मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आता जोरदार तयारी सुरु केली आहे. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आज (16 ऑगस्ट) सकाळी साडेदहा वाजेपासून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हेदेखील वाचा: मिथुन, कन्या, तूळ राशींच्या लोकांना दुसऱ्या श्रावण शुक्रवारी सूर्य संक्रमणाचा लाभ
या मेळाव्याच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेतेमंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. याच मेळाव्यातूून महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाण्याची शक्यता आहे. त्यासोबतच उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रचाराची धुराही सोपवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंकडे जर निवडणुकीची धुरा सोपवण्यात आली तर निव़णुकीच्या रिंगणात ठाकरे विरूद्ध फडणवीस आणि शिंदे गटा असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
हेदेखील वाचा: आधार कार्डसोबत कोणता नंबर लिंक आहे आठवत नाहीये? मग या सोप्या ट्रिकने शोधून काढा
याशिवाय,शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडे महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील. महाविकास आघाडीसह इंडिया आघाडील इतर मित्रपक्षही या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीतही एकजुटीने काम करण्यासाठी हा मेळावा होत आहे.