Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Weather Update: राज्यात पावसाचा जोर कायम! कुठे, कोणता अलर्ट? जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज?

Maharashtra Weather Update: भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे. पुणे आणि मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 25, 2026 | 11:41 AM
Maharashtra Weather Update: राज्यात पावसाचा जोर कायम! कुठे, कोणता अलर्ट? जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज?
Follow Us
Follow Us:
  • मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथ्याला यलो अलर्टचा इशारा
  • कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
  • तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज जाणून घ्या
 

Maharashtra Weather Update News In Marathi: महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून राज्यातील विविध भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) आणि स्कायमेटच्या ताज्या अंदाजानुसार आज (25 जुलै 226) पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि काही उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा

पुणे जिल्ह्यातील घाटमाथा आणि डोंगराळ भागांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. घाट परिसरात मात्र पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने वाहतूक आणि जनजीवनावर परिणाम होऊ शकतो. आज पुण्याचे कमाल तापमान सुमारे २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

Nashik Rain Update: मंदिरे पाण्याखाली, पंचवटीतील रामसेतू जलमय; मुसळधार पावसाचा नाशिकला फटका, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

मुंबई, ठाणे आणि कोकणात पावसाचा जोर

मुंबईसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून शहर आणि उपनगरांतील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तर ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. या भागांत काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडू शकतो. कोकण आणि गोवा परिसरात मान्सून अत्यंत सक्रिय असल्याने ‘व्हेरी हेवी रेन’चा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टी भागात ताशी ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमार आणि समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईतील भरती-ओहोटीची वेळ

समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांसाठी आजच्या भरती-ओहोटीच्या वेळा पुढीलप्रमाणे आहेत:

पहिली ओहोटी: पहाटे २.३४ वाजता (४.१३ फूट)

पहिली भरती: सकाळी ९.५९ वाजता (११.६१ फूट)

दुसरी ओहोटी: दुपारी ३.५६ वाजता (७.८४ फूट)

दुसरी भरती: रात्री ८.५१ वाजता (९.९१ फूट)

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांतही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नाशिकच्या घाटमाथ्यावर मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहून मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. येथे कमाल तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते.

विदर्भात हलका ते मध्यम पाऊस

विदर्भात मान्सूनचा प्रभाव तुलनेने कमी असला तरी बहुतांश भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळू शकतात. अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिममध्ये तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता असून सध्या कोणताही मोठा हवामानाचा धोका नसल्याचे सांगण्यात आले आहे.

नागरिक आणि पर्यटकांसाठी महत्त्वाचा सल्ला

पुणे घाटमाथा, कोकण आणि डोंगराळ भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेता पर्यटकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. नदी, नाले, धबधबे आणि जलाशयांच्या परिसरात जाणे टाळावे. तसेच स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः धार्मिक यात्रा आणि पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे.

Maharashtra Rain Alert: अरे देवा! राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण-घाटमाथ्यासह ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट

Web Title: Maharashtra weather alert orange alert for pune mumbai heavy rain imd today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • imd
  • maharashtra weather update
  • Weather Update

संबंधित बातम्या

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची….
1

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची….

देशभरात 11 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता; नेपाळनंतर आता उत्तराखंडसह हिमाचल प्रदेशात पूर येणार?
2

देशभरात 11 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता; नेपाळनंतर आता उत्तराखंडसह हिमाचल प्रदेशात पूर येणार?

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
3

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर…
4

देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.