Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal News: महात्मा फुले चौक अखेर अतिक्रमणमुक्त! वाहतूक पोलिसांनी केली कारवाई; फुटपाथवरील दुकाने हटविली

महात्मा फुले चौकासह शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांविरोधात नियमित कारवाई करण्याची गरज आहे.एखादी कारवाई केल्यानंतर काही दिवसांत पुन्हा त्याच ठिकाणी दुकाने थाटली गेल्यास वाहतूक कोंडीची समस्या कायम राहण्याची शक्यता आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 12, 2026 | 10:43 AM
महात्मा फुले चौक अखेर अतिक्रमणमुक्त! वाहतूक पोलिसांनी केली कारवाई; फुटपाथवरील दुकाने हटविली

महात्मा फुले चौक अखेर अतिक्रमणमुक्त! वाहतूक पोलिसांनी केली कारवाई; फुटपाथवरील दुकाने हटविली

Follow Us
Follow Us:

यवतमाळ शहरातील प्रमुख आणि नेहमीच वर्दळीच्या महात्मा फुले चौक परिसरात फुटपाथवर थाटण्यात आलेल्या दुकानांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर अखेर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. मंगळवारी वाहतूक पोलिस निरीक्षक देवकते यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत फुटपाथ तसेच रस्त्यालगत अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना हटविण्यात आले. या कारवाईमुळे चौक परिसर मोकळा झाला असून वाहनांची वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली आहे. महात्मा फुले चौक हा शहरातील महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू आहे. या परिसरातून दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची तसेच नागरिकांची ये-जा सुरू असते.(फोटो सौजन्य – AI)

Yavatmal News: रेशनच्या ई-केवायसीला लागला ‘ब्रेक’!४ लाख लाभार्थी अजूनही दूरच; १६ लाख ७८ हजार १६८ जणांची प्रक्रिया पूर्ण

मात्र, गेल्या काही दिवसांपासून फुटपाथवर विविध प्रकारच्या छोट्या-मोठ्या तात्पुरत्या दुकानांची संख्या वाढली होती. परिणामी पादचाऱ्यांसाठी असलेला मार्ग व्यापला जात होता. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत होते. त्याचवेळी दुकानांमध्ये खरेदीसाठी येणारे ग्राहक रस्त्याच्या कडेला वाहने उभी करीत असल्याने रस्त्याची उपलब्ध जागा आणखी कमी होत होती. यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत चौक परिसरात वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार वाढले होते. मंगळवारी वाहतूक पोलिसांनी अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली.

अनाधिकृत दुकानांचा सफाया

वाहतूक पोलिस निरीक्षक देवकते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महात्मा फुले चौक परिसरात कारवाई करीत फुटपाथवर दुकाने थाटलेल्या विक्रेत्यांना तेथून हटविले. रस्त्यालगत तसेच पादचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या जागेवर केलेले तात्पुरते अतिक्रमणही काढण्यात आले. यावेळी विक्रेत्यांना रस्ता किंवा फुटपाथ अडवून व्यवसाय करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. भविष्यात पुन्हा अशा पद्धतीने अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

फुटपाथवर दुकाने लागल्याने या परिसरातील पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना रस्त्यावरून मार्ग काढावा लागत होता. फुटपाथ व्यापला गेल्याने पादचारी आणि वाहनांची एकाच जागेवरून होणारी वर्दळ अपघाताचा धोका वाढविणारी ठरत होती. त्यामुळे फुटपाथ मोकळा करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. कारवाईनंतर फुटपाथचा मोठा भाग मोकळा झाला असून नागरिकांना दिलासा मिळाला.

नदी पोखरणारे रेतीमाफिया आता रडारवर! रॉयल्टीच्या दहापट दंडाची कारवाई; अवैध उत्खननाला शासनाचा दणका

महात्मा फुले चौकासह शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांविरोधात नियमित कारवाई करण्याची गरज आहे.एखादी कारवाई केल्यानंतर काही दिवसांत पुन्हा त्याच ठिकाणी दुकाने थाटली गेल्यास वाहतूक कोंडीची समस्या कायम राहण्याची शक्यता आहे.त्यामुळे अतिक्रमण हटविल्यानंतर त्या ठिकाणी सातत्याने देखरेख ठेवणे आवश्यक आहे.वाहतूक पोलिसांनीही शहरातील प्रमुख मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वेळोवेळी विशेष मोहिमा राबविण्यात येतील, असे स्पष्ट केले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mahatma phule chowk finally cleared of encroachments traffic police took action shops on the footpath were removed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 10:43 AM

Topics:  

  • maharashtra
  • yavatmal news

संबंधित बातम्या

रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-कॅब चालकांसाठी मोठी बातमी! मराठीचे ज्ञान बंधनकारक अन्यथा…; नियमभंग केल्यास परवाना होणार निलंबित
1

रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-कॅब चालकांसाठी मोठी बातमी! मराठीचे ज्ञान बंधनकारक अन्यथा…; नियमभंग केल्यास परवाना होणार निलंबित

Bhandara News: एकलारीत वीजतारा तुटून ३ शेळ्यांचा मृत्यू! महावितरणाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
2

Bhandara News: एकलारीत वीजतारा तुटून ३ शेळ्यांचा मृत्यू! महावितरणाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती
3

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?
4

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.