Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Tourisum : मालवण-तारकर्ली : उन्हाळी सुट्टीतील पर्यटकांचे आवडते ठिकाण

Maharashtra Tourisum महाराष्ट्र फिरण्यासाठी एक टुरिस्ट स्पॉट म्हणजे कोकण मालवण.स्वर्गाहून सुंदर कोकण म्हणतात ते हेच! सुदंर बागा ,समुद्र, मंदिरे हि त्याची ख्याती,

  • By Dilip Bane
Updated On: May 25, 2026 | 05:50 PM
maharashtra tourism

maharashtra tourism

Follow Us
Follow Us:
  1. उन्हाळी सुट्टीत पर्यटकांची कोकणाला मोठी पसंती
  2. निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक वारसा हे कोकणाचे आकर्षण
  3. हापूस आंबे, काजू, फणस आणि कोकणी खाद्यसंस्कृतीची पर्यटकांना भुरळ
  4. मालवण-तारकर्ली हे उन्हाळी पर्यटनाचे प्रसिद्ध ठिकाण
  5. स्कुबा डायव्हिंग, होमस्टे आणि रिसॉर्ट्सला मोठी मागणी
  6. पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध
  7. त्सुनामी बेट, देवबाग, तारकर्ली आणि चिवला बीच पर्यटकांचे आकर्षण
  8. सिंधुदुर्ग किल्ला आणि राजकोट किल्ला ऐतिहासिक वारशाची ओळख
  9. वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी आणि अस्वच्छतेची समस्या
  10. प्रशासनाकडून स्वच्छता आणि सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन
  11. समुद्रात उतरताना पर्यटकांनी सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक
  12. मालवण हे सुट्टीसाठी लोकप्रिय आणि महत्त्वाचे पर्यटनस्थळ
 

मुलांना शाळेची सुट्टी लागली की प्रत्येकजण कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतो. अनेक जण सुट्टीमध्ये कोकण फिरण्यासाठी येतात आणि काही दिवस निसर्गाच्या सान्निध्यात आनंदाने घालवतात. दैनंदिन धावपळीच्या जीवनातून थोडासा विरंगुळा मिळावा आणि शांत, सुंदर आयुष्याचा अनुभव घ्यावा यासाठी आधीच पर्यटनाचे नियोजन केले जाते. त्यापैकी एक खास ठिकाण म्हणजे आपले कोकण.

कोकणात असे काय नाही जे पर्यटकांना आवडणार नाही? निसर्गसौंदर्याने नटलेले समुद्रकिनारे, ऐतिहासिक मंदिरे, किल्ले, स्वादिष्ट खाद्यसंस्कृती, हापूस आंबे, काजू, फणस अशा अनेक गोष्टी कोकणाची ओळख आहेत. त्यामुळे सुट्टी असो किंवा वीकेंड, पर्यटकांची पावले आपोआप कोकणाकडे वळतात.उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी प्रसिद्ध ठिकाणांमध्ये मालवण-तारकर्लीचा विशेष उल्लेख केला जातो. समुद्र आणि निसर्गाचा सुंदर वारसा लाभलेल्या या भागात स्कुबा डायव्हिंग, होमस्टे, रिसॉर्ट्स आणि विविध पर्यटनस्थळांना मोठी मागणी असते. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे येथील सर्व व्यवस्था अनेकदा हाउसफुल दिसून येतात. यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. म्हणूनच मालवण-सिंधुदुर्ग हे नेहमीच हॉट डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाते.

त्सुनामी बेट, देवबाग, तारकर्ली बीच, चिवला बीच, आचरा समुद्रकिनारा तसेच सिंधुदुर्ग किल्ला आणि राजकोट किल्ला ही पर्यटकांच्या आकर्षणाची प्रमुख केंद्रे आहेत. मात्र, वाढती वाहतूक आणि पर्यटकांची गर्दी यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होताना दिसते. काही ठिकाणी खराब रस्ते आणि पर्यटकांकडून होणारी अस्वच्छता यामुळे या सुंदर पर्यटनस्थळांना गालबोट लागते. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून पर्यटकांना स्वच्छता राखण्याचे तसेच नियम पाळण्याचे आवाहन केले जाते.समुद्रात उतरताना सुरक्षेचे नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वतःच्या जीवाची काळजी घेत सुरक्षितपणे पर्यटनाचा आनंद घ्यावा, जेणेकरून आपली ट्रिप कायम स्मरणात राहील. मालवणमधील सुंदर मंदिरे आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले किल्ले पर्यटकांचे मन मोहून टाकतात. त्यामुळेच मालवण हे सुट्टीसाठी एक महत्त्वाचे आणि लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून पाहिले जाते.

Web Title: Maharashtra tourisum malvan tarkarli becomes tourists favorite destination during summer vacation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • kokan
  • maharashtra
  • Tourism Places

संबंधित बातम्या

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …
1

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
2

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता
3

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
4

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.