली चिंता; संघात होणार मोठे बदल? पाहा पिच रिपोर्ट अन् संभाव्य Playing 11 एका क्लिकवर

    इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने अखेर विजयाची चव चाखली. भारताने पाच सामन्यांची टी-२० मालिका गमावली. परंतु, आता संघाकडे एकदिवसीय मालिका जिंकण्याची संधी आहे. आजचा दुसरा वनडे सामना कार्डिफ येथील सोफिया गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५. ३० वाजता सुरु होईल. त्याआधी ५ वाजता नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधार मैदानात उतरतील. दुसरा वनडे सामना दोन्ही संघासाठी निर्णायक असणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडिया मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल तर इंग्लंड देखील शर्यतीत टिकून राहण्यासाठी मैदानात उतरतील. परंतु, कर्णधार शुभमन गिललाही पहिल्या सामन्यात फलंदाजी करताना दुखापत झाली होती. त्यामुळे टीम इंडिया प्लेइंग ११ मध्ये काही बदल करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

  • 16 Jul 2026 04:35 PM (IST)

    16 Jul 2026 04:35 PM (IST)

    ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ महागात! लेबलशिवाय विक्री सुरू होती सौंदर्यप्रसाधने; FDA ने जप्त केला ₹10.94 लाखांचा साबणसाठा

    मुंबईतील जोगेश्वरी (पश्चिम) येथे अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी धडक कारवाई करत ₹10,93,692 किमतीचा बिनलेबल (Unlabelled) टॉयलेट साबण जप्त केला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित विक्रेत्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

  • 16 Jul 2026 04:22 PM (IST)

    16 Jul 2026 04:22 PM (IST)

    इंग्लंडमध्ये घुसून धुमाकूळ! ऐतिहासिक कामगिरीबद्दल Kranti Gaud चा मध्यप्रदेश सरकारकडून सन्मान

    नुकताच भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळला. इंग्लंडच्या लॉर्डस या ऐतिहासिक मैदानावार दोन्ही संघांमध्ये एकमेव कसोटी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा 270 रन्सने दारुण पराभव केला आहे. यामध्ये गोलंदाज म्हणून क्रांती गौडने चांगली कामगिरी केली आहे. त्याबाबत मध्यप्रदेश सरकारने तिचा सन्मान केला आहे.

  • 16 Jul 2026 04:11 PM (IST)

    16 Jul 2026 04:11 PM (IST)

    ‘तर शरद पवार तेव्हाच राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवलेंची शरद पवारांना थेट NDA मध्ये येण्याची ऑफर!

    गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट एनडीए मध्ये सामील होणार असल्या्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये अंतर्गत बैठकाही सुरू असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीदेखील शरद पवार यांना थेट एनडीएमध्ये सामील होण्याची ऑफर दिली आहे.

  • 16 Jul 2026 04:00 PM (IST)

    16 Jul 2026 04:00 PM (IST)

    इस्रोमधून दरवर्षी १२० शास्त्रज्ञांचे राजीनामे

    ISRO Exit Rules News: इस्रोमधून दरवर्षी १२० शास्त्रज्ञांचे राजीनामे; गगनयान आणि महत्त्वाच्या मोहिमेतील वैज्ञानिकांसाठी नियम कडक भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) शास्त्रज्ञ बनणे हे देशातील लाखो तरुणांचे स्वप्न असते. चांद्रयानपासून ते गगनयानपर्यंत इसरोने ज्या पद्धतीने जगात भारताचा डंका वाजवला आहे, त्यामागे येथे काम करणाऱ्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची (इंजिनिअर्स) मेहनत दडली आहे. परंतु, नुकतीच एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, दरवर्षी इसरोमधून सुमारे १२० शास्त्रज्ञ राजीनामा देत आहेत. वाचा सविस्तर

  • 16 Jul 2026 03:55 PM (IST)

    16 Jul 2026 03:55 PM (IST)

    Latur Crime: लातूर हादरलं! प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञांचा संशयास्पद आढळला मृतदेह; पोलिस म्हणाले 'घातपात नाही'

    लातूर: लातूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध एम.जे. हॉस्पिटलचे (M.J. Hospital) नामांकित हृदयरोगतज्ज्ञ यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह कारमध्ये बेशुद्धावस्थेत बुधवारी सापडला होता. प्रथमदर्शनी हा घातपाताचा प्रकार वाटत नसून, हा आत्महत्येचाच प्रकार असल्याचे दिसून येत आहे अशी माहिती लातूर शहराचे पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी दिली आहे. वाचा सविस्तर

  • 16 Jul 2026 03:50 PM (IST)

    16 Jul 2026 03:50 PM (IST)

    RE रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 2026, नवीन फीचर्ससह लाँच

    भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील दुचाकी दिग्गजांपैकी रॉयल एनफिल्डने आपली सर्वात लोकप्रिय बाईक ‘क्लासिक ३५०’ चे २०२६ मधील अपडेटेड व्हर्जन भारतात लाँच केले आहे. या नव्या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत १.८७ लाख रुपयांपासून सुरू होऊन टॉप व्हेरिएंटसाठी २.२३ लाख रुपयांपर्यंत जाते. आजपासूनच ही बाईक देशभरातील रॉयल एनफिल्डच्या डीलरशिप्सवर उपलब्ध झाली आहे. वाचा सविस्तर

  • 16 Jul 2026 03:45 PM (IST)

    16 Jul 2026 03:45 PM (IST)

    अमेरिकेला इराणचे थेट प्रत्युत्तर

    US Iran military conflict 2026 : अमेरिका आणि इराण (US-Israel Iran War) यांच्यातील संघर्ष आता केवळ धमक्यांपुरता मर्यादित राहिलेला नसून, तो एका महाभयंकर युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या सातत्यपूर्ण हवाई हल्ल्यांमुळे मध्य आशियातील म्हणजेच मध्य पूर्वेतील संकट कमालीचे चिघळले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या थेट इशाऱ्यानंतर इराणनेही आता अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून, अमेरिकेच्या कोणत्याही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. “जर अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये आमच्या देशातील एकाही पायाभूत सुविधेचे नुकसान झाले, तर आम्ही संपूर्ण मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या सर्व सामरिक पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करू,” अशी खुली धमकी इराणने दिली आहे. वाचा सविस्तर

     

  • 16 Jul 2026 03:40 PM (IST)

    16 Jul 2026 03:40 PM (IST)

    शेख हसीना यांची ७६० अरब टका संपत्ती जप्त

    बांगलादेशातील तारिक रहमान सरकार ने शेख हसीना यांची बांगलादेशातील मधील ७६०अरब टका संपत्ती आणि याच्यात देशाबाहेरील १९० अरब टका संपत्ती हि जप्त करण्यात आली आहे . शेख हसीना यांचे सरकार बांगलादेशातील जनतेने उलथून लावल्यानंतर , त्यांनी देश सोडून भारतात आश्रय घेतला . नवीन आलेल्या तारिक सरकार ने त्यांना मृत्युदंडाची शिक्षा जाहीर केल्यानंतर , शेख हसीना यांची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय त्यांच्यासाठी दुसरा धक्का आहे . त्यांच्या बरोबर त्यांचे नातेवाईक हि संपत्ती मध्ये भागीदार आहेत. वाचा सविस्तर

  • 16 Jul 2026 03:35 PM (IST)

    16 Jul 2026 03:35 PM (IST)

    वाटलं original निघाला remake! खिलाडीचा ‘हैवान’, ‘या’ दाक्षिणात्य सिनेमाची कॉपी

    बॉलिवूडमध्ये दक्षिण भारतीय चित्रपटांच्या हिंदी रिमेकचा ट्रेंड अनेक वर्षांपासून कायम आहे. अनेक गाजलेल्या साऊथ चित्रपटांचे हिंदी अवतार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून, अशा चित्रपटांमध्ये अभिनेता अक्षय कुमारचे नाव नेहमीच आघाडीवर राहिले आहे. आता पुन्हा एकदा अक्षय कुमार एका लोकप्रिय मल्याळम चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्या आगामी ‘हैवान’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक आणि टीझर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वाचा सविस्तर

  • 16 Jul 2026 03:30 PM (IST)

    16 Jul 2026 03:30 PM (IST)

    Kieron Pollard ने लगावले तब्बल 1000 सिक्स; ‘युनिव्हर्स बॉस’चा मोडला रेकॉर्ड

    Kieron Pollard 1000 Sixes Record: सध्या जगभरात क्रिकेटच्या अनेक स्पर्धा सुरू आहेत. त्यातच एक एमएलसी लीग सुरू आहे. त्यामध्ये वेस्ट इंडिजचा खेळाडू कायरान पोलार्डने एक नवा विक्रम रचला आहे. त्याने टी 20 क्रिकेटमध्ये मोठा रेकॉर्ड केला आहे. त्याने 1000 सिक्स मारण्याचा रेकॉर्ड केला आहे. लवकरच तो ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. याबाबत जाणून घेऊयात.

  • 16 Jul 2026 03:25 PM (IST)

    16 Jul 2026 03:25 PM (IST)

    कॅनडात वणव्याचा भीषण कहर

    Canada Wildfire News in Marathi : ओटावा : कॅनडाच्या ओंटारियो प्रदेशात भीषण वणव्याने कहर केला आहे. यामुळे मोठे पर्यावरणीय संकट निर्माण झाले असून १०० हून अधिक ठिकाणी जंगलांना आग लागली आहे. या आगीमुळे हवेत धुराचे ढग पसरले असून ओटावा आणि देशाच्या अनेक भागांतील हवा दूषित झाली आहे. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या आगाची घटनांचे थरारक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वाचा सविस्तर

  • 16 Jul 2026 03:20 PM (IST)

    16 Jul 2026 03:20 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांचा मजीप्रा अधिकाऱ्यांना थेट दम

    छत्रपती संभाजीनगर: प्रश्न संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा मुख्यमंत्र्यांच्या अजंड्यावर आहे. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून दोन महिन्यात पाणी देण्याचा शब्द दिला होता. तो शब्द पूर्ण करण्यात अधिकारी खोडा घालत असल्याने जलवाहिनीचा मुख्यमंत्र्यांच्या दरबारात पोहोचला होता. मुंबईत झालेल्या बुधवारच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मजीप्रा अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत आताही वेळेत काम पूर्ण केले नाही तर कारवाईचा वडगा तुमच्यावर खूप आला जाऊ शकतो. म्हणून काम वेळेतच पूर्ण करा अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी दम भरला. वाचा सविस्तर

  • 16 Jul 2026 03:15 PM (IST)

    16 Jul 2026 03:15 PM (IST)

    मालमत्तांचे सर्वेक्षण आता खासगी एजन्सी करणार

    छत्रपती संभाजीनगर: सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड खडाजंगीनंतर शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण आणि फेरमुल्यांकन करण्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला अखेरीस महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी या प्रस्तावाचे समर्थन केले, मात्र काहींनी याला विरोधही केला. एजन्सी नियुक्तीसाठी पालिकेकडून आता निविदा प्रसिध्द करण्यात येणार आहे. सर्वेक्षण व फेरमुल्यांकनची प्रक्रिया सुरु असताना मालमत्ता करात वाढ होणार नाही अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली आहे. वाचा सविस्तर

  • 16 Jul 2026 03:10 PM (IST)

    16 Jul 2026 03:10 PM (IST)

    दिंड्यांना 2 कोटी 80 लाखांचे अनुदान मंजूर

    बारामती : महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि धार्मिक अस्मिता असलेल्या आषाढी वारीसाठी राज्य सरकारने वारकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत गेल्या दोन वर्षांपासून मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना देण्यात येणारे आर्थिक अनुदान यावर्षीही निरंतर सुरू ठेवण्यात आले आहे. विभागीय आयुक्त पुणे तथा व्यवस्थापकीय संचालक, मुख्यमंत्री वारकरी महामंडळ यांच्या थेट देखरेखीखाली या निधीचे वारकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वाटप सुरू करण्यात आले आहे. वाचा सविस्तर

  • 16 Jul 2026 03:05 PM (IST)

    16 Jul 2026 03:05 PM (IST)

    डॉक्टर रक्ताच्या थारोळ्यात, मुलगा गंभीर जखमी; पत्नी चौकशीच्या फेऱ्यात

    कर्नाटकातील धारवाड येथे ४५ वर्षीय भूलतज्ञ डॉ. किरण होन्नावर यांची त्यांच्या फ्लॅटमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली, तर त्यांच्या ८ वर्षीय मुलावर चाकूने हल्ला झाला. समोर आलेल्या व्हिडिओनंतर पत्नीच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत असून पोलिसांकडून तिची चौकशी सुरू आहे. हत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे. वाचा सविस्तर

  • 16 Jul 2026 03:00 PM (IST)

    16 Jul 2026 03:00 PM (IST)

    गुप्तधनाच्या हव्यासापोटी व्यापाऱ्याचा नरबळी

    रायसेन : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात गुप्तधनाच्या हव्यासापोटी एका व्यापाऱ्याचा नरबळी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रल्हाद साहू नावाच्या कथित तांत्रिकाने त्याचा मुलगा टीकम साहू आणि साथीदार करीम खान यांच्यासोबत मिळून व्यापारी विजय जैन यांची हत्या केली. वाचा सविस्तर

  • 16 Jul 2026 02:40 PM (IST)

    16 Jul 2026 02:40 PM (IST)

    ‘डोळे बंद कर, सरप्राइज आहे’… पुढच्याच क्षणी गळा चिरला; ‘क्राइम पेट्रोल’ पाहून रचला हत्येचा कट

    मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपीने मुलीला अनोख गिफ्ट देण्याचा नावाने मुलीचं डोळे बंद केले आणि त्यानंतर चाकूने तिचा गळा कापून तिची हत्या केल्याचे समोर आलं आहे. एवढेच नाही तर क्राइम पेट्रोल बघून पुरावा देखील नष्ट केला आहे. घडलेली घटना मुंबईच्या कांदिवली सामता नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली.

  • 16 Jul 2026 02:30 PM (IST)

    16 Jul 2026 02:30 PM (IST)

    E20 पेट्रोलवर मोठा निर्णय! ग्राहकाच्या बाजूने न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

    देशभरात इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोलचा वापर वाढत असताना अनेक वाहनचालकांच्या मनात अजूनही शंका कायम आहेत. काही जणांना या इंधनामुळे गाडीच्या कामगिरीवर परिणाम होत असल्याचा अनुभव येत आहे, तर काहींना मायलेज कमी झाल्याची तक्रार आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहक न्यायालयाने दिलेला एक महत्त्वाचा निर्णय वाहनधारकांसाठी दिलासादायक ठरू शकतो.

  • 16 Jul 2026 02:20 PM (IST)

    16 Jul 2026 02:20 PM (IST)

    भारत-इंग्लंड दुसऱ्या वनडेची वेळ बदलली; सामना नेमका किती वाजता सुरू होणार?

    भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील दुसरा आज सामना खेळला जाईल. भारतीय संघाने पहिला सामना जिंकला असून, आता ते आजचा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करतील. आजच्या सामन्याची वेळ पहिल्या सामन्यापेक्षा बदलली आहे. दरम्यान, आजचा सामना किती वाजता सुरू होईल, जाणून घेऊयात.

  • 16 Jul 2026 02:15 PM (IST)

    16 Jul 2026 02:15 PM (IST)

    WhatsApp वापरणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! आता चॅट बॅकअपसाठी Google Drive किंवा iCloudची गरज कमी होणार?

    आजकाल व्हॉट्सॲप (Whatapp) हा प्रत्येकाच्या आयुष्याचा जणूकाही एक भागच बनला आहे. खाजगी गप्पांपासून ते कामांच्याठिकाणी पर्यंतच्या अनेक गोष्टी या एक अॅपवर अवलंबून आहेत. त्यामुळे वर्षानुवर्ष जमा झालेल्या चॅट्स, फोटो, व्हिडिओ आणि कागदपत्रांसाठी बॅकअपही तितकाच महत्त्वाचा ठरतो. परंतू अनेकदा हा बॅकअपच आपल्याला डोकेदुखी बनतो. गुगल ड्राइव्ह (Google Drive) किंवा iCloud मधील जागा संपल्यानंतरही अनेकदा नवीन स्टोरेज खरेदी करावे लागते. दरम्यान काही जुन्या फाईल किंवा फोटो काढून टाकण्याची वेळ येते.

  • 16 Jul 2026 02:10 PM (IST)

    16 Jul 2026 02:10 PM (IST)

    सिया गोयलच्या कृत्याची झळ कुटुंबाला? केतन अग्रवाल प्रकरणात व्यवसायावर कारवाईची टांगती तलवार

    पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या हत्येतील आरोपी सिया गोयलच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या एका मसाल्याच्या आणि सुकामेव्याच्या दुकानाला महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कथित नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नोटीस बजावली आहे. नियामकाने दुकानाला तात्काळ कामकाज थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

  • 16 Jul 2026 02:05 PM (IST)

    16 Jul 2026 02:05 PM (IST)

    Adinath Urmila Divorce: ‘जोडीदार म्हणून प्रवास इथेच संपत….’, आदिनाथ -उर्मिलाने वेगळं होण्याचा घेतला निर्णय, मुलीसाठी भावूक पोस्ट

    मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे उर्मिला आणि आदिनाथ कोठारे. यांच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे यांनी अखेर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या नात्याबद्दल माहिती दिली आहे. त्यांच्या या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

  • 16 Jul 2026 01:02 PM (IST)

    16 Jul 2026 01:02 PM (IST)

    केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण पोलिसांची कारवाई

    पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील दिघी परिसरात अत्याधुनिक मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ निर्मितीची गुप्त प्रयोगशाळा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (सीबीएन)च्या ‘ऑपरेशन वज्र’ मोहिमेत उघडकीस आला आहे. छापा टाकून प्रयोगशाळेतील साहित्य, अत्याधुनिक उपकरणांसह १० लिटर हायड्रोक्लोरिक ॲसिड जप्त करण्यात आले. या प्रकरणी संबंधित आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. याबाबत स्थानिक पोलिसांना कोणतीच माहिती नव्हती.

  • 16 Jul 2026 12:48 PM (IST)

    16 Jul 2026 12:48 PM (IST)

    अमरावतीत रक्तरंजित हत्याकांड

    अमरावतीमधून एक थरकाप उडवणारी आणि कायदा-सुव्यवस्थेचे वाभाडे काढणारी घटना समोर आली आहे. शहरात एका २४ वर्षीय तरुणाची भररस्त्यात कोयत्याने सपासप वार करून अत्यंत निघृण हत्या करण्यात आली. प्रेमप्रकरणाच्या वादातून अत्यंत क्रूरतेने घडवून आणलेल्या या हत्याकांडात हल्लेखोरांनी तरुणाचा हाताचा पंजाही शरीरापासून वेगळा केला. या अंगावर काटा आणणाऱ्या भीषण घटनेचा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या डिजिटल पुराव्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मृताची ओळख पटली असून, शेख अफाक शेख अकिल (२४) असे मृत तरुणाचे नाव आहे.

  • 16 Jul 2026 12:36 PM (IST)

    16 Jul 2026 12:36 PM (IST)

    राष्ट्रवादीच्या नेत्याची महसूल मंत्र्यांकडे मागणी

    पुण्यातून एक मोठी बातमी आली आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवदेन देऊन एक मोठी मागणी केली आहे. महसूल विभागातील कलम १५५ च्या कथित गैरवापरप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह १५ महसूल अधिकाऱ्यांविरुद्ध तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. तसेच संबंधित अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह इतर सक्षम यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

  • 16 Jul 2026 12:24 PM (IST)

    16 Jul 2026 12:24 PM (IST)

    ग्रामस्थांच्या धाडसामुळे कुख्यात ‘दुधानी टोळी’ जेरबंद

    महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांत जबरी चोरी, लूटमार, घरफोडी आणि सशस्त्र दरोडे टाकून धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात ‘दुधानी टोळी’चा (शिकलकरी गँग) ओतूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. रविवारी (१२ जुलै) जुन्नर तालुक्यातील कोळवाडी येथे स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेल्या अफाट धाडसामुळे या आंतरराज्यीय टोळीतील ६ सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी एक पिस्टल (गावठी कट्टा), कटावणी, कटर, पान्हे आणि चोरीची बोलेरो गाडी यांसह गुन्ह्यासाठी लागणारे विविध घातक साहित्य जप्त केले आहे.

  • 16 Jul 2026 12:12 PM (IST)

    16 Jul 2026 12:12 PM (IST)

    शिरूर हादरलं! पोटच्या मुलानेच केला आईचा खून

    शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे पोटच्या मुलानेच आईला बेदम मारहाण करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर आईचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तपासातून हा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी दिलीप राघोबा चौधरी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंदा राघोबा चौधरी (वय ६०) असे मृत महिलेचे नाव आहे.

  • 16 Jul 2026 11:54 AM (IST)

    16 Jul 2026 11:54 AM (IST)

    पर्वती येथील एसआरए प्रकल्पावर आज सुनावणी

    पर्वती येथील शाहू वसाहत (सर्व्हे क्र. ९२) येथील पुनर्वसन प्रकल्पाबाबत प्रकरणाची सुनावणी आज होणार आहे.त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या माहितीवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकल्पासंदर्भातील सर्व कार्यवाही सध्याच्या कायदेशीर तरतुदी आणि प्रक्रियेनुसारच सुरू होती. प्रकल्पाच्या कायदेशीर प्रक्रिये दरम्यान सध्या या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. या स्थगितीबाबत सक्षम प्राधिकरणा समोर आज सुनावणी होणार असून, त्यानंतर पुढील अधिकृत निर्णय घेतला जाणार आहे.

  • 16 Jul 2026 11:47 AM (IST)

    16 Jul 2026 11:47 AM (IST)

    मुंबईकर पावसाळी आजारांनी त्रस्त

    मुंबईत पाऊस थांबला असला तरी आजारांचा धोका वाढला आहे. जानेवारी ते १४ जुलै या कालावधीत मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याची माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. अनेक भागांत साचलेल्या दूषित पाण्यामुळे विशेषतः लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग होण्याचा धोका वाढल्याने नागरिकांनी पाण्यातून चालणे टाळावे, आवश्यक असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रतिबंधक औषधे घ्यावीत, असे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे.

  • 16 Jul 2026 11:34 AM (IST)

    16 Jul 2026 11:34 AM (IST)

    खासदारांना स्मार्ट उपकरणांच्या वापराबाबत महत्त्वाच्या सूचना

    संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून (20 जुलै) सुरू होत आहे. अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी लोकसभा सचिवालयाने सर्व खासदारांसाठी महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. संसद परिसरात स्मार्ट घड्याळे, स्मार्ट चष्मे, पेन कॅमेरे आणि रेकॉर्डिंग करू शकणाऱ्या इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापराबाबत कडक सूचना दिल्या आहेत.

  • 16 Jul 2026 11:27 AM (IST)

    16 Jul 2026 11:27 AM (IST)

    वर्ध्यात 12 वर्षाच्या मुलीची अत्याचार करुन निर्घृण हत्या

    वर्ध्याच्या रोठा शिवारातील धक्कादायक घटना घडली आहे. परिसरात खळबळ उडाली आहे. एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली असल्याचे माहिती समोर येत आहे. आधी मुलीवर अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

  • 16 Jul 2026 11:13 AM (IST)

    16 Jul 2026 11:13 AM (IST)

    ७/१२ उताऱ्यातील 'चलाखी' नडली!

    सातबारा उताऱ्यामध्ये कायद्याचा गैरवापर करून 'चलाखी' करणाऱ्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे आता दणाणले आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १५५ चा गैरवापर करून बेकायदेशीर आदेश देणाऱ्या १५ अधिकाऱ्यांचे निलंबन झाल्यानंतर, आता तब्बल ८४ अधिकारी शासनाच्या रडारवर आले आहेत. यामुळे महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

  • 16 Jul 2026 11:01 AM (IST)

    16 Jul 2026 11:01 AM (IST)

    मोशी दुर्घटनेतील दोषींवर कारवाई कधी? नागरिकांचा संतप्त सवाल

    मोशीतील इमारत दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक कामगारांचा मृत्यू झाल्यानंतरही जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई झालेली नसल्याची टीका होत आहे. काही अधिकाऱ्यांवर कारवाई झाली असली तरी सुरक्षा नियमांकडे झालेल्या दुर्लक्षासाठी नेमके दोषी कोण, याबाबत नागरिकांमध्ये अजूनही संभ्रम आणि नाराजी आहे.

  • 16 Jul 2026 11:00 AM (IST)

    16 Jul 2026 11:00 AM (IST)

    iPhone चार्ज होत नाहीये? १ मिनिटांत चेक करा ही महत्त्वाची सेटींग

    आयफोनला सर्व्हिस सेंटरमध्ये नेण्याआधी त्याचे चार्जिंग पोर्ट एकदा तपासून पाहा. आयफोन चार्ज न होण्यामागे ८०% कारणीभूत त्याचे चार्जिंग पोर्ट ठरत असते. अनेकदा चार्जिंग पोर्ट खराब झाले किंवा त्यात घाण जमा झाली की फोन चार्ज होत नाही. आता तुम्हाला प्रश्न पडेल की चार्जिंग पोर्टमध्ये घाण कशी जाऊ शकते. तर आम्ही तुम्हाला सांगतो की, बऱ्याचदा आपण चार्जिंग पोर्टला घराबाहेर जाताना आपल्या बॅग किंवा पर्समध्ये कॅरी करतो ज्यामुळे बॅगेतील बारीक कण, धूळ आणि घाण यात जाऊन बसते. प्रत्येकवेळी आपण चार्जिंग केबल जेव्हा आत टाकतो तेव्हा ही घाण देखील त्याच्या आतमध्ये जाऊन बसते. हळूहळू लहान वाटणारी ही घाण वाढत जाते आणि मग समस्या निर्माण होऊ लागतात.

  • 16 Jul 2026 10:50 AM (IST)

    16 Jul 2026 10:50 AM (IST)

    रशिया युक्रेन युद्ध चिघळले! राजधानी कीव्हवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा भीषण प्रहार

    रशिया युक्रेन युद्ध पुन्हा एकदा तीव्र झाले आहे. गेल्या आठवड्याभरापासून रशियाचे राजधानी कीव्हवर हल्ले सुरु आहे. नुकतेच गुरुवारी(१६ जुलै) पहाटे रशियाने पुन्हा कीव्हवर निशाणा साधला. क्षेपणास्त्र आणि ड्रोन कीव्हसह अनेक शहरांवर डागण्यात आली. या हल्ल्यामुळ युक्रेनमध्ये एकच गोंधळ उडाला असून देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • 16 Jul 2026 10:40 AM (IST)

    16 Jul 2026 10:40 AM (IST)

    विनायक राऊत आणि गितेश यांना कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

    शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने ठाण्यातील कापूरबावडी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तेव्हा सून गिरीजा राऊत यांनी लग्नापूर्वी खोटी माहिती देणे, नपुंसकत्व लपवण्याचा प्रयत्न, शिवाय शारीरिक, आर्थिक व मानसिक छळाचा आरोपही केला. यानंतर आता विनायक राऊत यांच्यासह त्यांचा मुलगा गितेश यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण ठाणे न्यायालयाने दोघा पिता-पुत्राचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

  • 16 Jul 2026 10:30 AM (IST)

    16 Jul 2026 10:30 AM (IST)

    हाॅटेलमध्ये प्रियकरासोबत रंगेहात पकडली गेली पत्नी, Video Viral

    सदर घटना ही गाझियाबादच्या बाजरिया परिसरात घडून आल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पतीला आपल्या पत्नीवर संशय होता ज्यामुळे सत्य जाणून घेण्यासाठी तो ‘होटल क्विज’ आणि ‘होटल फार्म इन’जवळ पोहचला. इथे त्याने आपल्या पत्नीला एका दुसऱ्या पुरुषासोबत रंगेहात पकडलं. पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पकडताच पतीला राग अनावर झाला आणि त्याने प्रियकराची धुलाई करायला सुरुवात केली. सोशल मिडियावर या घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात पती प्रियकराला पकडून हाॅटेल रुमच्या बाहेर घेऊन जाताना दिसतो. पती इतका संतापलेला असतो की, रागाच्या भरात तो प्रियकराला बेदम मारहाण करायला सुरुवात करतो. ही घटना सध्या इंटरनेटवर चांगलीच चर्चेत असून प्रियकराला मार दिला ते बरोबर केलंत अशा प्रतिक्रिया यूजर्स व्हिडिओला देत आहेत.

  • 16 Jul 2026 10:20 AM (IST)

    16 Jul 2026 10:20 AM (IST)

    School Admission Scam: ‘या’ चुकीमुळे विद्यार्थी चौकशीच्या भोवऱ्यात सापडले

    गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातून शिक्षण व्यवस्थेला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे सरकारी शिक्षण व्यवस्था, खासगी शाळा आणि कोचिंग क्लासेसच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. देशातील प्रतिष्ठित निवासी शाळा, जसे की नवोदय विद्यालय आणि सैनिक स्कूलमधील प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा दावा केला जात आहे. या संदर्भात काँग्रेसने आरोप केला आहे की, केवळ कोचिंग क्लासेसच नव्हे, तर काही खासगी, सरकारी आणि अनुदानित शाळाही विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेत पास करण्यासाठी एका सुनियोजित नेटवर्कचा भाग बनल्या आहेत.

  • 16 Jul 2026 10:10 AM (IST)

    16 Jul 2026 10:10 AM (IST)

    सोनम वांगचुक यांच्यासाठी अतुल कुलकर्णी करणार एकदिवसीय उपोषण

    अतुल कुलकर्णी यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत आपल्या उपोषणामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “आज १६ जुलै रोजी मी माझ्या घरातून एक दिवसाचे उपोषण करणार आहे. सोनम वांगचुक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना होत असलेल्या वेदनांशी एकरूप होण्यासाठी आणि सरकारने संवेदनशीलता दाखवत त्यांच्याशी संवाद सुरू करावा, यासाठी मी हा निर्णय घेतला आहे.”

  • 16 Jul 2026 10:00 AM (IST)

    16 Jul 2026 10:00 AM (IST)

    बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री कतरिना कैफचा ४३ वा वाढदिवस

    आज १६ जुलै, बॉलीवडूची लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफ आपला ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. मॉडेलिंगपासून अभिनयापर्यंतचा तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. नमस्ते लंडन, जिंदगी ना मिलेगी दोबारा, वेलकम, एक था टायगर आणि टायगर जिंदा है यांसारखे अनेक सुपहिट चित्रपटांत तिने भूमिका साकारल्या आहेत.  कतरिनाने अभिनयासोबतच यशस्वी उद्योजिका म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसह अनेक सेलिब्रिंटकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Web Title: 16 july 2026 live breaking news marathi maharashtra politics national maharashtra monsoon alert supreme court cjp protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 08:41 AM

Topics:  

  • international news
  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • Maharashtra Rain
  • Monsoon News
  • national news

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
2

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
3

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
4

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.