Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST workers protest : एसटी सेवा ठप्प होणार? प्रलंबित मागण्यांसाठी संयुक्त कृती समितीकडून बेमुदत आंदोलनाची घोषणा

महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेत ९ जून २०२६ पासून राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन आणि चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनामुळे राज्यातील एसटी वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असून, कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे...

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 11, 2026 | 06:32 PM
एसटी सेवा ठप्प होणार? प्रलंबित मागण्यांसाठी संयुक्त कृती समितीकडून बेमुदत आंदोलनाची घोषणा

एसटी सेवा ठप्प होणार? प्रलंबित मागण्यांसाठी संयुक्त कृती समितीकडून बेमुदत आंदोलनाची घोषणा

Follow Us
Follow Us:

ST workers protest : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवरून महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. समितीच्या वतीने ९ जून २०२६ पासून राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन आणि चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबई येथे महाराष्ट्रातील बहुसंख्य एसटी कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक मंत्री महोदययांच्या सोबत पार पडली. या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक व कामगार हिताच्या प्रश्नांवर तीव्र आंदोलन उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २९ जून २०२६ पासून मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालय, सर्व विभागीय कार्यालये तसेच सर्व मध्यवर्ती कार्यशाळांवर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. शासनाने एसटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी जोरदार मागणी कृती समितीने केली आहे.

‘एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीत खंजीर’, निधी नाकारल्याने राज्यभर संताप; राज्य सरकारच्या भूमिकेवर कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा

काय आहेत मागण्या?

  1. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे.
  2. २०१६-२०२० या वेतनकराराच्या पॅकेजदरम्यान १% ने कमी करण्यात आलेला वार्षिक वेतनवाढीचा दर २०१६ पासून मान्य केल्याप्रमाणे
  3. पुन्हा ३% करण्यात यावा.
  4. मा औद्योगिक न्यायालयाच्या निर्ण्यानुसार २०१८ पासूनची महागाई भत्त्याची थकबाकी तातडीने अदा करावी.
  5. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५८% महागाई भत्ता लागू करावा.
  6. एसटी महामंडळासाठी शासनाने स्वतंत्र बजेट तरतूद करावी.
  7. मध्यवर्ती कार्यशाळांना नवीन बसबांधणीसाठी चॅसिस उपलब्ध करून स्वमालकीच्या बसेस तयार कराव्यात.
  8. कामगार विरोधी चारही कामगार कायदे रद्द करावेत.
  9. एसटी कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिक्लेम सुविधा लागू करावी.
  10. कंत्राटी भरती बंद करावी.
  11. महामंडळाच्या जागा PPP खासगीकरणाऐवजी महामंडळानेच विकसित कराव्यात.
  12. भाडेतत्त्वावरील ई-बसेसऐवजी स्वमालकीच्या ई-बसेस घ्याव्यात.
  13. उन्नत प्रवर्गातील क. अधीका-यांना वर्ग २ कनिष्ठ अधिकाऱ्यांप्रमाणे न्याय्य वेतन लागू करावे.

आंदोलनाचे तीन टप्पे जाहीर

१५ जून २०२६ रोजी

राज्यातील सर्व आगार, विभागीय कार्यालये, कार्यशाळा व मध्यवर्ती कार्यालय येथे घंटानाद व महाआरती आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार.

२२ जून २०२६ रोजी

महाराष्ट्रातील प्रत्येक युनिटसमोर प्रचंड द्वार सभा आयोजित करण्यात येणार.

२९ जून २०२६ पासून

मुंबईसह राज्यभरातील सर्व विभागीय कार्यालये, मध्यवर्ती कार्यशाळा व मध्यवर्ती कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन होणार……!

मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत हप्त्यांसाठी १०० कोटींचा निधी तातडीने मंजूर; परिवहन मंत्र्यांनी दिली ग्वाही

Web Title: Maharashtra st workers joint action committee indefinite protest chakka jam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 06:31 PM

Topics:  

  • msrtc
  • st bus

संबंधित बातम्या

ST Employees: अतिवृष्टीमुळे गैरहजर ST कर्मचाऱ्यांना विशेष रजा द्या; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडे मागणी
1

ST Employees: अतिवृष्टीमुळे गैरहजर ST कर्मचाऱ्यांना विशेष रजा द्या; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडे मागणी

MSRTC toll tax : राज्याची टोलमाफी, पण केंद्राच्या टोल नाक्यांवर एसटीला दिलासा नाही; सहा महिन्यांत ५.८१ कोटींचा अतिरिक्त भार
2

MSRTC toll tax : राज्याची टोलमाफी, पण केंद्राच्या टोल नाक्यांवर एसटीला दिलासा नाही; सहा महिन्यांत ५.८१ कोटींचा अतिरिक्त भार

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई
3

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.