Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जतमध्ये राजकीय घडामोडींना वेग; भाजपला रोखण्यासाठी ‘हे’ पक्ष एकत्र

जत तालुक्यात भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 19, 2026 | 02:33 PM
जतमध्ये राजकीय घडामोडींना वेग; भाजपला रोखण्यासाठी 'हे' पक्ष एकत्र

जतमध्ये राजकीय घडामोडींना वेग; भाजपला रोखण्यासाठी 'हे' पक्ष एकत्र

Follow Us
Close
Follow Us:
  • जतमध्ये राजकीय घडामोडींना वेग
  • भाजपला रोखण्यासाठी दोन्ही ‘हे’ पक्ष एकत्र
  • संयुक्त बैठकीत घेतला निर्णय
जत : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये जत तालुक्यात भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय माजी आमदार विलासराव जगताप व माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

 

या बैठकीत बोलताना माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले की, भाजपकडून पैसा, दादागिरी व जातीवादाचे घाणेरडे राजकारण सुरू असून, ते जत तालुक्यातील जनतेला मान्य नाही. सर्व पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधात एकास एक उमेदवार दिल्यास विजय निश्चित होईल, अशी भावना सर्व पक्षांच्या नेतेमंडळींसह मतदारांमध्ये आहे. त्यामुळे सर्व पक्षांचे नेते एकत्र बसून भाजपविरोधात एकसंघ पॅनल उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जागावाटपाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल आणि एकत्रित ताकदीने भाजपचा पराभव पक्का करू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

माजी आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले की, जत तालुक्यातील तमाम जनता व कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन, तसेच तालुक्याच्या विविध प्रश्नांच्या हिताच्या दृष्टीने जातीवादी राजकारणाच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आले आहेत. देश, राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर भाजपकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असून, तो थांबवण्यासाठी ही निवडणूक एकत्रितपणे लढवली जाईल. या पॅनलला जत तालुक्यातील जनता निश्चितपणे भरघोस पाठिंबा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेची दिशाभूल थांबवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले असून, एकजुटीने लढल्यास भाजपचा पराभव अटळ आहे, असे मत उपस्थित सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले.

या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे कुंडलिक दुधाळ, तम्मनगौडा रवीपाटील, प्रमोद सावंत, संग्राम जगताप, काँग्रेसचे जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब कोडग, तालुकाध्यक्ष महादेव पाटील, अप्पराय बिराजदार, युवराज निकम, मारुती पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे तालुकाध्यक्ष मन्सूर खतीब, युवक जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे, रमेश पाटील, शिवसेना (उबाठा) चे तालुका प्रमुख अमित उर्फ बंटी दुधाळ, विधानसभा प्रमुख विजय बागेळी, रासपचे अजित पाटील व किसन टेंगले यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निर्णयामुळे जत तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची राजकीय लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा : सायलेंट बिडकर विरुद्ध आक्रमक धंगेकर; पुणे महापालिकेत रंगलेली हायव्होल्टेज लढत

Web Title: Mahavikas aghadi is making efforts to defeat bjp in jat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • BJP
  • Election News
  • Jatt
  • Mahadev Jankar

संबंधित बातम्या

सायलेंट बिडकर विरुद्ध आक्रमक धंगेकर; पुणे महापालिकेत रंगलेली हायव्होल्टेज लढत
1

सायलेंट बिडकर विरुद्ध आक्रमक धंगेकर; पुणे महापालिकेत रंगलेली हायव्होल्टेज लढत

राजकीय हालचालींना वेग, पिंपरीत आता वेध महापौरपदाचे; कोणाला मिळणार मान?
2

राजकीय हालचालींना वेग, पिंपरीत आता वेध महापौरपदाचे; कोणाला मिळणार मान?

मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला, मोदींनी जनतेची माफी मागावी, नाहीतर…; काँग्रेसचा इशारा
3

मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला, मोदींनी जनतेची माफी मागावी, नाहीतर…; काँग्रेसचा इशारा

पडद्यामागील हालचालींना वेग! कल्याण-डोंबिवलीत महापौरपदासाठी रस्सीखेच सुरु, महापौर नेमका कोणाचा होणार?
4

पडद्यामागील हालचालींना वेग! कल्याण-डोंबिवलीत महापौरपदासाठी रस्सीखेच सुरु, महापौर नेमका कोणाचा होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.